मानवत येथील ईखरा ऊर्दु शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील गालीब नगर येथील ईखरा ऊर्दु प्राथमीक शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन आज दि.१३ जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले होते.विद्यार्थि मध्ये स्वालंबन निर्माण होणे या मागचा मुख्यउद्देश यासाठी ईखरा ऊर्दु शाळेत प्रत्येक वर्षि प्रमाणे याहि वर्षि आनंद मेळावा (खरी कमाई) चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन बडौदा बँक चे मँनेजर दुर्गादास कोडगीरकर याच्यां शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन ॲड.लुकमान बागवान ,भैय्यासाहेब गायकवाड ,ईम्रान बागवान ,आतीक आन्ना,अफसर फुलारी,ईरफान बागवान हे होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन मौलाना मुजाहिद सर यांनी केले तर आभार संस्थेचे सचीव एम.ए.रिजवान सर यानी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि जुनेद सर,ईम्रान सर,मुजाहिद सर,सीराज सर,ईलीयास सर ,रिजवान सर,खुदसिया मँडम ,अल्ताफ सर आदीनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment