शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न
परभणी / प्रतिनीधी
परभणी शहरातील मेहराज नगर परीसरातील रहिवासी शेख शाहेद शेख सिराज वय ९ वर्ष या चिमुकल्याने पविञ रमजान महिण्याचे औचित्य साधुन १६ एप्रिल रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास )पुर्ण केला आहे.रमजान महिण्याच्या रोजाला मुस्लीम बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व असुन या महिण्यात मुस्लीम बांधव सलग महिणाभर रोजा ठेवुन विविध धार्मिक कार्य पार पाडतात व अल्लाहची आराधना करतात आणी याच महिण्यात लहान मुले हि आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात याचीच प्रचिती म्हणुन नऊ वर्षिय शेख शाहेद शेख सिराज या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पुर्ण केला या बद्दल शेख शाहेद याचे आई, वडिल शेख सिराज आदीनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे
No comments:
Post a Comment