ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जमील रंगरेज यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जमील रंगरेज यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व झैन फाउंडेशन परभणी द्वारा आयोजित केलेले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दि.२८ जानेवारी रविवार रोजी परभणी येथे खासदार डॉ.फौजिया खान, गौस झैन, शिक्षणअधिकारी संजय ससाने यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले या निमित्त शिक्षक जमील रंगरेज याचां ताडबोरगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व शिक्षक व गावकरी मंडळी यांच्या वतीने जमील रंगरेज यांचे स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
No comments:
Post a Comment