मानवत येथे मा.बबनराव लोणीकर यांचा उदयगिरी नेञालयच्या वतीने भव्य सत्कार.
[] बालाप्रसादजी मुंदडा याच्यां सामाजीक कार्याची लोणीकर साहेबांनी केली प्रशंसा []
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.१७: मानवत येथील उदयगिरी नेत्रालय उदगीर संलग्न स्वर्गीय चंद्रकला बालाप्रसाद मुंदडा दृष्टी केंद्र मानवत येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांचा ह्रदयसत्कार मोठ्या ऊत्साहात संपन्न झाला .
पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनरावजी लोणीकर साहेब हे मानवत येथे विस्तारीत समाधान योजना कार्यशाळा शिबीराचे आयोजनाच्या कार्यक्रमास दि.१५ फेब्रुवारी रोजी मानवत येथे आले असताना यावेळी भाजपा नेते बालाप्रसादजी मुदडा यांनी ना.लोणीकर साहेब याचा भव्य स्वागत उदयगिरी नेत्रालय उदगीर संलग्न स्वर्गीय चंद्रकला बालाप्रसाद मुंदडा दृष्टी केंद्र मानवत येथे करण्यात आला . यावेळी स्वागत भाषणात मा.बबनराव लोणीकर यांनी बालाप्रसादजी मुंदडा यांच्या सामाजिक कार्याची भरभरुन प्रशंसा केली व त्याच्या कार्यावर समाधान व्यक्त करत मुंदडा यांना पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .या स्वागत कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती गणेशराव रोकडे,मानवत कृ.उ.बा.सभापती गंगाधराव कदम,माजी सभापती शिवहरी खिस्ते,बालाप्रसाद मुंदडा,बाबा पठाण,डॉ प्रफुल्ल पाटील,तालुकाध्यक्ष अंनता गोलाईत,दत्तप्रसाद बांगड,घनश्यामदास कासट,गिरीष मंत्री,गंगाधर कंकाळ,व्यंकटराव कसपटे,नागनाथराव सातभाई,ज्योतीबा काटे,नागेश जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment