Friday, April 30, 2021

मानवत येथील सर्पमिञ गोपाळ गिरी यांनी दिले सायाळ ला जिवदान.

सर्पमिञ गोपाळ गिरी यांनी  दिले सायाळ ला जिवदान
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२३: मानवत शहरातील बौध्दनगर येथे एका खड्यात सायाळ  वावरताना  दि. ३० एप्रिल रोजी आदेश धबडगे यांना दिसला यासाठी तात्काळ मानवत शहरातील सर्पमित्र गोपाळ गिरी यांना
आदेश धबडगे यांनी दूरध्वनीद्वारे  बोलावून घेतले  गोपाळ गिरी यांनी घटनास्थळी दाखल होत मोठ्या शिताफीने सायाळला धरून पिशवीत सुखरूप टाकुन शेतात  सुरक्षित पणे  सोडून देण्यात आले. मानवत तालुक्यात कोठेही अजगर, मन्यार आदी साप सापडल्यास त्यांना नागरिकांनी मारु नये त्यांना जिवदान द्यावे  यासाठी तात्काळ  सर्पमित्र गोपाळ गिरी यांना दूरध्वनी क्रमांक ९१५६९७०२१५ या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन सर्पमित्र गोपाळ गिरी यांनी केले आहे.

Thursday, April 29, 2021

युवा नेते डाॅ.अकूंश लाड यांच्या प्रयत्नाने व विज वितरण कंपनीच्या सहकार्याने घरकूल लाभार्थ्यांचा प्रश्न सूटला.

युवा नेते डाॅ.अकूंश लाड यांच्या प्रयत्नाने व विज वितरण कंपनीच्या सहकार्याने घरकूल लाभार्थ्यांचा प्रश्न सूटला.

मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ मधिल जिजाऊ नगर मोदकेश्वर मंदिर परिसरातील हमालवाडी वसाहती मधील वास्तव्याला असलेल्या  येथील रेखा देविदास कांबळे प्लाट नंबर  ( ७ ) आणि सुनिता संजय राठोड प्लाट नंबर  ( ६ ) यांच्या घरावरून विद्यूत वाहिणी लाईन ची तार गेली असल्याने त्यांच्या घरकुला चे बांधकाम दोन वर्षा पासून रखडले होते. या संबंधीची माहीती मुरलीधर ठोंबरे यांनी मानवत नगर परिषदेचे शिल्पकार , युवा नेते डॉ. अंकुश भाऊ लाड यांच्याशी संपर्क साधून या विषयी संपूर्ण माहीती दिली तसेच या भागातील नागरीकांची अडचन, समस्या त्यांना सांगीतली  तसेच घरकूल धारक लाभार्थी यांच्या घरावरून लाईन ची तार गेली असल्याने त्यांच्या घरकुलाचे बांधकाम दोन वर्षा पासून रखडले आहे. याची दखल घेऊन  युवा नेते डॉ. अकूंश लाड  यांनी  नगर परिषदेचा विद्यूत विभाग व विज वितरन कंपनीशी चर्चा करून या भागातील नागरीकांचा प्रश्न मांडला व विज वितरन कंपनीच्या सहकार्यांने या भागातून लाभार्थ्यांच्या घरावरून गेलेले विज वितरन कंपनीचे तार काढून घेऊन लाभार्थ्या सह या भागातील नागरीकांचा अनेक दिवसाचा प्रश्न मार्गी लावला . 
त्यामूळे या भागातील दोन वर्षां पासून रखडलेले घरकुल चे बांधकाम आता सुरू होईल. व हक्काचा निवारा मिळेल अशी आशा या भागातील नागरीकातून पल्लवित झाल्या आहेत.
मानवत नगर परिषदेचे शिल्पकार  युवा नेते डाॅ. अकूंश लाड यांनी अवघ्या दोन दिवसात घरावरून लाईन ची तार काढून सहकार्य केल्या बद्दल   विकास पुरूष डॉ. अंकुश  लाड यांच्या सहकार्याने काम  मार्गी लागले त्या बद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे  तालुका अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी डॉ. अंकुश  लाड  यांचे आभार  मानले केले.

Tuesday, April 27, 2021

मानवत येथील अर्शिन नजातुल्ला खान यांचा पहिला रोजा

मानवत येथील अर्शिन नजातुल्ला खान यांचा पहिला रोजा 
मानवत मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरातील खडकपुरा  परीसरातील रहिवासी अर्शिन नजातुल्ला खान वय १० वर्ष या  चिमुकलीने पविञ रमजान महिण्याचे औचित्य साधुन  २५ एप्रिल रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास )पुर्ण केला आहे.रमजान महिण्याच्या रोजाला मुस्लीम बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व असुन या महिण्यात मुस्लीम बांधव सलग महिणाभर रोजा ठेवुन विविध धार्मिक कार्य पार पाडतात व अल्लाहची आराधना करतात आणी याच महिण्यात लहान मुले हि आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात याचीच प्रचिती म्हणुन अर्शिन नजातुल्ला खान
या चिमुकलीने  तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पुर्ण केल्या बद्दल 
मुलीचे वडिल नजातुल्ला  खान सर , माजी नगरसेवक नियामत खान ,  मंनसब खान,
 जफर खान, अमन खान 
आदीनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

Monday, April 26, 2021

संचारबंदिचे ऊल्लघंन करणाऱ्यावर पोलीस उपनिरिक्षक नागनाथ तुकडे यांची कारवाई

संचारबंदिचे ऊल्लघंन करणाऱ्यावर  पोलीस  उपनिरिक्षक नागनाथ तुकडे यांची कारवाई 

मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरात संचारबंदी असतानाहि  काही मंडळी युवा वर्ग  मेडिकल व दवाखानाच्या  नावाखाली बिनधानस्तपणे शहरात फिरतांना दिसून येत आहे यामुळे रस्त्यावर गर्दी होताना दिसत होती यामुळे मानवत पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यदक्ष अशी शहरात ओळख असणारे   पोलीस  उपनिरिक्षक नागनाथ तुकडे यांनी संचारबंदिचे ऊल्लघंन करणाऱ्यावर दंडात्मक  कारवाई केली आहे.
नागरिकांनी  कोरोना नियमाचे पालन करावे घरीच राहून सुरक्षित रहा,अतिआवश्यक कामासाठीच घराच्या बाहेर निघावे.घराबाहेर निघताना माक्सचा वापर करावा ,सतत सँनिटाईजरचा वापर करावा, आणि सामाजिक अंतर  ठेवावे असे   पोलीस उपनिरीक्षक नागनाथ  तुकडे यांनी वारंवार नागरिकांना समजावूनहि गर्दी होत असल्यामुळे  विनाकारण फिरणाऱ्यावर तसेच विना मास्क  लोकांविरुध्द दंडात्मक कारवाई केली आहे.

Sunday, April 25, 2021

अनील जाधव यांच्या पुढाकारातुन मानवत शिवसेना मदत केंद्राच्या वतीने कोव्हिड रूग्णांना पोषक आहार वाटप

मानवत शिवसेना मदत केंद्राच्या वतीने कोव्हिड रूग्णांना पोषक आहार वाटप
मानवत / मुस्तखीम बेलदार 
खासदार संजय जाधव साहेब यांच्या आदेशाने व मा.शिवसेना शहरप्रमुख  अनिल जाधव यांच्या पुढाकारातुन शिवसेना मदत केंद्राच्या वतीने मानवत शहरात कोव्हिड रूग्णांना बदाम,नारळ पाणी,चिकु,अंगूर , २५ किलो बदाम,१०००हजार अंडी , ५०कॕरेट फळांचा  पुरवठा शिवसेना मदत केंद्र मानवत च्या वतीने कोव्हिड रूग्णांना  करण्यात येणार आहे.यावेळी 
उपविभागीय अधिकारी श्री.निकाळजे साहेब,
तहसीलदार श्री.फुफाटे साहेब,
पि.आय.स्वामी साहेब,
डॉ.चव्हाण साहेब,
मा.शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव,
नरेश गौड, विलास देशमुख,बंडू तुरे,सचिन मगर,आप्पा भिसे,दिपक बारहाते,पिंटू फल्ले,शिवहार वकील,नितीन मगर,योगेश चटाले,विनायक बालकुंड,अर्जून तुम्मेवार व इतर शिवसैनिक उपस्थित होते .



Friday, April 23, 2021

शिक्षणसेवकांना कोव्हिड १९ च्या कामात विमा सुरक्षा कवच देण्याची शिक्षणसेवकांची मागणी.

शिक्षणसेवकांना कोव्हिड १९ च्या कामात विमा सुरक्षा कवच देण्याची शिक्षणसेवकांची मागणी

औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 

औरंगाबाद महानगरपालीका मध्ये सप्टेंबर २०१९ पासुन शिक्षणसेवक म्हणुन नवनिर्वाचित शिक्षकाची भरती झालेली आहे  परंतु मागील वर्षापासुन कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे  शिक्षणसेवकांना कोव्हिड १९ च्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे आरोग्य विभागात विविध कोरोनाच्या कार्यासाठी ड्युटि महानगरपालीका प्रशासनाच्या वतीने  देण्यात येत आहे शिक्षकहि यास प्रतिसाद देत असुन राष्ट्रीय आपदामध्ये आपले व आपले परीवाराचे जिव धोक्यात घालुन काम करत आहे परंतु या शिक्षकांना  नियमित शिक्षकाप्रमाणे कोणतेही नियम लागु नाहित जर यांना कोरोना ची लागण झाली तर यांना कोणताही शासकिय लाभ मिळणार नाहि औरंगाबाद महानगरपालिका मध्ये सप्टेंबर २०१९ पासून कार्य करत असलेले शिक्षक सध्या उद्भवलेले कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव असल्याने मागील वर्षापासून कोव्हिड  सेंटर ,वाँर रुम आणि कोरंटाईन  सेंटरच्या विविध ठिकाणी कार्य पार पाडत आहेत व याही वर्षी कर्तव्य करत आहेत  शिक्षण सेवक फक्त सहा हजार तुटपुज्यां  मानधनावर काम करत आहेत  तसेच नियमित शिक्षकाचे कोणतेच नियम शिक्षण सेवक वर लागू होत नाही तरी पण कोव्हिड १९ चे कर्तव्य अविरतपणे करत आहेत आणि पुढेही या राष्ट्रीय आपत्तींना तोंड देण्यासाठी शिक्षक तयार आहेत मागील वर्षापासुन आजपर्यंत राज्यातील विविध जिल्हयातील पाच शिक्षणसेवक कोरोना मुळे दगावले आहे त्यांना व त्यांच्या परीवारांना कोणताही शासकिय लाभ शासनाकडुन  मिळालेला नाहि  कर्तव्य  करत असताना शिक्षण सेवकांच्या  संरक्षणाचा शासनाने हि  विचार करावा व त्यांना नियमित शिक्षकाप्रमाणेहि त्यांना विमा सुरक्षा कवच  सह सर्व सोयी सुविधा द्यावेत अशी  मागणी शिक्षणसेवकांतुन होत आहे.

औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीसांना जेवन व पाणी बॉटलचे वाटप

 औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीसांना जेवन व पाणी बॉटलचे वाटप

औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद यांच्या वतीने लॉकडाऊन च्या काळात जनतेच्या रक्षणासाठी  अहोरात्र परिश्रम करनारे पोलिस कर्मचारी यांना जेवन व पानी बॉटल चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष बब्बू भाई कुरेशी यांनी केले होते .यावेळी  वेळी ए सी पी  भापकर साहेब ,पी आय दराडे साहेब ,शहर जिल्हाअध्यक्ष  विजय भाऊ साळवे , जिल्हा उपाध्यक्ष रफिक भाईजी,शहर जिल्हा कार्यआध्यक्ष अभिषेक भय्या देशमुख  , विशाल पुंड , सरफराज भाई कुरेशी ,हमिद मिर्ज़ा बेग आदी उपस्थित होते.

Sunday, April 18, 2021

अधिस्वीकृतीधारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनाची संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते

अधिस्वीकृती धारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनासाठी संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते
मानवत / मुस्तखीम बेलदार 
जागतिक महामारी असलेल्या कोरोना आजाराने राज्यात थैमान घातले असून कोरोना आजार आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना  करण्यात येत असुन कोरोना  रुग्णांची वाढती संख्या खंडित करण्यासाठी राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे दरम्यान या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर घटकांना या संचारबंदीत बाहेर फिरता येणार नाही कोरांना ची साखळी तोडण्यासाठी आणि महामारी चे संकट रोखण्यासाठी सरकारने निर्णय घेताना केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच संचार बंदी च्या निर्बंधातून सूट दिली आहे राज्यात अधिस्विकृतीधारक पत्रकाराची संख्या नाममात्र असून प्रत्यक्ष वृत्त संकलनाचे काम करणाऱ्या माध्यमातील पत्रकारांची मोठी अडचण होत आहे कोरोना चे संकट रोखण्यासाठी प्रशासनाला योग्य दिशा दाखवण्याचे आणि जनतेला जागृत करण्याचे काम माध्यमात काम करणारे पत्रकार करत असतात मात्र विविध माध्यमात काम करणाऱ्या बहुतांशी पत्रकारांकडे अधिस्वीकृती पत्रिका नसल्यामुळे संचार बंदी च्या काळामध्ये वृत्तसंकलन करण्यास अडचणीचे होऊन याचा प्रशासन आणि शासनाला फटका बसेल जनतेला योग्य माहिती मिळणार नाही जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे नोंद असलेल्या वृत्तपत्र ,वृत्तवाहिन्या डिजिटल मीडियात काम करणाऱ्या  पत्रकारांना संचार बंदी च्या नियमातून सूट द्यावी यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशन बारहाते  यांनी दैनिक गाववाला शी  बोलताना केली आहे.

अधिस्वीकृती धारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनासाठी संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते

अधिस्वीकृती धारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनासाठी संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते
मानवत / मुस्तखीम बेलदार 
जागतिक महामारी असलेल्या कोरोना आजाराने राज्यात थैमान घातले असून कोरोना आजार आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना  करण्यात येत असुन कोरोना  रुग्णांची वाढती संख्या खंडित करण्यासाठी राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे दरम्यान या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर घटकांना या संचारबंदीत बाहेर फिरता येणार नाही कोरांना ची साखळी तोडण्यासाठी आणि महामारी चे संकट रोखण्यासाठी सरकारने निर्णय घेताना केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच संचार बंदी च्या निर्बंधातून सूट दिली आहे राज्यात अधिस्विकृतीधारक पत्रकाराची संख्या नाममात्र असून प्रत्यक्ष वृत्त संकलनाचे काम करणाऱ्या माध्यमातील पत्रकारांची मोठी अडचण होत आहे कोरोना चे संकट रोखण्यासाठी प्रशासनाला योग्य दिशा दाखवण्याचे आणि जनतेला जागृत करण्याचे काम माध्यमात काम करणारे पत्रकार करत असतात मात्र विविध माध्यमात काम करणाऱ्या बहुतांशी पत्रकारांकडे अधिस्वीकृती पत्रिका नसल्यामुळे संचार बंदी च्या काळामध्ये वृत्तसंकलन करण्यास अडचणीचे होऊन याचा प्रशासन आणि शासनाला फटका बसेल जनतेला योग्य माहिती मिळणार नाही जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे नोंद असलेल्या वृत्तपत्र ,वृत्तवाहिन्या डिजिटल मीडियात काम करणाऱ्या  पत्रकारांना संचार बंदी च्या नियमातून सूट द्यावी यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशन बारहाते यांनी केली आहे.

Friday, April 16, 2021

परभणी येथील शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न

शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न 
परभणी / प्रतिनीधी 
परभणी शहरातील मेहराज नगर परीसरातील रहिवासी शेख शाहेद शेख सिराज वय ९ वर्ष या चिमुकल्याने पविञ रमजान महिण्याचे औचित्य साधुन १६ एप्रिल रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास )पुर्ण केला आहे.रमजान महिण्याच्या रोजाला मुस्लीम बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व असुन या महिण्यात मुस्लीम बांधव सलग महिणाभर रोजा ठेवुन विविध धार्मिक कार्य पार पाडतात व अल्लाहची आराधना करतात आणी याच महिण्यात लहान मुले हि आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात याचीच प्रचिती म्हणुन नऊ वर्षिय शेख शाहेद शेख सिराज या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पुर्ण केला या बद्दल शेख शाहेद याचे आई, वडिल शेख सिराज आदीनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे

परभणी येथील शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न .

शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न 
परभणी / प्रतिनीधी 
परभणी शहरातील मेहराज नगर परीसरातील रहिवासी शेख शाहेद शेख सिराज वय ९ वर्ष या चिमुकल्याने पविञ रमजान महिण्याचे औचित्य साधुन १६ एप्रिल रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास )पुर्ण केला आहे.रमजान महिण्याच्या रोजाला मुस्लीम बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व असुन या महिण्यात मुस्लीम बांधव सलग महिणाभर रोजा ठेवुन विविध धार्मिक कार्य पार पाडतात व अल्लाहची आराधना करतात आणी याच महिण्यात लहान मुले हि आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात याचीच प्रचिती म्हणुन नऊ वर्षिय शेख शाहेद शेख सिराज या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पुर्ण केला या बद्दल शेख शाहेद याचे आई, वडिल शेख सिराज आदीनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे

Monday, April 12, 2021

मानवत येथे लाईफ लाईन हॉस्पिटलचे उदघाटन मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद ईसाक यांच्या हस्ते संपन्न

मानवत येथे लाईफ लाईन हॉस्पिटलचे शुभारंभ 
मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत येथे डॉ.अलीम सय्यद व डॉ.सौ.आरजु सय्यद या डॉक्टर दामपत्यांचे  लाईफ लाईन हॉस्पिटलचे शुभारंभ दि.१२ एप्रिल रोजी तलाब कट्टा रोड जुने रजिस्ट्रि आँफिस जवळ  मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद ईसाक यांच्या हस्ते उदघाटन  करण्यात आले .यावेळी मौलाना असलम,संजय नाईक,ओमभाऊ चव्हाण ,मौलाना मुजाहेद,सय्यद सत्तार,अमानुल्ला खान,अकबर अन्सारी ,सय्यद ईस्माईल ,सय्यद कलीम,शेख समीर आदी उपस्थीत होते..

Sunday, April 11, 2021

राज बेलदार समाजाने कोविड लसीकरण करुन घ्यावे - सय्यद अबरार ईलाहि

राज बेलदार समाजाने कोविड लसीकरण करुन घ्यावे -  सय्यद अबरार ईलाहि 
मानवत / मुस्तखीम बेलदार 

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सुरक्षीत अंतर व सतत हात साबणाने स्वच्छ करणे या त्रिसूत्रीच्या पालनासह कोविडचे लसीकरण मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे  शासनाच्या निर्देशाप्रमाणे शहरी व  ग्रामीण भागात लसीकरण वाढावे यासाठी कोविड लसीकरण मोहिमेमध्ये राज बेलदार समाजातील  नागरीकांनी सहभाग घेऊन ४५ वर्ष वरील सर्व नागरीकांनी लस घ्यावी असे आवाहान राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि यांनी केले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील जेष्ठ मंडळी व गावातील नागरिकांनी  शंभर टक्के लसीकरण करून घ्यावे 
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून जेष्ठ मंडळींचे सरंक्षण व्हावे म्हणून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी  पुढाकार घेणे महत्त्वाचे  आहे यात कोणताही साईड ईफेक्ट नाहि १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्ष वयोगटावरील नागरिकांना कोरोनाची लस आरोग्य विभागाकडुन  देण्यास सुरुवात झाली आहे  राज बेलदार समाजातील नागरिकांनी आपल्या व  कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आवर्जून लस घ्यावी असे आवाहन राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि यांनी केले आहे.

Saturday, April 10, 2021

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती घरातच साजरी करा - प्रा .विठ्ठल तळेकर

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती घरातच साजरी करा - प्रा .विठ्ठल तळेकर

मानवत / मुस्तखीम बेलदार 
 विचारवंत, समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञानी, बांधकामव्यावसायिक ,संपादक  ,कवी ,नाटककार,छत्रपती चा  पहिला पोवाडा रचणारे, महाराष्ट्रातील क्रांतिकारक म्हणून ओळखले जात असे 
भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते चुल आणि मुलं हे गुलामगिरी चे साखळदंड मोडीत काढण्याचे काम फुले दाम्पत्याने केले त्याचे योगदान  अमूल्य आहे 
त्यांचे उपकार कधीही न फिटणारे आहे 
११ एप्रिल रोजी ची त्यांची  जयंती सर्व फुले प्रेमी नी  कोरोना ची परिस्थिती पाहता प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करुन घरातच  राहून जयंती साजरी करावी किमान एक दिवस तरी फुलेंच्या विचारांची रुजवन आपल्या मुलांवर करावी  आणि जयंती साजरी करावी असे आव्हान प्रा .विठ्ठल तळेकर 
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद परभणी तथा प्रदेश संघटन सचिव राष्ट्रवादी ओबीसी सेल तर्फे करण्यात आले आहे.