मा.आ.बाबाजानी दुर्रानी पाथरी विधानसभा निवडणुक लढविणेच्या तय्यारीत
मानवत / मुस्तखीम बेलदार
आगामी विधानसभेची निवडणुकिचे बिगुल वाजले असुन यात मा.आ.बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरी विधानसभा लढवण्याची जोरदार तय्यारी सुरु केली असुन यासाठि ते कार्यकर्ते सह कामाला लागले आहे नागरिकांच्या भेटिगाठि घेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्यां गटात नुकतेच मा.आ.बाबाजानी दुर्रानी यांनी प्रवेश केला असुन त्यांना महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आसल्याचे बोलले जात आहे.
जनसामान्याचा आधार पाथरी विधानसभा मतदार संघात जनतेची कामे केली व करत आहेत मतदार संघातील गोरगरीब लोकांच्या अडचणी सोडविले गावागावात मूलभूत सुवि-सुविधा सोबतच समाज मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून दिला निधी देताना कधिच जात- धर्म पक्ष असा भेदभाव केला नाही बाबाजानी दुर्राणी यांची ओळख धर्मनिरपेक्ष राजकारणी म्हणून आहे.
आपल्या मतदारसंघात सर्व जाती धर्मातील लोकांच्या मनात बाबाजानी दुर्राणी हे आहेत..
पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला आमदार ,आपला नेता, असावा अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
विकासाच्या दृष्टिकोनातून पाथरी तालुक्याचा चेहरा मोहरा दुर्राणी यांनी बदलला आहे
आणि विकासाचा मॉडेल घेऊनच माजी आमदार बाबाजानी दुर्राणी ही पाथरी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारी मध्ये आहे.
लोकसभेच्या झालेल्या निवडणुकित मुस्लीम समाजाने माहाविकास आघाडिला एकगठ्ठा मतदान करुन उमेदवार निवडुण आणले होते परंतु झालेल्या विधानपरीषदेत एक हि मुस्लीम व्यक्तिला महाविकास आघाडिने उमेदवारी दिली नव्हती या बाबत मुस्लीम समाजातुन नाराजीचा सुर दिसला होता परंतु आगामी विधानसभेसाठि मुस्लीम चेहरा म्हणुन पाथरी विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन चालणारे कुठलाही प्रकारचा भेदभाव न करणारे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांना महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment