Friday, August 18, 2023

मानवत शहरात निर्भया पथक ची करडि नजर


मानवत शहरात निर्भया पथक ची करडि नजर
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरात मा.पोलीस अधीक्षक रागसुधा मॅडम यांच्या आदेशाने पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक, निर्भया पथक यांच्यावतीने मानवत शहरातील शाळा व महाविद्यालय कोचिंग क्लासेस या परिसराला भेट देऊन मुला मुलींच्या अडचणी जाणून घेतल्या व तसेच त्यांना काही मार्गदर्शनही केले.
कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास पोलीस निरीक्षक (9923422425) किंवा डायल 112,दामिनी पथक ,निर्भया पथकचे  हिना शेख ( 9579841184),  नरेंद्र कांबळे ( 8888802130 ),  सय्यद फय्याज(  9421568683) यांना संपर्क करावा, रोडरोमियो ,भरधाव वेगाने वाहन चालवणारे,बुलेटचा फटाके सारखा आवाज करणारे यांची आता कसलीही गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक  दिपक दंतुलवार यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment