मानवत येथील प्रभाग क्र. ३ मध्ये एस.आय.आर. कॅम्प चे आयोजन
मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये दिनांक २६ मार्च रोजी कृष्णा मंदिर येथे उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या मार्गदर्शना खाली नगरसेवक ॲड. गणेश मोरे पाटील व किशोर लाड यांच्या वतीने एस.आय.आर. कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगर
परिषदेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी यावेळी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने एस.आय.आर. (Special Intensive Revision) प्रक्रिया लागू केली असून मानवत शहरातही सध्या ऑनलाईन मॅपिंगची प्रक्रिया सुरू आहे. २००२ च्या मतदार यादीचे मॅपिंग कार्य तहसील कार्यालयामार्फत प्रभागनिहाय बीएलओमार्फत सुरू करण्यात आले आहे.
नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे प्रशासनाने नगरसेवकांना आवाहान केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक ॲड. गणेश मोरे पाटील व किशोर लाड यांनी आपल्या प्रभागात एस.आय.आर. कॅम्पचे आयोजन केले होते यास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे परिसरातील यादीनुसार प्रभाग क्र. ३ मधील एकूण ३,३९१ मतदारांपैकी सुमारे ८० टक्के मॅपिंग कार्य पूर्ण झाले आहे.
या उपक्रमांतर्गत नगरसेवक व बीएलओ नागरिकांच्या घरोघरी भेट देऊन मॅपिंगचे काम तत्परतेने करत आहेत. तसेच प्रभागातील नागरिकांकडूनही या कामाला चांगला प्रतिसाद आणि सहकार्य मिळत आहे.
प्रशासनाच्या या उपक्रमामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment