ओंकार मल्टी स्पेशियालीटी हॉस्पीटलच्या वतीने पञकारांचा सत्कार!
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१८: ओंकार मल्टी स्पेशियालीटी हॉस्पीटलच्या वतीने दर्पन दिनाचे औचीत्य साधुन मानवत व पाथरी येथील पञकारांचे स्वागत समारंभाचे आयोजन दि.१८ जानेवारी रोजी राञी ७ वाजता हॉटेल सीटि प्राईड पाथरी येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.जगदिश शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सत्यशिल धबडगे ,पाशा बेग,धनंजय देशपांडे ,माणीक केद्रे,धारासुरकर सर होते.यावेळी मानवत व पाथरी येथील पञकारांचा डायरी ,पेन व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी मान्यवरानी आपले मनोगत हि व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचालन सदाशिव होगे सर यांनी केले तर,आभार प्रदषण डॉ.जगदिश शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.सचीन कदम,डॉ.जगदिश शिंदे ,निवृत्ती पवार यांनी परिश्रम घेतले .
No comments:
Post a Comment