राष्टृमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अस्थिव्यंग विद्यार्थिना चादरचे वाटप.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: राष्टृमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जयंती निमित्त मानवत शहरातील साईनाथ मतिमंद मुकबधीर विद्यालयातील ४० विद्यार्थिना चादर चे वाटप डॉ.नेञदिप दगडु ट्रस्टच्या वतीने दि.१२ जानेवारी रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मनीषा गुजराथी ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस निरिक्षक प्रदिप पालीवाल ,पोलीस उपनिरिक्षक किरन पवार,सत्यशिल धबडगे ,मुस्तखीम बेलदार ,डॉ.निनांद दगडु सदाशिव होगे हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्टृमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या प्रतिमेचे पुजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले व या नंतर गरिब होतकरु विद्यार्थाना सामाजिक बांधिलकी म्हणुन ट्रस्टच्या वतीने चादर वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि ट्रस्टचे सदस्य मानवत भुषन ॲड.गणेश मोरे याच्यासह ,सचीव निनांद दगडु ,संदिप भाकरे,विशाल कडतन आदिनी परिश्रम घेतले.तसेच साईनाथ मतिमंद मुकबधीर विद्यालयातील काळजी वाहक मुख्याध्यापक अमीत राठोड सर ,अमर भिसे सर ,आशोक वाघमारे सर यांनी देखील सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार सदाशिव होगे सर यांनी मानले.
No comments:
Post a Comment