शेख मोहम्मद अतिक कौसर यांची युवासेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती
पाथरी / प्रतिनिधी
युवासेना पाथरी विधानसभा क्षेत्रात नवीन नेतृत्वाच्या निवडीस चालना मिळत असताना, शेख मोहम्मद अतिक कौसर यांची पाथरी युवासेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे शिकवण व पक्षप्रमुख मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या सलग्न युवा सेना पाथरी उपशहर प्रमुख या पदी
अमोल बाबासाहेब भाले पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख परभणी यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान
यांच्या हस्ते देण्यात आले.
या निवडीमुळे स्थानिक पातळीवर शिवसेना पक्षाचे काम अधिक गतीने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शेख मोहम्मद अतिक कौसर यांना त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून शुभेच्छा मिळत आहे.
No comments:
Post a Comment