Sunday, December 21, 2025

मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणीताई अंकुश लाड यांचा दणदणीत विजय



मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणीताई अंकुश लाड यांचा दणदणीत विजय

२२ पैकी १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व; डॉ. अंकुश लाड यांची एकाकी झुंज यशस्वी

मानवत /प्रतिनिधी
मानवत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत कामगिरी करत नगराध्यक्ष पदासह अकरा प्रभागातील २२ पैकी तब्बल १६ जागांवर विजयी झेंडा फडकवला तर शिवसेना शिंदे गटाचे ४, भाजप व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीच्या राणी ताई अंकुश लाड यांनी ५३९१ मतांच्या फरकाने शानदार विजय मिळवत नगराध्यक्षपदावर शिक्का मोर्तब केला.
राणी अंकुश लाड यांना २३,९८९ पैकी १४,५८७ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सेना-भाजप युतीच्या अंजली कोक्कर यांना ९,१९६ मते पडली. रविवारी (ता.२१) तहसील कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्तात सकाळी दहाला मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत राणी लाड आघाडीवर राहिल्याने विजय निश्चित झाला होता.
प्रभाग क्रमांक १ अ मध्ये राष्ट्रवादीचे राजकुमार खरात विजयी झाले प्रभाग १ ब मध्ये अनुराधा वासुंबे विजयी झाले
प्रभाग २ अ मध्ये शिवसेनेच्या विभा भदर्गे विजयी झाले. तर प्रभाग २ ब मध्ये ज्योती आळसपुरे यांनी शिवसेनेच्या शीतल कुन्हाडेंचा नजीकच्या १० मतांनी पराभव करीत विजय मिळवला.
प्रभाग ३ अ राष्ट्रवादीचे किशोर लाड यांनी विजय मिळवला, ३ ब मध्ये नंदनी गणेश मोरे पाटील यांनी विजय संपादित केला 
४ अ द्वारका दत्तात्रय चौधरी यांनी विजय मिळविला तर ब मध्ये भाजपाचे उमेदवार शैलेंद्र राजेश्वर कत्रुवार यांनी विजय मिळविला ५ अ मध्ये विक्रम सिंह दहे यांनी फक्त दोन मतांनी विजय मिळविला तर ब मध्ये राष्ट्रवादीचे वृषाली राहटे यांनी विजय मिळविला ६ अ मध्ये मीरा मोहन लाड तर, ६ ब संजय कुमार बांगड यांनी विजय मिळविला, ७ अ मध्ये रेखा बाजीराव हालनोर यांनी विजय मिळविला, ७ ब मध्ये नियामत खान यांनी विजय मिळविला, ८ अ मध्ये शेख जवेरिया बेगम आहाद बेलदार तर ब मध्ये मोहम्मद बिलाल मोहम्मद युनूस बागवान यांनी यश संपादित केले ९ अ मध्ये सुशीला बालाजी लाड तर ब मध्ये भाग्यश्री स्वप्निल शिंदे हे विजयी झाले १० अ मध्ये रूपाली गणेश उगले तर ब मध्ये डॉक्टर अंकुश बालाजी लाड हे विजयी झाले ११ अ मध्ये डॉक्टर देवयानी राजेश्वर दहे तर ब मध्ये उ बा ठा चे दीपक  बारहाते हे विजयी झाले आहे 

विजयानंतर बोलताना डॉ. अंकुश लाड म्हणाले, "ही जिंकलेली बाजी माझी नाही, मानवत शहरातील प्रत्येक नागरिकाची आहे. भविष्यात विकासाला नवा वेग देत शहराचा चेहरा पालटू. जनतेचा विश्वास कायम ठेवू," असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय साजरा केला.
मानवत नगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक नामांकित नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, शिवसेनेचे सईद खान व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजप आघाडीने बहुतेक जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र अपेक्षेपेक्षा फिके पडत आघाडीला चार जागांपुरती मर्यादा राहावी लागली तर भाजपचा फक्त एक उमेदवार विजयी झाला.
निवडणुकीचा हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऐतिहासिक यश ठरला असून मानवत शहरातील राजकीय समीकरणाला नवे परिमय मिळाले आहे. जनतेच्या विश्वासाने विकासाला दिशा मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment