राज बेलदार समाजाने कोविड लसीकरण करुन घ्यावे - सय्यद अबरार ईलाहि
मानवत / मुस्तखीम बेलदार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सुरक्षीत अंतर व सतत हात साबणाने स्वच्छ करणे या त्रिसूत्रीच्या पालनासह कोविडचे लसीकरण मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे शासनाच्या निर्देशाप्रमाणे शहरी व ग्रामीण भागात लसीकरण वाढावे यासाठी कोविड लसीकरण मोहिमेमध्ये राज बेलदार समाजातील नागरीकांनी सहभाग घेऊन ४५ वर्ष वरील सर्व नागरीकांनी लस घ्यावी असे आवाहान राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि यांनी केले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील जेष्ठ मंडळी व गावातील नागरिकांनी शंभर टक्के लसीकरण करून घ्यावे
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून जेष्ठ मंडळींचे सरंक्षण व्हावे म्हणून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे यात कोणताही साईड ईफेक्ट नाहि १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्ष वयोगटावरील नागरिकांना कोरोनाची लस आरोग्य विभागाकडुन देण्यास सुरुवात झाली आहे राज बेलदार समाजातील नागरिकांनी आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आवर्जून लस घ्यावी असे आवाहन राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि यांनी केले आहे.
अभिनंदन
ReplyDelete