मानवत नगरपरिषदच्या नियोजन व विकास सभापतीपदी सौ.राणी अंकुश लाड यांची बिनविरोध निवड!
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत नगरपरिषदच्या सभागृहात दि.२० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता स्थायी समिती व विशेष समिती सभापती व सदस्य याची निवड करण्यात आली.पिठासिन आधिक्षक तथा उपविभागीय अधिकारि परभणी डॉ.सुचिता शिंदे व सहाय्यक पिठासिन आधिकारी तथा मुख्याधिकारी उमेश ढाकणे याच्यां अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत विषय समित्या सभापतीची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच अध्यक्ष स्वामी शिवकन्या नंदकुमार ह्या स्थायी समितीच्या पदसिध्द सभापती आसल्याचे पिठासिन आधिकारी यांनी घोषीत केले.पुढिल प्रमाणे स्थायी समिती व विशेष समिती सभापती व सदस्य याची निवड करण्यात आली .राणी अंकुश लाड उपनगराध्यक्षा यांची नियोजन व विकास समीतीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली,अ.रहिम अ.करिम बागवान यांची सार्वजनिक बांधकाम सभापती पदि निवड करण्यात आली,दत्ता निवृती चौधरी यांची पाणीपुरवठा व जलनिसारन समितीच्या सभापती पदी निवड करण्यात आली,मिरा मोहन लाड याची स्वच्छता ,वैध्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती निवड करण्यात आली,शैलजा उमेशराव बारहाते यांची महिला व बालकल्यान समीतीच्या सभापती पदी निवड करण्यात आली.या निवडिच्या कामकाजामध्ये नगरपरिषद चे कार्यालयीन कर्मचारि एस.एल.बोरेवाड ,मनमोहन बारहाते ,बळीराम दहे,पंकज पवार यानी कामकाज पाहिले.
No comments:
Post a Comment