आमदार बाजोरिया यांची डॉ. अंकुश लाड यांच्या निवांसस्थानी भेट
[] आमदार बिजोरीया यांनी युवानेते डॉ अंकुश लाड यांच्यां विकासकामाचे केले कौतुक []
मानवत / प्रतिनीधी
दिनांक ०६ ऑगस्ट रोजी मानवत शहरा मध्ये युवानेते डॉ अंकुश लाड यांच्या कार्यालयात शिवसेनेचे नेते आ . गोपीकिशनजी बिजोरीया व आमदार विप्लव बाजोरिया या पिता पुत्रांनी सदिच्छा भेट दिली असता डॉ.अंकुश लाड यांच्यावतीने त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले.या वेळेस बोलताना आमदार बिप्लव बाजोरिया म्हणाले की मानवत शहराचा विकास पाहुन अगदी माझे मन भारावून गेले आहे अंकुश भाऊ तुमचे कौतुक करायला माझ्या कडे शब्द कमी पडत आहेत अशा मौलिक शब्दात त्यांनी डॉ.अंकुश लाड यांचे कौतुक केले तुमच्या मानवत शहरातील कोणताही प्रश्न असो की , मानवत पाथरी सोनपेठ परळी वैजनाथ रेल्वे महामार्गा चा पाठपुरावा करून आपल्या मानवत शहरातील विकास कामांसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले. या वेळी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकजराव आंबेगावकर , नारायण राव भिसे, विष्णूपंत निर्वल ,प्रकाशजी पोरवाल , सुरेशजी काबरा , कृष्णासेठ बाकळे, यशसेठ कत्रुवार, ज्येष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक के डी वर्मा व मानवत पालिकेचे सर्व नगरसेवक , व्यापारी उपस्थित होते .
No comments:
Post a Comment