शिक्षणसेवकांना कोव्हिड १९ च्या कामात विमा सुरक्षा कवच देण्याची शिक्षणसेवकांची मागणी
औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार
औरंगाबाद महानगरपालीका मध्ये सप्टेंबर २०१९ पासुन शिक्षणसेवक म्हणुन नवनिर्वाचित शिक्षकाची भरती झालेली आहे परंतु मागील वर्षापासुन कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे शिक्षणसेवकांना कोव्हिड १९ च्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे आरोग्य विभागात विविध कोरोनाच्या कार्यासाठी ड्युटि महानगरपालीका प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे शिक्षकहि यास प्रतिसाद देत असुन राष्ट्रीय आपदामध्ये आपले व आपले परीवाराचे जिव धोक्यात घालुन काम करत आहे परंतु या शिक्षकांना नियमित शिक्षकाप्रमाणे कोणतेही नियम लागु नाहित जर यांना कोरोना ची लागण झाली तर यांना कोणताही शासकिय लाभ मिळणार नाहि औरंगाबाद महानगरपालिका मध्ये सप्टेंबर २०१९ पासून कार्य करत असलेले शिक्षक सध्या उद्भवलेले कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव असल्याने मागील वर्षापासून कोव्हिड सेंटर ,वाँर रुम आणि कोरंटाईन सेंटरच्या विविध ठिकाणी कार्य पार पाडत आहेत व याही वर्षी कर्तव्य करत आहेत शिक्षण सेवक फक्त सहा हजार तुटपुज्यां मानधनावर काम करत आहेत तसेच नियमित शिक्षकाचे कोणतेच नियम शिक्षण सेवक वर लागू होत नाही तरी पण कोव्हिड १९ चे कर्तव्य अविरतपणे करत आहेत आणि पुढेही या राष्ट्रीय आपत्तींना तोंड देण्यासाठी शिक्षक तयार आहेत मागील वर्षापासुन आजपर्यंत राज्यातील विविध जिल्हयातील पाच शिक्षणसेवक कोरोना मुळे दगावले आहे त्यांना व त्यांच्या परीवारांना कोणताही शासकिय लाभ शासनाकडुन मिळालेला नाहि कर्तव्य करत असताना शिक्षण सेवकांच्या संरक्षणाचा शासनाने हि विचार करावा व त्यांना नियमित शिक्षकाप्रमाणेहि त्यांना विमा सुरक्षा कवच सह सर्व सोयी सुविधा द्यावेत अशी मागणी शिक्षणसेवकांतुन होत आहे.
No comments:
Post a Comment