मानवत येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी .
[]कार्यक्रमास आमदार मोहन फड,डॉ.अंकुश लाड यांची प्रमुख उपस्थीती []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.३१: मानवत शहरात लोहार सुतार समाज बांधवाच्या वतीने दि.२९ जानेवारी रोजी श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पञकार गोपाळ लाड सर हे होते तर प्रमुख अतीथी म्हणुन पाथरी विधानसभाचे आमदार मोहन भाऊ फड तर प्रमुख पाहुणे म्हणुन युवानेते डॉ.अंकुश लाड,आर.एस.चाफे अध्यक्ष लोहार विकास महामंडळ जि.परभणी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.तसेच समाजातील मानवत तालुक्यातील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थाचे यावेळी सत्कार करण्यात आले.तसेच मान्यवराचे ही यावेळी सत्कार करण्यात आले.यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार मोहन फड म्हणाले की,लोहार सुतार समाजबांधवासाठी लवकरच आमदार निधीतुन समाजमंदिर व जागेला संरक्षण भिंत बाधुन देण्याचे यावेळी आश्वासन दिले.या नंतर श्री.ह.भ.प.विनोदमुर्ति वैजनाथ महाराज यांचे किर्तन पार पडले.कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि मानवत येथील श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारि यांनी प्रयत्न केले.यावेळी मोठ्याप्रमाणात लोहार सुतार समाजबांधव मोठ्याप्रमाणात उपस्थीत होते.
Wednesday, January 31, 2018
आ. मोहन भाऊ फड,युवानेते डॉ.अंकुश लाड यांची प्रमुख उपस्थीतीत मानवत येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment