Thursday, August 1, 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ जेष्ठ नागरिकांनी घ्यावा - मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ जेष्ठ नागरिकांनी घ्यावा -  मुख्याधिकारी  श्रीमती कोमल सावरे
मानवत / मुस्तखीम बेलदार 
राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती त जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन: स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळी एक रखमी रु.३०००/-पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत डीबीटी प्रणाली द्वारे थेट हस्तांतरण करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत मानवत शहरातील सर्व ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांनी आपापले अर्ज योग्य कागदपत्रासह नगरपरिषद कार्यालयामध्ये सादर करावेत. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना रु. ३०००/- एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
सदरील रक्कम ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्र ड्रायपोड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट, सवाईकल कॉलर, इत्यादी सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी उपयोगात येणार आहेत. तरी मानवत शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा १००% लाभ घ्यावा.
मुख्यमंत्री वयोश्री योजना करिता आवश्यक कागदपत्रे- आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्राच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयामध्ये अर्ज सादर करावेत याचबरोबर शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे सुद्धा शहरातील पात्र महिलांनी ऑनलाइन स्वरूपात नारीशक्ती दूध ॲपच्या माध्यमातून, नगरपरिषदेने स्थापन केलेल्या मदत कक्षामार्फत किंवा १ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे  
ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत ॲट वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. 
ज्या पात्र इच्छुक लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थांनी या संकेतस्ताळावर जाऊन आपले अर्ज भरावेत
पोर्टल लिंक - www.ladkibahin.maharashtra.gov.in  यावर अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांनी शहरातिल नागरीकांना केले आहे.

No comments:

Post a Comment