रागीनी वेदपाठक ठरल्या जिंका म्हाळसा पैठणीच्या मानकरी.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील महिलांच्या वतिने मकर संक्रात हळदी कुकंवाच्या निमीत्ताने शहरातील खंडोबा मंदिर सभागृहात जिंका म्हाळसा पैठणी कार्यक्रम संपन्न झाला.
मकर संक्रांतीचे औचित्य साधुन महिलांच्या मनोरंजनासाठी माजी नगरसेविका मिनाताई देशमुख यांनी सुनिता झाडगांवकर प्रस्तुत जिंका म्हाळसा पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिंका म्हाळसा पैठणीच्या मानकरी ठरल्या रागीनी वेदपाठक,व्दितीय बक्षीस मंगल सोरेकर यांना मोठे स्टील रॅक,तृतीय बक्षीस संध्या राऊत यांना स्टील टाकी व उत्तेजनार्थ बक्षीस निळकंठ यांना मोठे ब्लॅकेट मिळाले. या कार्यक्रमासाठी परभणी महानगरपालीका महापोर मिनाताई सुरेश वरपुडकर , नगरसेविका शोभा शाम चव्हाण जि.प.सदस्या वैशाली पंकज आंबेगांवकर यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले.या स्पर्धेसाठी शहरातील २०० महिलांनी नोंदणी केली होती.
सुनिति झाडगांवकर यांनी त्यांच्या नियोजन बद्धशैलीने व वैविण्यपुर्ण खेळाने महिलांचे मन जिंकुन घेतले.
या कार्यक्रमाच्या बक्षीसाचे प्रायोजक महापोर मिनाताई वरपुडकर,जि.प.सदस्या वैशाली आंबेगावकर,नगरसेविका शोभा चव्हाण,आदिनाथ कलेक्शन होते.
या हळदी-कुंकवांच्या कार्यक्रमात मिनाताई देशमुख,वैशाली आंबेगांवकर, रेखा देशमुख,कुसुमताई देशमुख,जना टेकाळे,शकुंतला जाधव,ञिशला जाधव,आयोध्या जाधव,संध्या जाधव यांनी सहभाग घेतला होता.
शहरातील हजोरो महिलांनी कार्यक्रमाचा आंनद घेतला.
Sunday, January 21, 2018
मानवत येथील रागीनी वेदपाठक ठरल्या जिंका म्हाळसा पैठणीच्या मानकरी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment