Monday, April 26, 2021

संचारबंदिचे ऊल्लघंन करणाऱ्यावर पोलीस उपनिरिक्षक नागनाथ तुकडे यांची कारवाई

संचारबंदिचे ऊल्लघंन करणाऱ्यावर  पोलीस  उपनिरिक्षक नागनाथ तुकडे यांची कारवाई 

मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरात संचारबंदी असतानाहि  काही मंडळी युवा वर्ग  मेडिकल व दवाखानाच्या  नावाखाली बिनधानस्तपणे शहरात फिरतांना दिसून येत आहे यामुळे रस्त्यावर गर्दी होताना दिसत होती यामुळे मानवत पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यदक्ष अशी शहरात ओळख असणारे   पोलीस  उपनिरिक्षक नागनाथ तुकडे यांनी संचारबंदिचे ऊल्लघंन करणाऱ्यावर दंडात्मक  कारवाई केली आहे.
नागरिकांनी  कोरोना नियमाचे पालन करावे घरीच राहून सुरक्षित रहा,अतिआवश्यक कामासाठीच घराच्या बाहेर निघावे.घराबाहेर निघताना माक्सचा वापर करावा ,सतत सँनिटाईजरचा वापर करावा, आणि सामाजिक अंतर  ठेवावे असे   पोलीस उपनिरीक्षक नागनाथ  तुकडे यांनी वारंवार नागरिकांना समजावूनहि गर्दी होत असल्यामुळे  विनाकारण फिरणाऱ्यावर तसेच विना मास्क  लोकांविरुध्द दंडात्मक कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment