२४ ऑगस्ट रोजी परभणी येथे चर्मकार समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनराव घोलप यांच्या आदेशाने युवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे व अमर दांडेकर यांचा राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा परभणी च्या वतीने दिनांक २४ ऑगस्ट शनिवार सायंकाळी ठीक पाच वाजता परभणी येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राज्यव्यापी दौऱ्यानिमित्ताने चर्मकार समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.डी ठोंबरे व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे व अमर तांडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सौ प्रभावती अन्नपूर्वे मराठवाडा उपाध्यक्ष रामकिसन कांबळे , कर्मचारी अध्यक्ष प्रभाकर गायकवाड, जेष्ठ समाजसेवक सुग्रीव ठोंबरे,
परभणी जिल्हाध्यक्ष विनोद असोरे,
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष
सौ आशाताई ठोंबरे
महिला शहराध्यक्ष सौ अनिता असेवार
शहराध्यक्ष गोविंद असोरे
जिल्हा सचिव एम.जी.शेवाळे, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे या करीता परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सावली शासकीय विश्रामगृह परभणी येथे उपस्थित राहण्याचे आवाहान चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment