Monday, August 14, 2023

आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी घेतली राज बेलदार संघटनाच्या वतीने सुरु असलेल्या उपोषणास्थळी भेट

आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी घेतली राज बेलदार संघटनाच्या वतीने सुरु असलेल्या  उपोषणास्थळी भेट 

परभणी / प्रतिनीधी 
राजबेलदार समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य  च्या वतिने परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती च्या विरुध्द प्राणांतिक उपोषणास सुरुवात दि.१४ आँगस्ट रोजी पासुन जिल्हाधिकारी कार्यालय समोर  सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त  श्रीमती छाया कुलाल यांची बदली रद्द करून समितीला व प्रस्ताव धारकाना वाचवा , समिती मध्ये गेल्या अनेक वर्षापासुन ठाण मांडुन बसलेले ब्रिक्स कंपणी चे कंत्राटी कर्मचारी नामे संजय आरगडे व परमेश्वर पवार यांची त्वरित हकाल पट्टी करावी आदी मागण्यासाठी 
राजबेलदार समाज सेवा मंडळाचे सय्यद विखार ईलाहि व  परभणी राज बेलदार सघटनेचे  पदाधिकारी उपोषणास बसले आहे. या उपोषणस्थळी आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी भेट घेऊन राज बेलदार संघटनाच्या कार्यकर्तेशी चर्चा करुन 
संबधित विभागास  आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सर्वतोपरी  प्रयत्न करु असे आश्वासन दिले.यावेळी राज बेलदार समाजसेवा मंडळाचे राज्य अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment