Wednesday, February 21, 2018

भाजपा तालुकाध्यक्ष अनंतराव गोलाईत यांची कृ.ऊ.बा समितीला विविध मागणीचे निवेदन.

मानवत शहरातील सर्व जिनिंग मध्ये वजन काट्याना डिजिटल लोडसेल अॉनलाइन करण्याची मागणी.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२१:  मानवत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जिनिंग मध्ये शेतकऱ्यांचा  कापुस मोजण्या करीता डिजिटल लोडसेल वापर करून अॉनलाइन काट्याचा वापर करण्याचे कृषी उत्पादन समितीने द्यावे आशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत यांनी बाजार समितीचे सचिव यांना निवेदनात केली आहे.
शेतकऱ्यांच्या वारंवार कापूस मोजमापा मध्ये अफरातफर होत आसल्याने जिनिंग मालाक कशलीही दाद शेतकऱ्यांना देत नसल्यामुळे भाजपा तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत यांनी दि.२० फेब्रुवारी रोजी बाजार समिती चे सचिव यांना लेखी निवेदन देले या निवेदन नमुद केली आहे की, शेतकऱ्यांची जिनिंग मालका कडून होत आसलेली लूट व बाजार समितीच्या व्यावहारात तसेच खरेदी मध्ये पारदर्शकता येण्यासाठी सर्व जिनिंग चे  वजन काटे डिजिटल लोडसेलचा वापर करून ते मोडेमच्या माध्यमातून बाजारसमितीचे कार्यालयाला जोडावे आँपरेटर ची काट्यावर नियुक्ती करावी व त्या व्दारे मार्केटलाअॉनलाइन नोंद करेल आशी व्यवस्था करावी व सर्व जिनिंग च्या प्रवेश व्दारवर सि.सि.टिव्हि अॉनलाइन  कराव्यात यामुळे  जिनिंग मध्ये होणाऱ्या प्रत्येक हालचाली वर लक्ष राहील  मार्केटला महसूल चा भरपूर फायदा होईल व  जिनिंग वाले मार्केटचा महसूल चुकविणार नाही असे  निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर भाजपा तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत यांची स्वाक्षरी आहे.

No comments:

Post a Comment