Tuesday, February 13, 2018

रत्नापुर येथे जुनेद भैय्या दुर्राणी याच्यां हस्ते क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन संपन्न .


रत्नापुर येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन जुनेद भैय्या दुर्राणी याच्यां हस्ते संपन्न !

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१३: मानवत तालुक्यातील रत्नापुर येथील जयहिंद ग्राउन्ड येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन रत्नापुर येथील राष्टृवादि पक्षाच्या वतीने करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन  दि.११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता   जुनेद भैय्या दुर्राणी गटनेता न.प.पाथरी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य परभणी याच्यां शुभ हस्ते करण्यात आले.
८-८ षटकाच्या या सामन्यात शहरी व ग्रामीण असे एकुण ४० क्रिकेट संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला असुन प्रथम पारितोषिक जुनेद भैय्या दुर्राणी याच्यावतीने १५००१ रुपये देण्यात येणार आहे तर द्वितीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेशदादा विटेकर याच्याकडुन ११००१ रुपये देण्यात येनार आहे तर तृतीय पारितोषिक ५००१ रुपये रत्नापुर कमीटी तर्फे देण्यात येणार आहेत.या उदघाटन कार्यक्रमावेळी गणेश उक्कलकर ,मोहम्मद रफीक,संदिप हजारे ,मुंजाभाऊ केदारे,विजय केदारे,ऊत्तम नंदनवरे,सुरेश केदारे,भारत तळेकर याच्यांसह क्रिकेट खेळाडू तसेच रसिक प्रेक्षक  मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment