Tuesday, January 30, 2018

ज्ञानोबा शहाणे यांचा परभणी जिल्हा कारागृहात ७ दिवसापासुन आमरन उपोषण सुरु!

मानवत तालुक्यातील वझुर येथील शहाणे यांचा ७ दिवसापासुन जिल्हा कारागृहात उपोषण!
[] धान्यघोटाळा करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी []

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.३०: मानवत तालुक्यातील वझुर येथील ज्ञानोबा सोनाजी शहाणे यांनी धान्य घोटाळ्यातील आरोपिवर कारवाई होत नसल्याकारणाने औरंगाबाद आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा ईशारा दिला होता.यामुळे पोलीसानी त्यांना पकडुन दंडाधिकारी मानवत याच्यां समोर हजर केले असता त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला असता त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती व कारवाई आरोपीवर न करता प्रशासन माझ्यावर कारवाई करतो व न्याय मिळेपर्यत आमरन  उपोषण ज्ञानोबा शहाणे यांनी जिल्हा कारागृहात सुरु केले आहे व आज त्यांना पेशीसाठी दंडाधिकारी मानवत येथे आनले असता दंडाधिकारी रजेवर असल्याने आज ७ व्या दिवशीही त्यांचे आमरन उपोषण सुरुच होते.
ज्ञानोबा शहाणे यांनी ४ वर्षापासुन या घोटाळेबहाद्दर विरोधात एकाकी लडाई लढुन धान्यघोटाळा उघळकिस आणला वझुर येथील धान्याचा व केरोसीन चा भ्रष्टाचार ही प्रशासनासमोर आणला होता तसेच मानवत तालुक्यातील तीन हजार शिधापञीका तहसिल कार्यालयातुन गायब करुन सहा लाख रुपयाचा काळाबाजार या संबधित अधिकाऱ्यांनी केला होता या संबधीही शहाणे यांनी पाठपुरावा केला होता व यासर्व आरोपीवर कारवाई व्हावी म्हणुन आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे २६ जानेवारी २०१७ रोजी ३६ तास आमरन उपोषण केले होते परंतु आश्वासनापलीकडे काहीही मिळत नसल्याने त्यांनी २६ जानेवारी २०१८ रोजी आत्मदहनाचा ईशारा दिला होता म्हणुन २२ जानेवारी रोजी त्यांना पोलीसानी पकडुन मा.ता.दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर केले असता कलम १०७ नुसार यांनी जमानत नाकारली म्हणुन त्यांना जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले.न्याय मिळत नसल्यामुळे ज्ञानोबा शहाणे यांनी जिल्हाधिकारी यांना पञ  लिहुन २४ जानेवारी पासुन जेलमध्येच आमरन उपोषण सुरु केले त्यानंतर २५ जानेवारी रोजी मा.ता.दंडाधिकारी याच्या समोर त्यांना आणले असता तेव्हाही त्यांनी जमानत घेण्यास नकार दिला व आज दि.३० जानेवारी रोजी त्यांना मा.ता.दंडाधिकारी कार्यालय येथे आनले होते परंतु मा.ता.दंडाधिकारी हे रजेवर असल्यामुळे पुन्हा उद्या दि.३१ जानेवारी रोजी  त्याना मा.ता.दंडाधिकारी याच्या समक्ष हजर केले जाणार आहेत.आज ७ व्या दिवशीही उपोषण सुरु असल्याने त्याचीही तब्येत खालावत असल्याने त्यांना लवकरात लवकर न्याय देऊन संबधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांचा मुलगा अमोल ज्ञानोबा शहाणे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.आता प्रशासन काय कारवाई करते ते बघुया?खरच ज्ञानोबा शहाणे यांना न्याय मिळेल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.

No comments:

Post a Comment