ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला मानवत पोलिसांची कडक सुरक्षा
मानवत / प्रतिनिधी
मानवत नगरपरिषद निवडणुकीचा निकाल २१ जानेवारी रोजी जाहीर होणार असून, निकाल प्रक्रियेपर्यंत ईव्हीएम मशीनचे संरक्षण करण्यासाठी तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूम परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर ईव्हीएम मशीन सीलबंद करून स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत.
या ठिकाणी मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच जिल्हा पोलिस दलातील दोन अधिकारी, १६ कर्मचारी तसेच SRPF चे ९ जवान देखील बंदोबस्तात कार्यरत आहेत. तसेच, कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांच्यावर क्षेत्रीय देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
स्ट्रॉंग रूम परिसरात मानवी बंदोबस्तासोबतच एकूण ८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बसविण्यात आली असून २४ तास इलेक्ट्रॉनिक नजर ठेवली जात आहे. तहसील कार्यालय या परिसरात निवडणूक अधिकाऱ्यांशिवाय अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंद केला आहे. प्रवेशासाठी ओळखपत्र तपासणी, सुरक्षा नोंदणी आणि तपासणी करण्यात येत आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, निकाल लागेपर्यंत सुरक्षा कोणत्याही परिस्थितीत सैल न ठेवता चोख राहणार आहे. ईव्हीएम मशीनची 'चेन ऑफ कस्टडी' अबाधित ठेवणे हे प्राथमिक उद्दिष्ट असून यासाठी पोलिस दल पूर्ण सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment