Friday, February 23, 2018

औरंगाबाद येथील होणाऱ्या ईज्तेमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची सदिच्छा भेट.

लिंबे जळगाव येथील इज्तेमाला   ना. बबनराव लोणीकर यांची भेट.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार       

औरंगाबाद तालुक्यातील लिंबे जळगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित इज्तेमा कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरूवारी सायंकाळी सदिच्छा भेट देऊन तेथील तयारीची पाहणी केला. हा इज्तेमा दि. २४ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान होत असून, देशभरातून विविध प्रांतातील मुस्लिम बांधव कार्यक्रमस्थळी दाखल होत आहेत.
लिंबे जळगाव येथे विशाल प्रांगणात या इज्तेमाचे अत्यंत शिस्तीमध्ये आयोजन केले आहे. ना. बबनराव लोणीकर यांच्यासमवेत आ. अतुल सावे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आमिर साहब, धर्मगुरू कारी शकिल साहब, जुबेर मोतीवाला, राजू बागडे, आयोजक डाँ. रियाज शेख, आयेशाखान, अतीकखान, एजाज देशमुख, नबी पटेल, अतीक पटेल,  सय्यद अतहर, अन्सुल रहेमान, फेरोज कुरैशी, इम्रान शेख, सय्यद सलिम, हाजी दौलत पठाण, आमेर पठाण, शेख निसार, अन्वर अली, शाहरूख पठाण, शेख मुजाहिद, जुबेर पठाण, आदींची उपस्थिती होती. इज्तेमाच्या ठिकाणी ना. लोणीकर, आ. सावे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी रूग्णांसाठी उभारण्यात आलेल्या दवाखान्याची ना. लोणीकर यांनी पाहणी केली. तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.    
गेल्या चार महिन्यांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. सुमारे दोन हजार एकर परिसरात हा इज्तेमा होत आहे. या परिसरातील शेतक-यांनी स्वखुशीने या कार्यक्रमाला जागा उपलब्ध करून दिली. जागोजागी भव्य शामियाने उभारण्यात आले असून, तीन दिवस मान्यवर धर्मगुरूंचे विचार एेकण्यासाठी मोठा मंडप उभारला असून, जिल्हा व राज्यनिहाय भाविकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत व्यवस्थेची सोय करण्यात आली असून, जेवणाची, राहण्याची तसेच स्वच्छताग,हांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.    दरम्यान, इज्तेमाला भेट देण्यासाठी जाताना, औरंगाबाद शहरात क्रांती चौक, भडकल गेट, वाळूज, पंढरपूर आदी ठिकाणी ना. लोणीकर यांचे मुस्लिम बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल देऊन स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment