Friday, August 11, 2023

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मानवत येथील पञकारांच्या वतीने निषेध.

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मानवत येथील पञकारांच्या वतीने निषेध

मानवत / मुस्तखीम बेलदार 
पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांना झालेल्या मारहाण प्रकरणी तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन दि. ८ ऑगस्ट रोजी मानवत तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्यां  मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मानवत तालुका  व्हाईस आँफ मिडिया पञकार संघ मानवत च्या वतीने करण्यात आली आहे.
पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदिप महाजन यांना स्थानीक आमदार किशोर पाटील यांनी बातमी का लावली म्हणून शिवीगाळ करत धमकी दिली. समाजमाध्यमांवर तशी त्यांची ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे. सदर आँडिओ क्लिप आपलीच असल्याचे आ. पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मान्य ही केले आहे. त्यानंतर महाजन यांना भर चौकात काही गुंडांनी बेदम मारहाण केली.त्यात महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर मारहाण ही आ. किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे. या घटनेमुळे राज्यातील पत्रकारात दहशत निर्माण झाली आहे. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मानवत व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. या घटनेमुळे पत्रकार व त्यांच्या कुटूंबात भितीचे वातावरण पसरले असून सदर घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर व्हाइस आँफ मिडिया चे मानवत तालुकाध्यक्ष  कचरुलाला बारहाते, सत्यशील धबडगे, अलिम पटेल,किशन बारहाते,श्याम झाडगावकर, इरफान बागवान, विलास बारहाते, रमेश यादव,हफिज बागवान,सचिन मगर,रियाज शेख यांच्यां स्वाक्षरी  आहेत.

No comments:

Post a Comment