सर्पमिञ गोपाळ गिरी यांनी दिले सायाळ ला जिवदान
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२३: मानवत शहरातील बौध्दनगर येथे एका खड्यात सायाळ वावरताना दि. ३० एप्रिल रोजी आदेश धबडगे यांना दिसला यासाठी तात्काळ मानवत शहरातील सर्पमित्र गोपाळ गिरी यांना
आदेश धबडगे यांनी दूरध्वनीद्वारे बोलावून घेतले गोपाळ गिरी यांनी घटनास्थळी दाखल होत मोठ्या शिताफीने सायाळला धरून पिशवीत सुखरूप टाकुन शेतात सुरक्षित पणे सोडून देण्यात आले. मानवत तालुक्यात कोठेही अजगर, मन्यार आदी साप सापडल्यास त्यांना नागरिकांनी मारु नये त्यांना जिवदान द्यावे यासाठी तात्काळ सर्पमित्र गोपाळ गिरी यांना दूरध्वनी क्रमांक ९१५६९७०२१५ या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन सर्पमित्र गोपाळ गिरी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment