मानवत येथे राजकिय,सामाजिक व शैक्षणिक संस्थाच्या वतीने प्रजासत्ताक दिन ऊत्साहात साजरा.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि,२६: मानवत शहरात ६९ वा प्रजासत्ताक दिन हर्ष उल्हासात विविध राजकीय सामाजिक व शैक्षणिक संस्थाच्या वतीने साजरा करण्यात आला.यात नगरपरिषद मानवत येथे सकाळी ७-४५ वाजता नगाराध्यक्षा शिवकन्या स्वामी याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी सर्व नगरपरिषद कर्मचारि व नगरसेवक यावेळी उपस्थीत होते.तसेच तहसिल कार्यालय येथे सकाळी ९-१५ वाजता तहसिलदार आश्विनी जाधव याच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी नायबतहसिलदार नकुल वाघुंडे,शेख वसीम,गटविकास अधिकारि छडिदार साहेब याच्यासह राजकिय व सामाजिक तसेच पञकार यावेळी उपस्थीत होते.मानवत येथील ईखरा ऊर्दु शाळेत सकाळी ७-५० वाजता शिवसेना शहरप्रमुख अनील जाधव याच्यां हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी ॲड.लुकमान बागवान ,एम.ए.रिजवान सर आदी उपस्थीत होते.मानवत पोलीस ठाणे,ग्रामीण रुग्णालय तसेच शहरातील शासकिय कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले.जमीअत उलेमा हिंद ( अरशद मदनी ) अध्यक्ष हाफेज लतीफ यांनी शहरातील शाळेत जमीअत च्या वतीने विद्याथ्याना बिस्किटचे वाटप केले.तसेच जि.प.प्राथमिक शाळा शाखा क्र.४ येथे अल्पसंख्याक शहरअध्यक्ष आसद खान यांनी शाळेतील विद्यार्थाना बिस्किटचे वाटप केले.फ्रेन्डस मिञमंडळाच्या वतीने पेठमोहल्ला येथे प्रभात भेरीत येणाऱ्या शालेय विद्यार्थाचे स्वागत करण्यात आले तसेच बिस्किटचे वाटप युवानेते डॉ.अंकुश लाड याच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक जमील चाऊस,हाफेज लतीफ,हबीब बागवान ,सद्दाम बागवान ,आवेस बागवान ,अकरम मिलन,अय्युब बागवान मिलन आदि उपस्थीत होते.एम आय एम च्या वतीने जि.प.ऊर्दु प्राथमिक शाळा,साईनाथ अस्थिव्यंग विद्यालयात पेन व बिस्किटचे वाटप सय्यद समीर,शेख शफिक,अरबाज बेलदार ,शेख मोबीन,शोएब बागवान याच्या वतीने करण्यात आले.शहरातील सर्व शाळा विद्यालयातुन सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली व मोठ्या हर्ष उल्हासात गणतंञ दिवस साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment