Sunday, April 18, 2021

अधिस्वीकृतीधारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनाची संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते

अधिस्वीकृती धारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनासाठी संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते
मानवत / मुस्तखीम बेलदार 
जागतिक महामारी असलेल्या कोरोना आजाराने राज्यात थैमान घातले असून कोरोना आजार आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना  करण्यात येत असुन कोरोना  रुग्णांची वाढती संख्या खंडित करण्यासाठी राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे दरम्यान या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर घटकांना या संचारबंदीत बाहेर फिरता येणार नाही कोरांना ची साखळी तोडण्यासाठी आणि महामारी चे संकट रोखण्यासाठी सरकारने निर्णय घेताना केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच संचार बंदी च्या निर्बंधातून सूट दिली आहे राज्यात अधिस्विकृतीधारक पत्रकाराची संख्या नाममात्र असून प्रत्यक्ष वृत्त संकलनाचे काम करणाऱ्या माध्यमातील पत्रकारांची मोठी अडचण होत आहे कोरोना चे संकट रोखण्यासाठी प्रशासनाला योग्य दिशा दाखवण्याचे आणि जनतेला जागृत करण्याचे काम माध्यमात काम करणारे पत्रकार करत असतात मात्र विविध माध्यमात काम करणाऱ्या बहुतांशी पत्रकारांकडे अधिस्वीकृती पत्रिका नसल्यामुळे संचार बंदी च्या काळामध्ये वृत्तसंकलन करण्यास अडचणीचे होऊन याचा प्रशासन आणि शासनाला फटका बसेल जनतेला योग्य माहिती मिळणार नाही जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे नोंद असलेल्या वृत्तपत्र ,वृत्तवाहिन्या डिजिटल मीडियात काम करणाऱ्या  पत्रकारांना संचार बंदी च्या नियमातून सूट द्यावी यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशन बारहाते  यांनी दैनिक गाववाला शी  बोलताना केली आहे.

No comments:

Post a Comment