वालुर येथे विश्वभुषन डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी मानवत येथे निषेध.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.०९: भिमा कोरेगाव चे प्रकरण ताजे असताना वालुर ता.सेलु जि.परभणी येथे ८ जानेवारी ते ९ जानेवारी च्या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.या घटनेचा मानवत येथील आंबेडकरी संघटनाच्या वतीने निषेध करुन तहसिलदार मानवत यांना आज दि.९ जानेवारी रोजी निवेदन देऊन विटंबना करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भिमा कोरेगाव येथील घटनेनंतर महाराष्ट्रात शांतता नादत आसताना ज्या समाजाची डोके भडकविण्याचा प्रयत्न मनुवादी विचारधारेने केला होता त्यास खीळ बसुन सर्व समाज गुण्यागोंविदाने नादत आसताना मौजे वालुर ता.सेलु जि.परभणी येथे मनुवादी विचारधारेने डोके वर करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याची विटंबना ८ जानेवारी ते ९ जानेवारी च्या दरम्यान चेहऱ्यास काळे फासुन विटंबना करण्यात आली.या घटनेचा जाहिर निषेध करण्यात येत आसुन सदरील घटनेतील आरोपिना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर अमृतराव भदर्गे ,छगन भदर्गे ,अशोक पंडित ,आनंद भदर्गे ,राजकुमार खरात,संपत पंडित ,धम्मपाल सोनटक्के ,दिपक ठेंगे ,महेद्र ठेंगे ,चंद्रकांत मगर,रवी पंडित ,शैलेश वडमारे ,अर्जुन झिंजुर्टे,मिलींद तुपसमुद्रे,नागसेन भदर्गे ,नितीन गवळी,अर्जुन झिंजुर्टे आदीच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:
Post a Comment