हारेगाव येथील जातीयवादी गावगुंडावर कठोर कारवाई करण्याची मानवत येथील आंबेडकरी समाज बांधवाची मागणी
मानवत / मुस्तखीम बेलदार
मौजे हारेगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर येथील जातीवादी गाव गुंडावर अँट्रॉसीटी अँक्ट नुसार व जीवे मारण्याच्या उदद्देशाने मारहान केल्या बाबत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी व त्यांची मालमत्ता जप्त करून पिडीतांना देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मानवत येथील आंबेडकरी समाज बांधवाच्या वतीने पल्लवी टेमकर तहसिलदार मानवत मार्फत मुख्यमंत्री यांना दि.३१ आँगस्ट रोजी देण्यात आले आहे .
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मौजे हारेगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर येथील जातीवादी गावगुंड युवराज गलांडे पाटील व त्याचे चार ते पाच साथीदारांनी कबुतर व शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन बौध्द तरुण शुभम माघाडे यास जेवन करीत असतांना घरातुन उचलून नेले व त्यास झाडाल उलटे टांगुन व नग्न करून मारहान केली अंगावर लघवी सुध्दा केली व थुंकी चाटायला लावली, तसेच घृणास्पद तिरस्काराने जातीय मानसीकतेतुन शिवीगाळ व अपमान करून लाथाबुक्याने व काठयाने मारहान व हिंसा केली. अशा काळीमा फासणाऱ्या घटनेचा तिव्र निषेध करून संबंधीत घटनेवरील सर्व आरोपींवर अँट्रोसिटी अँक्ट नुसार व इतर मारहाणीचे कलमे लावून कायदयाने कठोर कार्यवाही करण्यात यावी व सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करून पिडीतास देण्यात यावी किंवा शासनाने जप्त करून घ्यावी व पिडीताला पोलीस संरक्षण देण्यात यावे.
अन्यथा सर्व आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरुन संविधानाने दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असे नमुद केले आहे.
निवेदनावर समाजसेवक रविभाऊ पंडीत , आदर्श धबडगे ,राहुल कुंभकर्ण ,
,सुरज खरात, अनिल बुरखंडे ,कुंदन पारवे,प्रशांत पौळ,कृष्णा मोहिते,प्रितम ढवळे,अक्षय साळवे ,शेख मुज्जु यांच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:
Post a Comment