रामेटाकळी येथे २८ फेब्रुवारी रोजी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२७: मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे उद्दघाटन महाराष्ट्र चेंबर आँफचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर यांच्या हस्ते होणार आहे तर शिवसेनेचे जिल्हाअध्यक्ष डाँ.संजय कच्छवे, बाजार समीतीचे सभापती गंगाधर कदम, काँग्रेसच्या प्रेरणा वरपुडकर, नायब तहसिलदार एन.पी.वांगुडे, पो.नि.प्रदीप पालीवाल, जि.प.च्या उपाध्यक्षा श्रीमती भावना नखाते, बाजार समीतीचे उपसभापती पंकज आंबेगावकर,बाबुराव नागेश्वर, हे प्रमुख पाव्हुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी भा.ज.पा.युवा मोर्चाचे किरण खरात, प.स.सदस्या सुमन गाढे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष वैजनाथ महीपाल, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उध्दव हारकळ, डिगांबर भिसे, अनुरथ काळे, केशव शिंदे, सरपंच सुशिला काळे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी मानवत तालुक्यासह परीसरातील शिवभक्तानी व्याख्यानास उपस्थित रहावे असे आवाहन रामेटाकळी येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment