शिवसेना नेते सईद खान यांची मानोली गावकऱ्यांना गाव भेट
[] शिंदे शिवसेना शाखेचे मानोली येथे उदघाटन []
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत तालुक्यातील मानोली येथे आज दि ११ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी नऊ वाजता सईद खान यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे शिंदे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी सईद खान यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला व गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर ते बोलताना म्हणाले की मानोली ग्रामपंचायत ही शिंदे सैन्याची परभणी जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असल्यामुळे मानोली गावकऱ्यांना आम्हाला हक्काने मागण्याचा अधिकार आहे असे ते बोलताना म्हणाले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुंजाभाऊ नाना टाकळकर विठ्ठल काका रासवे पप्पू घाडगे अमोल भाले पाटील दादासाहेब टेगसे चक्रधर उगले गोपाळ साखरे शिवाजीराव वरखडे प्रमोद तारे संतोष शिंदे सुरेश मांडे गोपाळ शिंदे लक्ष्मण शिंदे पंडितराव शिंदे बन्सी दादा सुरवसे संतोष तळेकर शेख जब्बार रामकिसन तळेकर रमेश शिंदे ज्ञानोबा मांडे बालासाहेब शिंदे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
No comments:
Post a Comment