शेख समीर यांची शिवसेना अल्पसंख्यांक मानवत तालुकाध्यक्षपदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथील समाजसेवक शेख समीर शेख शफियोदिन यांची अल्पसंख्यांक शिवसेना मानवत तालुकाध्यक्ष पदी निवड शिवसेना नेते तथा प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान यांच्यां प्रमुख उपस्थितीत दि.८ जानेवारी रोजी शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालय पाथरी येथे करण्यात आली .
खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यां आदेशाने अल्पसंख्यांक मानवत तालुकाध्यक्ष पदी आपली नियुक्ती करण्यात येत असून आपण पक्षाचा अधिक विस्तार करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार तळगाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न कराल, पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान यांनी यावेळी केले . सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत निवडिचे पञ शेख समीर यांना देऊन त्यांचा सत्कार करुन पुढिल कार्यास त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी लाल खान जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यक ,आसेफ खान अल्पसंख्यक प्रदेश सचिव ,दादा साहेब टेंगसे जिला परिषद माजी सभापति ,चक्रधर उगले माजी जिला परिषद सदस्य ,हसीब खान अल्प संख्यक प्रदेश उपाध्यक्ष ,शाकेर भाई ,युसूफोद्दीन अंसारी ,नाना टकलकर ,
मेहराज खान ,मोइन अंसारी,साजिद अली राज,शेख इरफान ,अनिल पाटिल,
हबीब खान ,सतीश वाकडे ,हाजी, खुरेशी
हनीफ खुरेशी ,अहमद अतार, फारुख अंसारी ,मुबारक चाउस,युनुस कुरेशि,आनंत नेब,अनिल ढवले ,शकील बेग
आलम, अजीज बागवान ,
समीर मकसूद आदीसह मोठ्यासंख्येने शिवसैनिक उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment