क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती घरातच साजरी करा - प्रा .विठ्ठल तळेकर
मानवत / मुस्तखीम बेलदार
विचारवंत, समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञानी, बांधकामव्यावसायिक ,संपादक ,कवी ,नाटककार,छत्रपती चा पहिला पोवाडा रचणारे, महाराष्ट्रातील क्रांतिकारक म्हणून ओळखले जात असे
भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते चुल आणि मुलं हे गुलामगिरी चे साखळदंड मोडीत काढण्याचे काम फुले दाम्पत्याने केले त्याचे योगदान अमूल्य आहे
त्यांचे उपकार कधीही न फिटणारे आहे
११ एप्रिल रोजी ची त्यांची जयंती सर्व फुले प्रेमी नी कोरोना ची परिस्थिती पाहता प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करुन घरातच राहून जयंती साजरी करावी किमान एक दिवस तरी फुलेंच्या विचारांची रुजवन आपल्या मुलांवर करावी आणि जयंती साजरी करावी असे आव्हान प्रा .विठ्ठल तळेकर
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद परभणी तथा प्रदेश संघटन सचिव राष्ट्रवादी ओबीसी सेल तर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment