मानवत येथे सदभावना कार्यक्रम संपन्न !
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२० : जमात ए ईस्लामी हिंद मानवतच्या वतीने दि.१९ जानेवारी रोजी सध्याकाळी ६-३० वाजता संत सावता माळी चौक येथे सदभावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
"शांती प्रगती आणी मुक्तीसाठी ईस्लाम" या अभियानाअंतर्गत जातीय सदभावना ,बंधुभाव आणी सफलता या उद्देशाने जमात ए ईस्लामी हिदच्या वतीने देशभर या सदभावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन यासाठी मानवत शहरातही दि.१९ जानेवारी शुक्रवार सध्याकाळी ६-३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा सदभावना कार्यक्रम मौलाना मुफ्ती मो.ईसाक याच्यां मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.आजीज मोहीयोदीन हे होते तर प्रमुख वक्ते म्हणुन डॉ.ईकरामोदीन हे उपस्थीत होते.
प्रमुख पाहुणे म्हणुन सत्यशिल धबडगे ,विठ्ठल भुसारे,डॉ.ओमप्रकाशजी समदानी,पोलीस उपनिरीक्षक किरन पवार ,मौलाना मुजाहिद ,शफी फारुकी हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात कुरानाचे पठण करुन करण्यात आली . यावेळी उपस्थीत मान्यवराचे स्वागतही करण्यात आले तसेच उपस्थीत पञकाराना मराठीत अनुवाद असलेली दिव्य कुरान मजीद यावेळी भेट म्हणुन देण्यात आली.यावेळी मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक शफी फारुकी सर यांनी केले तर सुञसंचालन व आभार नजायत खान पठान सर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमात ए ईस्लामी हिंद व सर्व युवा मंडळ मानवत यांनी परिश्रम घेतले.
Saturday, January 20, 2018
मानवत येथे जमात ए ईस्लामी हिंद मानवतच्या वतीने "शांती प्रगती आणी मुक्तीसाठी ईस्लाम" सदभावना कार्यक्रम संपन्न.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Many many thanks mustkhim bhai
ReplyDelete