मानवत येथील आर्यवैश्य महिला मंडळाच्या हळदि कुंकवाच्या कार्यक्रमातुन महिलांनी केली जनजागृती.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२३: नका वाया घालवु पाणी आणी ईधंन बचत करु देशाचे धन या सारखे जनजागृती करनारे संदेश मानवत येथील आर्यवैश्य महिला मंडळाच्या सदस्यांनी सामुदायिक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातुन महिलांनी दिला.
शहरातील संभाजी नगर भागातील नगरेश्वर मंदिरात आर्य वैश्य महिला मंडळाच्या वतीने सामुदायिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पर्यावरणासाठी झाडे लावा देश वाचवा दुनिया वाचवा,स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे,रक्तदान जिवनदान तसेच बेटि बचाओ बेटि पढाओ असे संदेश देनारे बँनर लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्यवैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा अनुजा डंमढेरे ,उपाध्यक्षा ममता चिद्रवार ,सचीव निर्मला गुडाळे,कोषाध्यक्ष सुचिता पेन्सलवार व सदस्यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment