मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळा येथे सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१८:मानवत तालुका स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा चे आयोजन दि.१८ जानेवारी रोजी खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्ताक ईनामदार सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सदाशिव होगे सर हे होते.तर व्यासपिठावर अरकरे गणेश ,प्रकाश रासवे,सौ.कमळु मँडम ,बालासाहेब पवार यांची उपस्थीती होती.
या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम येण्याचा मान शकुतलाबाई कञुवार विद्यालयास मिळाला तर द्वितीय येण्याचा मान नेताजी सुभाष विद्यालयास मिळाला तर तृतीय येण्याचा मान खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेस मिळाला.निकालानंतर लगेच प्रथम,द्वितीय व तृतीय येणाऱ्या शाळेस मान्यवराचे हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले.स्पर्धाच्या यशस्वीतेसाठी मुस्ताक सर,मोईन सर,रहमान सर,जुबेर सर ,जावेद सर यांनी परीश्रम घेतले तर हा कार्यक्रम खान अब्दुल गफ्फार खान शाळेचे मुख्याध्यापक मुखतार सर याच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
Thursday, January 18, 2018
मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धाचे आयोजन.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment