Saturday, October 12, 2024

शहरांच्या विकासात मानवत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर - आ. राजेश दादा विटेकर

शहरांच्या विकासात मानवत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर - आ. राजेश दादा विटेकर

[] ९ कोटी ४५ लक्ष रुपयांच्या व्यापारी संकुलाचे उदघाटन  []

मानवत/मुस्तखीम बेलदार 
शहरांच्या विकासात मानवत नगरपालिका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे  प्रतिपादन आमदार राजेशदादा विटेकर यांनी केले. शनिवार १२ ऑक्टो. रोजी ११ वाजता दसऱ्याच्या मुहूर्तावर जुन्या तहसीलच्या जागेवर नगरपालिकेच्या नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. 
      नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राजेश विटेकर स्वत होते. तर विचार मंचावर ह भ प १००८ मनीषानंद पुरीजी महाराज, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, विजयकुमार कत्रुवार, विकासशील युवा नेतृत्व डॉ. अंकुश लाड, सुरेश काबरा, माजी नगराध्यक्ष एस. एन. पाटील, संजयकुमार लड्डा, गिरीश सेठ कत्रुवार आदी होते. पुढे बोलताना विटेकर म्हणाले, पाथरी विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर परभणी जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत मानवत नगरपालिका सर्वात पुढे आहे. मागील काळात आपण मानवत नगरपालिकेला कधीही निधी कमी पडून देणार नसल्याचे म्हटले होते. हा शब्द पूर्ण करत आपण दोन महिन्यात वीस कोटी पेक्षा जास्त निधी  मानवत नगरपालिकेला दिला आहे. पुढच्या काळातही विकासाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी विजयकुमार कत्रुवार व ह.भ.प. १००८ मनीषानंद पुरीजी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत, बालाजी कुऱ्हाडे, दत्ता चौधरी, मोहन लाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, प्रा. अरविंद घारे, सचिन कोक्कर यांच्यासह शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक, व्यापारी, नप कर्मचारी, अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. अनिरुद्ध पांडे यांनी तर संचालन किशोर तूपकर केले. 

No comments:

Post a Comment