युवानेते डॉ.अंकुशभाऊ लाड यांच्या प्रयत्नामुळे श्रीमती सुनीता वाढकर यांना अनुकंपा श्रेणीतून मिळाली नोकरी
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत नगरपरिषदेच्या बांधकाम विभागात स्व. राजेभाऊ वाडकर हे लिपिक म्हणून कार्यरत होते. कामावर रुजू असताना गतवर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात घरात कोणीही कर्ता व्यक्ती नसल्याने कुटुंबियांवर संकट कोसळले होते.
ही गोष्ट मा.नगरसेवक दत्ताभाऊ चौधरी व राजेभाऊ यांच्या आई या दोघांनी युवानेते डॉ. अंकुशभाऊ लाड यांना कळवली असता डॉक्टर साहेबांनी तात्काळ सूत्र हलवून मुख्याधिकारी, बांधकाम विभाग आदींशी संपर्क केले त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असुन स्व. राजेभाऊ यांच्या पत्नी श्रीमती सुनीता वाढकर यांना अनुकंपा श्रेणीतून नौकरीत समाविष्ट करण्यात आले आहे खऱ्या अर्थाने राजेभाऊ यांना डॉ.अंकुशभाऊ लाड साहेबांकडून ही श्रद्धांजली ठरली आहे.
माळी समाज बांधवांच्या वतीने डॉ. अंकुशभाऊ लाड, मुख्याधिकारी कोमल सावरे मॅडम व बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता सय्यद अन्वर भाई यांचे जाहीर आभार मानले आहे.
No comments:
Post a Comment