मानवत येथे माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार यांचा रोडशो दरम्यांन नागरिकाकडुन भव्य स्वागत!
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२४:महाराष्ट्रातील युती सरकारच्या साडेतीन वर्षाच्या आतापर्यत च्या कारभारा विरोधात राष्टृवादि पक्षाच्या वतीने भाजप शिवसेना सरकार विरोधात हल्लाबोल मोर्चाचे आयोजन महाराष्ट्रभर होत आसुन माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार सत्ताधारिवर प्रत्येक सभेत हल्ले करत आहेत व यास जनतेकडुन ही मोठा प्रतिसाद मिळत असुन काल दि.२३ जानेवारी रोजी पाथरी येथे हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते.या हल्लाबोल मोर्चासाठी रुढि पाटिजवळ पासुन अजीतदादा याच्यां स्वागतासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मोटार सायकल रँली काढुन यावेळी मोठ्या ऊत्साहात सामील झाले होते.रुढिपाटि पासुन ते पाथरी येथील जि.प.सभापर्यत हि मोटार सायकल रँली काढण्यात आली यावेळी मानवत शहरात जागोजागी माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार व आमदार बाबाजानी दुर्राणी याचा भव्य स्वागत व सत्कार नागरीकाकडुन यावेळी करण्यात आला.या रँलीत अजीतदादा पवार यांचा ताफा निघाल्यानंतर दादांनी मानवत येथे रोडशो दरम्यांन नागरिकांना हात दाखवुन रोडशो करत व नागरीकांच्या शुभेच्छा घेत पाथरी येथील नियोजित सभेच्या ठिकाणी पोहचले. मोटर सायकल रँलीमुळे मानवत शहरातील राष्टृवादि च्या कार्यकर्त्यांना नविन संजिवनी मिळाली आहे व कार्यकर्ते पक्षाच्या अधिक बळकटिसाठी आधिक जोमाने कामाला लागले आहेत. यावेळी मोटर सायकल रँलीत आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब, जि.प.सदस्य पंकज आंबेगावकर ,शहरअध्यक्ष मोईन अन्सारी ,शहरउपाध्यक्ष सिध्दार्थ ढाले,अफसर तांबोळी,शहर सचीव शेख पाशा,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान,गुलाब तांबोळी,शेख शाकेर ,शेख अफरोज,शेख वाजीद,असीर बेलदार ,सद्दाम भाई,शेख बशीर याच्यांसह मोठ्याप्रमाणात पाथरी ,मानवत शहरातील राष्टृवादि पक्षाचे कार्यकर्ते या मोटर सायकल रँलीत आवर्जून उपस्थीत होते .
No comments:
Post a Comment