मानवत येथे जमात ए ईस्लामी हिंदच्या वतीने सदभावना कार्यक्रमाचे आयोजन!
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१७: जमात ए ईस्लामी हिंद मानवतच्या वतीने दि.१९ जानेवारी रोजी सध्याकाळी ६-३० वाजता संत सावता माळी चौक येथे सदभावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
"शांती प्रगती आणी मुक्तीसाठी ईस्लाम" या अभियानाअंतर्गत जातीय सदभावना ,बंधुभाव आणी सफलता या उद्देशाने जमात ए ईस्लामी हिदच्या वतीने देशभर या सदभावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन यासाठी मानवत शहरातही दि.१९ जानेवारी शुक्रवार सध्याकाळी ६-३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन मौलाना मुफ्ती मो.ईसाक याच्यां मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे .
तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थीती म्हणुन मा.स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज हे उपस्थीत राहणार आहे.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.आजीज मोहीयोदीन राहणार तर प्रमुख वक्ते म्हणुन डॉ.ईकरामोदीन हे उपस्थीत राहणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणुन युवानेते डॉ.अंकुश लाड,सत्यशिल धबडगे ,विठ्ठल भुसारे,ओमप्रकाशजी स्वामी,अनुरथ काळे,पोलीस निरीक्षक प्रदिप पालीवाल ,मौलाना मुजाहिद ,शफी फारुकी हे राहणार आहे.तरी या कार्यक्रमास मोठ्याप्रमाणात उपस्थीत राहण्याचे आवाहन जमात ए ईस्लामी हिंद व सर्व युवा मंडळ मानवतच्या वतीने करण्यात आले आहे.
Wednesday, January 17, 2018
मा.स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज याच्या प्रमुख उपस्थीतीत सदभावना कार्यक्रमाचे आयोजन .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment