Saturday, February 17, 2018

मानवत कोतवाल संघटने तर्फे पाणीपुरवठा मंञी बबनराव लोणीकर यांना निवेदन.

मानवत कोतवाल संघटने तर्फे बबनराव लोणीकर यांना निवेदन.

[]कोतवालाना चतुर्थश्रेणीत समाविष्ट करण्याची मागणी []

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१७: मानवत येथे राज्यसरकार च्या वतिने विस्तारीत समाधान शिबीर व कार्यशाळेच्या कार्यक्रमासाठी पाणीपुरवठा मंञी बबनराव लोणीकर हे दि .१५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता माऊली मंगल कार्यालय येथे आले आसताना महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना मानवत शाखाच्या वतिने यावेळी विविध मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.
मानवत तालुक्यातील सर्व कोतवाल कर्मचाऱ्यांच्या वतिने हे निवेदन देण्यात आले या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, प्रशासनातील शेवटचा घटक कोतवाल  म्हणुन  कोतवालास चतूर्थश्रेणीत देण्या सदर्भात निर्णय असुन शासन स्तरावर प्रलंबीत आसुन शासनाने कोतवाल कर्मचाऱ्यांना चतूर्थश्रेणीत समाविष्ट करावा व या शेवटच्या घटकासही समाधानी आयूष्य जगण्याची संधी उपलब्ध करून देउन न्याय करावा आसे निवेदन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटने चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी देवणे याच्या नेत्तृत्वाखाली देण्यात आले. यावेळी शरद दहे , बापू रासवे ,मोहन गिरी ,मूरलीधर खंदारे ,एकनाथ मगर ,रामा काळे ,ईश्वर भाकरे ,हमीद जिलानी माणीक पाथरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment