मानवत येथील अर्शिन नजातुल्ला खान यांचा पहिला रोजा
मानवत मुस्तखीम बेलदार
मानवत शहरातील खडकपुरा परीसरातील रहिवासी अर्शिन नजातुल्ला खान वय १० वर्ष या चिमुकलीने पविञ रमजान महिण्याचे औचित्य साधुन २५ एप्रिल रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास )पुर्ण केला आहे.रमजान महिण्याच्या रोजाला मुस्लीम बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व असुन या महिण्यात मुस्लीम बांधव सलग महिणाभर रोजा ठेवुन विविध धार्मिक कार्य पार पाडतात व अल्लाहची आराधना करतात आणी याच महिण्यात लहान मुले हि आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात याचीच प्रचिती म्हणुन अर्शिन नजातुल्ला खान
या चिमुकलीने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पुर्ण केल्या बद्दल
मुलीचे वडिल नजातुल्ला खान सर , माजी नगरसेवक नियामत खान , मंनसब खान,
जफर खान, अमन खान
आदीनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment