पाथरी विधानसभा निवडणुक शिवसेनेकडुन लढवणार - डॉ.संजय कच्छवे
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२३: शिवसेना पक्षाला वाढविण्यासाठी मी पाच वर्षापासुन सतत ईमाने एतबारे संघटन वाढण्याचे काम करत आसुन पुढिल पाथरी विधानसभा निवडणुक मी लढविनार असल्याचे परभणी जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे म्हणाले ते पञकार संघ कार्यालय मानवत येथे पञकारांशी चर्चा करत असताना बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,पुढिल विधानसभा निवडणुक शिवसेना स्वबळावर लढविनार आसुन पाथरी विधानसभा मी लढविनार आहे तसेच मी ऐन निवडणुकिच्या वेळेस पक्षाकडे उमेदवारी मागणारा व्यक्ती नाही किंवा पक्षाचा ए.बी.फार्म मिळाल्यानंतर कामाला लागनार नाही तर मी सतत पाच वर्षापासुन पाथरी विधानसभेत सामान्य नागरीकांची कामे करत असुन पक्षबांधणीसाठी ही काम करत आहेत असे ते यावेळी म्हणाले . शिवसेनेचे पक्ष निरीक्षक मा.ओमराजे निंबाळकर माजी आमदार पाथरी विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यास मानवत येथे आले असता त्या कार्यक्रमासाठी ते मानवतला आले असता पञकार संघाच्या कार्यलयास डॉ.संजय कच्छवे यांनी भेट दिली असता पञकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता ते बोलत होते.यावेळी शहर प्रमुख राजेश कच्छवे ,धनंजय दहे,गोविंद दहे,गणेश नाईक,सचीन बबलुजर,समाधान सोळंके ,रोहित अंधारे,नारायण बोचरे,सचीन बोचरे आदीसह शिवसैनीक मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment