Thursday, September 24, 2020

बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप.

बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त  कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप.

विशेष प्रतिनीधी   / मुस्तखीम बेलदार 

दि.२४: राज बेलदार समाजसेवा मंडळ व सा.राज घोषणा परिवाराच्या वतीने बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद सय्यद चॉद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त  कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप करण्याचे आयोजन 
राज बेलदार समाजसेवा मंडळ व सा.राज घोषणा चे मुख्यसंपादक सय्यद अबरार ईलाहि यांच्या मार्गदर्शनाखाली राज बेलदार समाजातील  शिक्षक ,डॉकटर , सामाजिक कार्यकर्ते, पञकार ,शासकिय अधिकारी  यांच्यासह ज्यांनी ज्यांनी कोरोना काळात आपल्या  क्षेत्रात उत्तम कामगीरी करुन कोरोना या महामारीत आपली व आपल्या परीवाराची जिवाची पर्वा ना करता कोरोना या राष्ट्रीय आपदात आपले योगदान दिल्याबद्दल कोरोना योध्दा सन्मानपञ व पुष्पगुच्छ देऊन  गौरविण्यात येणार आहे यासाठी समाजबांधवानी आपले आधारकार्ड ,एक पासपोर्ट फोटो राज बेलदार समाजसेवा मंडळ मुख्य कार्यालय दर्गारोड परभणी येथील कार्यालयात जमा करावा किंवा मो.9011633704, 9860109007 या क्रंमाकावर संपर्क करण्याचे  आवाहान संघटनाचे अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि ,मा. नगरसेवक सय्यद नोमान हुसैनी कौसर , महाराष्ट्र राज्य संघटक मुस्तखीम बेलदार यांनी केले आहे.

Sunday, September 20, 2020

संजय नाईक यांनी वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वृक्षलागवड साठी ३५५५ रु. वृक्षवंल्ली फाउंडेशन ला केली मदत

संजय नाईक यांनी  वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वृक्षलागवड साठी ३५५५ रु. वृक्षवंल्ली फाउंडेशन ला दिली देणगी.
मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२०: मानवत तालुका पञकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करुन सामाजिक बांधिलकी म्हणुन वृक्षलागवड व संवर्धनासाठी रामपुरी येथील वृक्षवंल्ली फाउंडेशन ला ३५५५   रुपयाची देणगी २० सप्टेंबर रोजी देऊन वाढदिवस साध्यापध्दतीने साजरा करुन समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे या उपक्रमाबद्दल संजय नाईक यांचे अभिनंदन होत आहे व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत.

Monday, September 7, 2020

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या वतीने विविध मागण्या साठी काळ्या फिती लावून आंदोलन.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या  वतीने काळ्या फिती लावून आंदोलन. 

विशेष प्रतिनिधी / मुस्तखीम बेलदार 

दि. ७: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड तर्फ वारंवार प्रत्यक्ष आप्रत्यक्ष मा. मंत्री मा. आमदार, खासदार साहेबाच्या शिफारस सह शासना कडे सातत्याने विविध प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत परंतु शासनाने आतापर्यंत एक ही रास्त  मागणी मान्य केली नाही याचा निषेध म्हणून 
दि.७ सप्टेंबर  रोजी जिल्हा परिषद नांदेड येथील  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पदवीधर संघटनेच्या  वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन काळ्या फिती लावून नियमित कर्तव्य कर्मचाऱ्यांचे वतीने बजावन्यायत आले आहे या वेळी शेख मतीन, सुनील आघाव, श्री वैद्य इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या वतीने विविध मागण्या साठी काळ्या फिती लावून आंदोलन.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या  वतीने काळ्या फिती लावून आंदोलन. 

विशेष प्रतिनिधी / मुस्तखीम बेलदार 

दि. ७: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड तर्फ वारंवार प्रत्यक्ष आप्रत्यक्ष मा. मंत्री मा. आमदार, खासदार साहेबाच्या शिफारस सह शासना कडे सातत्याने विविध प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत परंतु शासनाने आतापर्यंत एक ही रास्त  मागणी मान्य केली नाही याचा निषेध म्हणून 
दि.७ सप्टेंबर  रोजी जिल्हा परिषद नांदेड येथील  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पदवीधर संघटनेच्या  वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन काळ्या फिती लावून नियमित कर्तव्य कर्मचाऱ्यांचे वतीने बजावन्यायत आले आहे या वेळी शेख मतीन, सुनील आघाव, श्री वैद्य इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Sunday, September 6, 2020

भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी गुलाब शेख यांची निवड.

भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी गुलाब शेख यांची निवड. 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि. ६: भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असणारे तथा जेष्ट समाजसेवक  गुलाब शेख यांची दि. ६ सप्टेंबर रोजी भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.तालुका अध्यक्ष विश्वनाथ प्रल्हादराव लाडाने यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र  पाथरी विधानसभा चे माजी आमदार मोहन फड यांच्या हस्ते मानवत येथील गार्डन परिसरात गुलाब शेख यांना देण्यात आले आहे. 
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, मोईज अन्सारी, ओ बी सी  जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, राजू रणदिवे, आसेफ खान, बोचरे पाटील आदी उपस्थित होते. गुलाब शेख  यांच्या  निवडीचे स्वागत होत असून त्यांना पुढील कार्यासाठी  शुभेच्छा मिळत आहें. 

Saturday, August 29, 2020

गणेश विसर्जन करताना नियमावलीचे पालन करा - मानवत पोलीस निरीक्षक उमेश पाटिल यांचे आवाहान.

गणेश विसर्जन करताना  नियमावलीचे  पालन करा - पो.नि.उमेश पाटिल  
मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२९: जिल्हा अधिकारी साहेब  परभणी व पोलीस अधीक्षक साहेब परभणी यांनी कोरोना संसर्गजन्य आजार परभणी जिल्ह्यात जास्त प्रमाणात प्रसार होत असल्यामुळे  सर्व गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणुका यापूर्वीच रद्द केले आहेत .तरी प्रत्येकाने आपापल्या गणेश मंडळाची आरती करून  विसर्जन करिता नगरपरिषद मानवत यांचे  ट्रॅक्टर  प्रत्येक गल्लीत व वार्डत येणार आहे.त्याच ट्रॅक्टर मध्ये गणेश मुर्ती  ठेवावे कोणीही स्वतः गणेश मूर्तीचे विसर्जन करणार नाही याची नोंद  मानवत शहरातील  सर्व सार्वजनिक  गणेश मंडळ व घरगुती गणपती  यांच्या  अध्यक्ष उपाध्यक्ष  व इतर सदस्यांनी  घ्यावी असे आवाहान मानवत पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक उमेश पाटिल यांनी केले आहे.

Friday, August 21, 2020

मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन [] कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी []

मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन
[] कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी []

मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२१ : केंद्राने काढलेल्या नेमणुकीचा आदेश मागे घ्यावा व बाजार समिती कर्मचाऱ्यांना  कर्नाटक राज्याप्रमाणे शासकीय सेवेत घ्यावे या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या  कर्मचाऱ्यांनी २१ ऑगस्ट रोजी बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवत आंदोलन केले. 
केंद्र सरकारने ५ जून रोजी अध्यादेश काढून बाजार समित्यांच्या आवराबाहेरील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार नियमन मुक्त करून बाजार शुल्क रद्द केले आहे.बाजार शुल्क रद्द केल्यामुळे बाजार समितीचे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गाच्या वेतनावर परिणाम होणार आहे. तसेच बाजार समितीच्या आवारात बाहेर शेतमालाची खरेदी विक्री झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. बाजार समितीला बाजार शुलकातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा देखरेख, वीज पाणी,  गोडाऊन, शेड,  वजन काटे, आदि खर्च भागविणे अवघड होणार आहे. यामुळे केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश मागे घेऊन राज्यातील बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात सचिव बालासाहेब कदम, सहाय्यक सचिव शिवनारायण सारडा, संजय होगे,शांता गवारे, रंगनाथ अब्दल, राम पांचाळ, राम राऊत, कैलास किरवले, दत्तात्रय चोखट, नंदू कच्छवे,  मिलिंद राक्षे, सत्यशील धबडगे,विनोद सोळंके, विजय रणेर,  बाळू कदम,सागर कडतन, रमेश मारेवाड, कैलास करडले, मारोती साठे, रेखा पवार, श्रीकांत वाघमारे,विकास काळे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.  

Sunday, August 16, 2020

औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी व रोटी बँक च्या वतीने काढा वाटप.

औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी व रोटी बँक च्या वतीने काढा वाटप.

औरंगाबाद प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार 

दि.१६: कोरोना या आजारावर मात देण्यासाठी व रोगप्रतिकात्मक शक्ती वाढविण्यासाठी  प्रसिध्द  मालेगाव चा मंसुरा  काढा याचे नागरीकांना  वाटप करण्यासाठी शिबीर  लावण्यात आले  होते ते आज पूर्ण झाले शेवटचे शिबीर समता नगर वार्ड क्रमांक ६९ येथे आयोजित केले होते यास ३  दिवस पुर्ण झाले  नागरीक व पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांनी पण मोठ्या संख्येने काढा अल्बम ३० च्या गोळ्याचा  लाभ घेतला व सर्व समता नगर येथील नागरिकांनी यास चागला प्रतीसाद दिला.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद राष्ट्रवादी चे  शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी,
शहर जिल्हा सचिव जफर कूरैशी, शेख जावेद गुडु कुरेशी, शामेक कुरेशी, ईतेशाम कुरेशी ,आनंद गायकवाड यांच्यासह  मोठ्या संख्येने समता नगर भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, August 12, 2020

मानवत येथे महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण. मानवत / मुस्तखीम बेलदार

मानवत येथे महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण.
मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१२: मानवत शहरामध्ये  दि.१२ अॉगस्ट  बुधवार रोजी  श्री.खंडोबा मंदिर  परिसरात जवळपास १०० झाडे लावून ते पुर्ण झाडे वाचवण्याचा श्री.खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या सदस्याने हा मनात संकल्प घेऊन  वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला
१००८ महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज  व
ह.भ.प.श्री.१००८ स्वामी शिवेंन्द्र चैतन्य महाराज यांच्या वृ शुभहस्ते  पार पडला यावेळी  प्रमुख उपस्थिती म्हणुन तहसिलदार डि.डि.फुफाटे,
पोलीस निरीक्षक उमेश पाटील , मुख्याधिकारी जयवंत सोनवने उपस्थीत होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन  अनिल जाधव,नरेश गौड,दिनेश देशमुख,ॲड.सुनिल जाधव,बालाजी दहे,आशोक नितनवरे,विलास देशमुख,बंडू तुरे,आप्पा भिसे व खंडोबा मंदिर मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांच्यावतीने करण्यात आले होते.

मानवत येथील पान टपरी व्यवसाय सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी . [] पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन []

मानवत येथील पान टपरी व्यवसाय सुरु करण्याची
परवानगी द्या .
[] पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने तहसिलदारांना  निवेदन []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१२: कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे लागु झालेल्या  लॉकडाऊनमुळे मागील पाच महिण्यापासुन मानवत येथील पान टपरी व्यवसाय बंद असल्यामुळे पान टपरी व्यवसायीकांवर व त्यांच्या परीवारावर उपासमारीची वेळ आली असुन यामुळे पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांना दि.१२ अॉगस्ट रोजी पान मसाला व पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात नमुद आहे की, मानवत येथील पान मसाला व पान टपरी व्यवसायीकांचे लॉकडाऊन पासुन आज पर्यत पान टपरी बंद आहे व्यवसाय बंद झाल्यामुळे कुटुबांवर उपासामारीची वेळ आली आहे आरोग्यखर्च ,घरगुती खर्च करण्यासाठी हतबल झाले आहे त्या सर्व बाबीमुळे आमच्या कुटुबांवर उपासामारीचा फटका बसत आहे यामुळे पान टपरी व्यवसायीकांना आर्थिक मदत द्यावी किंवा ईतर कोणत्याहि प्रकारची कामे करण्यासाठी सुविधा पुरवुन द्यावी अन्यथा आम्हास आमचे पान टपरी व्यवसाय सुरु करण्याचे आदेशीत करावे नसता आपल्या कार्यालयाच्या समोर शासन नियमाप्रमाणे आमरण उपोषण करण्यात येईल परीणामी आपल्यावर ह्याची जबाबदारी राहिल असे नमुद केले आहे.
निवेदनावर अजमत खान, नंदुभाऊ राजे, रफिक बागवान , शफिक तांबोळी , जावेद बागवान ,अ. अजमत, रफिक तांबोळी ,मुखीद कुरेशी ,मतीन बागवान ,हरी ठोंबरे , अजीम तांबोळी ,कृष्णा मेहेञे आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Wednesday, July 29, 2020

मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे घवघवीत यश. [] निशात पाकिजा ९०% घेऊन ऊर्दु माध्यमातून तालुक्यातुन प्रथम []

मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे घवघवीत यश.
[] निशात पाकिजा याने ९०% घेऊन ऊर्दु माध्यमातून तालुक्यातुन प्रथम []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२९: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा  इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज दि.२९ जुलैरोजी बुधवारी जाहीर झाला  आहे यात 
मानवत येथील भारत रत्न खान अब्दुल गफ्फार खान उर्दू  विद्यालयातुन तसेच मानवत तालुक्यातुन उर्दू माध्यमातून प्रथम येण्याचा मान सय्यद निशात पाकिजा सय्यद मुस्तखीम या विद्यार्थिनी ने ९०%  मार्क घेऊन मिळविला आहे तसेच मो.साद बारी कुरेशी याने ८१% द्वितीय ,सानीया शेख रफिक ७८%, सायमा अ. रशीद कुरेशी ७८% तृत्तीय , शगुफ्ता खानम असद खान यांनी चतुर्थ क्रमांक पटकविला आहे. या यशाबद्दल भारत रत्न खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे अध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी साहेब, सचीव तारेख दुर्राणी साहेब  ,मुख्यध्यापक शेख मुखतार सर, मुस्ताक सर,रहमान सर,जुबेर सर,जावेद सर, मुजीब सर,मोईन सर,सिद्दिकि सर, ईनामदार सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Wednesday, June 10, 2020

फेसबुकच्या माध्यमातून जातीवाचक पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर कायदेशिर कारवाई करण्याची मानवत रिपब्लीकन सेनाची मागणी.

फेसबुकच्या माध्यमातून  जातीवाचक पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याची  मानवत रिपब्लीकन सेनाची  मागणी.

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.१०:फेसबुकवर जातीवाचक अश्लील पोस्ट प्रसारीत केल्याबद्दल समाजकंटकास अटक करुन कायदेशिर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन सेना शाखा मानवतच्या वतीने तहसिलदार साहेब मानवत यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब व मा.गृहमंत्री साहेब यांना दि.१० जुन रोजी निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की,प्रफुल्ल संजय साळवे या समाजकंटकाने फेसबुकच्या माध्यमातून दोन दिवसापुर्वी मो.नं. ९११२१२१०९५ या क्रंमाकावरुन जातीवादी पोस्ट प्रसारीत केली असुन त्यामध्ये बौध्द समाजाच्या स्ञीयाविषयी अश्लील भाषेत टिका केली आहे सदर ईसम हिगोली येथील रहिवासी आहे त्याच्या फेसबुक अकाऊट वरुन दिसत आहे या प्रकरणातील सदरील समाजकंटकास लवकरात लवकर अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आले यावा अन्यथा लोकशाहि मार्गाने रिपब्लीकन सेना मानवतच्या वतीने तिव्र निषेध करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दिपक ठेंगे ,युवा ता.अध्यक्ष रवीभाऊ पंडित , युवानेते नागसेन भदर्गे ,मिलिंद तुपसमुद्रे,विजय खरात ,किरण पंडीत,बाबा ढवळे,शुंभम पचागें आदी उपस्थीत होते.

Wednesday, June 3, 2020

मानवत तालुक्यातील कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल इंग्रजी शाळेच्या प्राचार्यपदी डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची नियुक्ती.

कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल  इंग्रजी शाळेच्या प्राचार्यपदी डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची  नियुक्ती


मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.३: मानवत तालुक्यातील कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली या इंग्रजी शाळेत डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती भावनाताई बोर्डीकर यांनी दिली आहे.
भावनाताई बोर्डीकर संचालित ब्रह्मा व्हॅली आयसीएसई ही  इंग्रजी माध्यमातील शाळा मानवत तालुक्यातील कोल्हा येथे मागील दोन वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत असून शैक्षणिक वर्ष २०२० ते २१ या वर्षी ब्रह्मा व्हॅली आयसीएसई या इंग्रजी शाळेचे  ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल असे नामकरण करण्यात आले असल्याची माहिती भावनाताई बोर्डीकर यांनी दिली आहे तसेच या शैक्षणिक वर्षापासून डॉ. बिंदू श्रीवास्तव या ऊच्य विद्या विभूषित असुन त्यांनी  एम.ए. बी.एड. एम.एड. पी‌.एच.डी. चे शिक्षक पुर्ण झाले असून त्यांची कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी शाळेत प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली असून तसेच यावर्षी या  पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बरोबर संलग्नता केली आहे आणि  त्यांचा अभ्यासक्रम अवलबविण्यात येणार आहे तसेच सीबीएसई  बोर्ड सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून
सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी ब्रह्मा व्हॅली  इंटरनॅशनल स्कुल या इंग्रजी शाळेत संपर्क करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे अहवान भावनाताई बोर्डीकर यांनी केले आहे.

Tuesday, June 2, 2020

आमदार बाबाजानी दुर्राणीसह मुस्लीम बांधवावरील गुन्हे मागे घेण्याची समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांची मागणी.

आ.बाबाजानी दुर्राणीसह मुस्लीम बांधवावरील गुन्हे मागे घेण्याची समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांची मागणी.

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि,२: पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी  यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  प्रशासनाने केलेल्या या  कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक नाराजी  व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे या मागणीचे निवेदन समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांच्यावतीने दि. २ जुन  रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ मुस्लीम बांधवावर   पाथरी पोलीस स्टेशन येथे सामुहिक रित्या नमाज पठण केल्या बद्दल  तसेच संचारबंदि  जमाव बंदि आदेशाचे उल्लंघन केल्या बद्दल  गुन्हा दाखल झाला आहे हे दुर्दैवी असुन आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पुर्ण लॉकडाऊन च्या काळात गोरगरीबांना मोठ्याप्रमाणात मदत केली असुन त्यांनी केलेल्या  वेळोवेळी आवाहानामुळे पाथरी शहरासह तालुक्यातील नागरीकांनी लॉकडाऊन चे कठोर पालन केले आहे तसेच ईदची नमाज पठण करताना त्यांनी शारीरिक अंतराचे महत्वपुर्ण पालन केले आहे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक नाराजी  व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ मुस्लीम बांधवावरील  पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे असे नमुद केले आहे.यावेळी दशरथ शिंदे पाटिल ,युवानेते आसद खान , शेख ईसाक भाई आदी उपस्थीत होते.

Friday, May 29, 2020

आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवरील गुन्हे माघे घ्या - मानवत राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांचे मानवत तहसिलदार मार्फत गृहमंत्रीना निवेदन

आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवरील गुन्हे माघे घ्या - मानवत राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांची गृहमंत्रीना निवेदन

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२९: पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  प्रशासनाने केलेल्या या  कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक असंतोष व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे या मागणीचे निवेदन राष्ट्वादि कॉग्रेस पार्टि मानवत चे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यावतीने दि.२९ मे रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत मा. गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे सामुहिक रित्या नमाज पठण केल्या बद्दल  तसेच संचारबंदि  जमाव बंदि आदेशाचे उल्लंघन केल्या बद्दल  गुन्हा दाखल झाला आहे हे दुर्दैवी असुन आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पुर्ण लॉकडाऊन च्या काळात गोरगरीबांना मोठ्याप्रमाणात मदत केली असुन त्यांनी केलेल्या  वेळोवेळी आवाहानामुळे पाथरी शहरासह तालुक्यातील नागरीकांनी लॉकडाऊन चे कठोर पालन केले आहे तसेच ईदची नमाज पठण करताना त्यांनी शारीरिक अंतराचे महत्वपुर्ण पालन केले आहे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक असंतोष व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे असे निवेदनात नमुद केले आहे.निवेदनावर राष्ट्वादि कॉग्रेस पार्टि मानवत चे शहराध्यक्ष शेख जुबेर,बळीराम माने,शेख तन्वीर ,अर्जुन वाघमारे,खमर राज यांच्या स्वाक्षरी आहे.


Sunday, May 24, 2020

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांचे आवाहान .

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांचे आवाहान

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२४: आज दि. २४ मे रोजी चंन्द्र दर्शन झाले असुन उद्या दि.२५ मे रोजी ईद ऊल फिञ अर्थात रमजान ईद देशभरात साजरी होणार आसुन  कोरोना कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने  ३१ मे पर्यत लॉकडाऊन वाढवला  यामुळे  मानवत येथील  मुस्लिम समाज बांधवानी नमाजसाठी  मस्जिद मध्ये व ईदगाह येथे  न जाता घरातच नमाज पठण करुन  आपले विविध धार्मिक कार्य पार पाडुन ईद साजरी करावी असे  परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांनी केले आहे.
१४०० वर्षानंतर कदाचीत पहिलीच हि वेळ असेल जेव्हा  मुस्लिम समाजात रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये न जाता घरातच नमाज पठण करत विविध धार्मिक कार्यसह  उपवास ठेवत आहे व पुढिल येणाऱ्या रमजान ईद हि घरातच राहुन उत्साहात साजरी करावी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन हात मिळविने व गळाभेट टाळावी जेने करुन आपले कोरोना पासुन संरक्षण होईल तसेच देशासह जगभरातुन कोरोना नष्ट व्हावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी असे आवाहान परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांनी करुन शहरातील  जनतेस रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - युवानेते डॉ.अंकुश लाड

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - युवानेते डॉ.अंकुश लाड

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२४:  कोरोना कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने  ३१ मे पर्यत लॉकडाऊन वाढवला असुन सर्व बाजारपेठ धार्मिक स्थळे बंद आहेत त्यात मुस्लीम बांधवाची रमजान ईद २५ मे रोजी होणार आहे यामुळे  मानवत येथील  मुस्लिम समाज बांधवानी ईद ऊल फिञ नमाजसाठी  मस्जिद मध्ये व ईदगाह येथे  न जाता घरातच नमाज पठण करुन  आपले विविध धार्मिक कार्य पार पाडुन ईद साजरी करावी असे  आवाहान मानवत येथील युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी केले आहे.
१४०० वर्षानंतर कदाचीत पहिलीच हि वेळ असेल जेव्हा  मुस्लिम समाजात रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये न जाता घरातच नमाज पठण करत विविध धार्मिक कार्यसह  उपवास ठेवत लॉकडाऊन   चे पालन करत  आहे व पुढिल येणाऱ्या रमजान ईद ईद ऊल फिञ हि घरातच राहुन उत्साहात साजरी करावी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन हात मिळविने व गळाभेट टाळावी जेने करुन आपले कोरोना पासुन संरक्षण होईल तसेच देशासह जगभरातुन कोरोना नष्ट व्हावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी असे आवाहान करुन शहरातील  जनतेस रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी  रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन  
                                              
सोनपेठ प्रतिनीधी / शेख युसुफ 

दि.२४: सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी यावर्षीची ईदची नमाज ईदगाह मैदानाऐवजी घरातच अदा करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व ईदगाह चे इमाम हाफिज गफ्फार यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.                      देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाच्या वतिने लागू करण्यात आलेले लाँकडाऊनमध्ये कायद्याचे सुचनाचे पालन करत मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यातील तराविहची नमाज,रोजा ईफ्तारी व पाच वक्तची नमाज हे सर्व धार्मिक कार्यक्रम आज पर्यंत आपापल्या घरीच अदा केले.तसेच ईद-ऊल-फित्र ईदची नमाज देखील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर न पठन करता आपापल्या घरीच अदा करून अल्लाह कडे  प्रार्थना करावी की जगात पसरलेला कोरोना साथी पासून जगातील नागरिकांची लवकर सुटका व्हावी व देशाच्या प्रगती साठी प्रार्थना करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व हाफिज गफ्फार 
यांनी सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांना केले आहे

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी  रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन  
                                              
सोनपेठ प्रतिनीधी / सद्दाम हुसैन 

दि.२४: सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी यावर्षीची ईदची नमाज ईदगाह मैदानाऐवजी घरातच अदा करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व ईदगाह चे इमाम हाफिज गफ्फार यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.                              .                                                                   देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाच्या वतिने लागू करण्यात आलेले लाँकडाऊनमध्ये कायद्याचे सुचनाचे पालन करत मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यातील तराविहची नमाज,रोजा ईफ्तारी व पाच वक्तची नमाज हे सर्व धार्मिक कार्यक्रम आज पर्यंत आपापल्या घरीच अदा केले.तसेच ईद-ऊल-फित्र ईदची नमाज देखील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर न पठन करता आपापल्या घरीच अदा करून अल्लाह कडे  प्रार्थना करावी की जगात पसरलेला कोरोना साथी पासून जगातील नागरिकांची लवकर सुटका व्हावी व देशाच्या प्रगती साठी प्रार्थना करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व हाफिज गफ्फार 
यांनी सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांना केले आहे.

Wednesday, May 20, 2020

मानवत येथील शहजिन शकिल बेलदार हिचा पहिला रोजा संपन्न.

शहजिन  बेलदार हिचा  पहिला रोजा
मानवत / प्रतिनीधी
दि.२१: मुस्लिम बांधवांचा पवित्र  रमजान महिना   सुरु  असून याचे  औचित्य साधून मानवत शहरातील राजगल्ली  येथील रहिवासी सय्यद शहजिन शकिल बेलदार वय ९ वर्ष या मुलीने पवित्र रमजान महिन्यात दि. २० मे रोजी  उपवास ठेऊन पवित्र रमजान महिन्यात  आपल्या आयुष्यातील पहिला रोजा  पूर्ण केला व  आपले कर्तव्य पार पाडले यावेळी त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे  
यासाठी त्याचे वडिल शकिल बेलदार ,आजोबा अखील बेलदार ,एकबाल राज,मोबीन बेलदार ,मुस्तखीम बेलदार  यांनी शहजिन  बेलदार   याचे कौतुक करुन त्यास शुभेच्छा दिल्या आहे.

Monday, May 18, 2020

लोकडाऊन काळातील नागरीकांचे वीजबिल माफ करा - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव युवानेते वसीम भैय्या कुरेशी यांची मागणी

लोकडाऊन काळातील मध्यमवर्गीयांचे  वीजबिल माफ करा .
[] मानवत तहसिलदारांना युवक काँग्रेसची मागणी []

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि,१८: सध्या कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे देशभरात चौथ्या टप्प्यात हि लॉकडाऊन सरकार कडुन वाढविण्यात आला आहे यामुळे गोरगरीब मजुर व मध्यमवर्गीय नागरीकांवर  आर्थिक संकट निर्माण झाले आहे यामुळे शासनाने लॉकडाऊन काळातील वीजबील नागरीकांचे माफ करावे अशा मागणीचे निवेदन परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दि.१८ मे रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,    कोरोना मुळे लॉकडाऊनची परिस्थिती उदभवल्या मुळे गोर गरीब, मजदूर, हमाल मध्यम वर्गीय लोकांवर उदरनिर्वाह चे मोठं संकट निर्माण झाले आहे  त्यामुळे सरकारने लोकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे  असे म्हटले आहे निवेदनावर  परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव युवानेते  वसीम भैय्या कुरेशी ,काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष इलियास पठाण, सय्यद आरेफ, महेबूब मंसुरी, अफरोज लाला,अरशद मिलन ,सय्यद मोईन, मोहम्मद शाह, दुर्गेश कुमावत आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Sunday, May 17, 2020

मानवत येथून तीस उत्तर प्रदेश येथील परप्रातीय मजुर एस टि बस ने रवाना.

मानवत येथून तीस मजुर औरंगाबाद येथे एस टि बस ने रवाना.
[]औरंगाबाद येथुन रेल्वेने उत्तर प्रदेशला पाठविणार []

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि. १७:  लॉकडाऊन मुळे प्रत्येक जिल्ह्यात इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत मजुरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिल्यानंतर आता मजूर आपल्याला आपल्या गावी परतु लागले आहे  प्रशासनाच्यावतीने एसटी बसची सोय केली जात आहे मानवत तालुक्यात  उतरप्रदेश येथून आलेल्या  ३० मजुर आलेले होते या मजुरांना जाण्यासाठी  तालुका प्रशासनाने माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बसची सोय करून दि.१६ मे रोजी  सकाळी त्यांना मानवत येथून औरंगाबाद येथे पाठविण्यात आले  गेल्या खूप दिवसापासून देशभरात लाँकडाउन सुरू आहे या मुळे प्रत्येकी तालुक्यात जिल्हास्तरावर इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत या मजुरांचे हाल होत असल्याने सदरील मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी शासनाने दिली आरोग्य तपासणी करून मजुरांना त्यांच्या गावी पाठवले जात आहेत त्यांची प्रवासाची सोय महामंडळाच्यावतीने केली जात असून मानवत येथे तीस मजूर अडकून पडले होते या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी माननीय तहसीलदार डी.डी. फुपाटे साहेब ,नायब तहसीलदार नकुल वाघुंडे साहेब, न.पा.चे. मुख्य अधिकारी उमेश ढाकणे साहेब, मानवत बस स्थानकाचे  प्रमुख  जाधव साहेब,  गोपनीय शाखेचे नारायण ठमके यांनी मजुरांसाठी बसची व्यवस्था केली होती डॉ.ललित कोकरे. वैद्यकीय अधिकारी,श्री.सुनिल खरात.औषध निर्माण अधिकारी.ग्रा.रु. यांनी   डॉ.नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांची  मानवत बसस्थानक येथे थरमल तपासणी करुन मजुराना सकाळी बसमध्ये बसवुन  मानवत बसस्थानकावरुन औरंगाबाद येथे  पाठवून दिले आहे औरंगाबाद येथुन विशेष रेल्वेने हे मजुर उत्तर प्रदेशला रवाना होणार आहे.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक,तलाठी अरविंद चव्हाण ,अरुण मानेकर,हाफिज बागवान आदी उपस्थीत होते.

Thursday, May 14, 2020

आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांच्या हस्ते हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन .

आमदार सुरेशरावजी  वरपुडकर यांच्या हस्ते  हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन .

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार 

दि.१४: परभणी येथे खरेदी विक्री संघात शासकीय नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष तथा पाथरी विधानसभाचे आमदार सुरेशरावजी वरपूडकर साहेब यांच्या हस्ते  दि. १३ मे रोजी करण्यात आले.
शेतकऱ्यांनी केलेल्या ऑनलाइन नोंदणी नुसार ही खरेदी करण्यात येणार असून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस एम एस  द्वारे आमंत्रित करण्यात येणार आहे.

Wednesday, May 13, 2020

मानवत येथे परमपूज्य श्री .श्री .रविशंकर जी याच्यां जन्म दिवसानिमित्त रक्तदान शिबिर.

मानवत येथे परमपूज्य श्री .श्री .रविशंकर जी याच्यां जन्म दिवसानिमित्त रक्तदान शिबिर.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील  वाघेश्वर उद्यान येथे सोशल डिस्टनस चे पालन करुन १३ मे रोजी  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्री श्री रविशंकर जी  गुरुजी याच्यां जन्म दिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुन जन्मदिवस  साजरा करण्यात आला या रक्तदान शिबीरात ७१  रक्तदात्यांनी रक्तदान  केले पाथरी विधानसभाचे माजी आ.मोहनराव फड,युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते रक्तदानाचे प्रमाणपञ देण्यात आले.यावेळी शरद भैय्या ,भास्कर भैय्या,अंकुश भैय्या,नंदू भैय्या तामादे, थोरे भाऊ ,तिवारी काका  व सर्व गुरुप्रेमी उपस्थीत  होते.

मानवत येथील गोरगरीब व मध्यमवर्गीयांना अन्नधान्य उपलब्ध करा- राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष शेख जुबेर

मानवत येथील गोरगरीब व मध्यमवर्गीयांना  अन्नधान्य उपलब्ध करा- राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष शेख जुबेर

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.१३: कोरोना कोव्हीड १९ या  आजारामुळे देशभरात लॉकडाऊन लागु करण्यात आला असुन यात मानवत येथील  गोरगरीब व मध्यमवर्गीय नागरीकांचे फार हाल होत असुन ज्या नागरीकांकडे कोणत्याही प्रकारचे राशनकार्ड नाहित अशा नागरीकांना अन्नधान्य उपलब्ध करुन द्यावे अशा मागणीचे निवेदन मा. अन्नधान्य पुरवठा मंञी महाराष्ट्र राज्य यांना तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत दि.११ मे रोजी मानवत राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांनी दिले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की,  कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे केन्द्रसरकारने १७ मे पर्यत  लॉकडाऊन केले  आहे तसेच मागील दिड महिण्यापासुन लॉकडाऊन  सुरु असल्यामुळे शहरातील रोज मजुरी करुन आपली उपजीविका चालविणारे तसेच मध्यमवर्गीय नागरीकांवर उपासमारीची वेळ आली आहे कारण हाताला काम नसल्यामुळे पैसे नाहित यामुळे घर कसे चालवावे हा प्रश्न त्यांना पडला आहे यामुळे शासनाने ज्या नागरीकांकडे राशनकार्ड नाहित अशा लोकांना अन्नधान्य पुरवठा करावा जेने करुन बुखबळीमुळे कोणीहि उपाशी मरणार नाहि यासाठी लवकरात लवकर ज्या नागरिकाकडे राशनकार्ड नाहि अशा लोकांकडून अर्ज घेऊन त्यांना राशन वितरित करावे असे नमुद करण्यात आले आहे.निवेदनावर शेख जुबेर
शेख साबेर शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस , तन्वीर खान,अर्जुन वाघमारे,सलीम पठाण आदीच्या स्वाक्षरी आहेत.

मानवत येथील हरिविठ्ठल स्वस्त औषधी कडून पोलिसांना सँनिटाइजर चे वाटप

मानवत येथील हरिविठ्ठल स्वस्त औषधी कडून पोलिसांना  सँनिटाइजर चे वाटप      
  मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील पोलीस प्रशासनाला त्यांच्या कामांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सँनिटाइजर चा वापर करण्यासाठी पॉकेट सँनिटाइजर  चे वाटप शहरातील केंद्र सरकारच्या जेनेरिक मेडिसिन संकल्पनेतून असलेले हरिविठ्ठल स्वस्त औषधी सेवा यांच्याकडून जेवढे कर्मचारी तेवढे  सनीटाझर  चे वाटप करण्यात आले यावेळी मानवत नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे हरिविठ्ठल स्वस्त औषधी चे संचालक राणा संजय नाईक यांच्या हस्ते हे सँनिटाइजर  पोलीस प्रशासनाला पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी मानवत नगरपालिकेचे नगरसेवक विनोद रहाटे यांच्यासह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार साहेब, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची उपस्थित होती यावेळी ब्रँडेड कंपनीचे म्हणजे हिंदुस्तान यूनिलिव्हर या कंपनी चे लाईफबॉय हे पॉकेट सँनिटाइजर  पोलिसांना देण्यात आले त्याबद्दल पोलीस प्रशासनाने आभार व्यक्त केले.

Saturday, September 7, 2019

जिल्हयातील बोगस नोदणीकृत बांधकामगारांवर कारवाई होणार - कामगार अधिकारि आर.जी.रुमाले
विशेष प्रतिनीधी /  मुस्तखीम बेलदार
दि.७: परभणी जिल्हयातील बोगस बांधकामकामगार यांनी जी बोगस नोदणी केली आहे ती स्वता तात्काळ रद्द करुन घ्यावी अन्यथा बोगस कामगारांचा शोध मोहिम घेऊन  कारवाई करण्यात येईल असे आवाहान पाथरी डेली  शी बोलताना परभणी जिल्हा कामगार अधिकारि श्री. आर.जी.रुमाले यांनी केले आहे.
परभणी जिल्हयात जवळपास ४०००० नोदित बांधकामकामगार असुन महाराष्ट्र राज्य ईमारत व ईतर बाधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने नोदणीकृत बाधकाम कामगाराना मंडळाच्या वतीने २९ योजना राबवुन आर्थीक मदत दिली जाते पण चुकिच्या माहितीमुळे नागरीकांनी बांधकामकामगार म्हणुन नोदणी केल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे अशा बोगस नोदित बांधकामकामगारांचा कार्यालयाकडुन शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे यामुळे ज्या बोगस बांधकामकामगार यांनी नकळत  नोदणी केली आहे ती नोदणी स्वत  रद्द करुन घ्यावी अन्यथा कामगार कार्यालयाकडुन  होणाऱ्या शासकिय कारवाईस सामोरे जावे लागेल असे आवाहान परभणी जिल्हा कामगार अधिकारि श्री .आर. जी.रुमाले यांनी केले आहे.

Sunday, December 2, 2018

बेताल वकतव्य करणाऱ्या मांजलगाव येथील डी वाय एस पी भाग्यश्री नवटक्के यांना बंडतर्फ करण्याची मागणी.

बेताल वकतव्य करणाऱ्या मांजलगाव येथील डी वाय एस पी भाग्यश्री नवटक्के  यांना बंडतर्फ करण्याची मागणी.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२: मांजलगाव येथील डीवायएसपी भाग्यश्री नवटक्के  या महिला अधिकाऱ्याने केलेल्या बेताल वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वञ व्हायरल होत आसुन याचा गांभीर्याने विचार करून या महिला अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून कर्ततव्यात कसूर केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात यावे या मागणीचे निवेदन  दिनांक ०१  डिसेंबर रोजी मानवत येथील समस्त फुले-शाहू-आंबेडकर वादि  नागरिकांच्या वतीने तहसीलदार मानवत मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ,सदरील महिला पोलीस अधिकाऱ्याने दलितांना हातपाय बांधून मारते आणि आजपर्यत  २१  दलितांना फोडून काढले आहे व ऍट्रॉसिटीचा राग काढते आणि खोट्या केसमध्ये दलितांना अडकविते तसेच सवर्ण समाजाची बाजू घेऊन  गोरगरीब जनतेस वेठीस धरते असे बेताल वक्तव्य महिला पोलीस अधिकाऱ्यांनी करणे म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम या महिला अधिकारी करीत आहेत अशा पद्धतीने आपल्या पदाचा गैरवापर करून दलित समाजातील लोकांवर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत अन्याय अत्याचार होत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागायची सदरील बेताल वक्तव्य व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे या महिला पोलीस अधिकार्‍याने दलितांवरील तपासणी केलेल्या सर्व गुन्हे ची  सीबीआय मार्फत सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर बंडतर्फ  करण्यात यावे तसेच ज्या २१  दलितांना या महिला पोलीस अधिकाऱ्याने फोडून काढले आहेत तसेच त्यांच्यावर अन्याय केलेला आहे व खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्वरित परत घेण्यात येऊन झालेल्या त्रास पोटी त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा  निवेदनात दिला आहे निवेदनावर ॲड.मिलिंद तुपसमुद्रे ,कार्तिक मजमुने, आनंद पंचांगे, सागर गाडे, अमोल मगर, किरण पंडित, विनोद लोखंडे ,सावन जोंधळे, विजय धबडगे, गौतम जमदाडे अयुब भाई, आशिष घुगे, शुभम पंचांगे, विकी नवरे आदिच्या  स्वाक्षरी आहेत.

Thursday, November 15, 2018

Manwath news

मानवत येथे हजरत  टिपु सुलतान यांच्या जयंतीचे आयोजन.
मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१५: हजरत टिपु सुलतान यांच्या २६८ व्या जयंती निमित्त मानवत शहरात २० नोव्हेंबर रोजी शासकिय विश्रामगृह पासुन या मिरवणुकिस सुरुवात होऊन  मेनरोडमार्ग  पोलीस ठाणे पासुन टिपु सुलतान चौक पर्यत मिरवणुक काढुन जयंती साजरी करण्यात येणार आहे. हजरत टिपु सुलतान यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवानेते डॉ.अंकुश लाड हे राहणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक विनोद राहाटे उपस्थीत राहणार आहे.हजरत टिपु सुलतान जयंती कार्यक्रमात युवकांनी व नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान समीतीचे संयोजक वाजेद भाई शेख, एजाज़ खान,अमोल मगर
,हुसेन खान,वसीम अन्सारी
,शेख शफियोदिन
, इरफान खान यांनी केले आहे.

स्व.नेञदिप दगडु यांच्या जन्म दिनानिमित्त रोग निदान व भव्य रक्तदान शिबीराचे मानवत येथे आयोजन.

स्व.नेञदिप दगडु यांच्या जन्म दिनानिमित्त रोग निदान व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१५: मानवत येथील स्वर्गिय नेञदिप नंदुभाऊ यांच्या जन्म दिनानिमित्त सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन १७ नोव्हेंबर रोजी गोदावरी मंगल कार्यालय बांगड टॉकिज रोड येथे डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
या सर्वरोगनिदान शिबीरात मधुमेह ,र्हदयविकार,दमा,अस्थमा,पोटविकार,नेञरोग तपासणी,स्ञीरोग ,अस्थिरोग,कान नाक घसा,त्वचारोग ,बालरोग आदी आजाराचे तपासणी व रोगनिदान करण्यात येणार असुन यासाठी तज्ञ डॉकटर रुग्णाची तपासणी करनार आहे.तसेच स्वर्गिय नेञदिप नंदुभाऊ यांच्या जन्म दिनानिमित मानवत शहरातील सर्व सेवाभावी संस्था व विविध मिञमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी ईच्छुक रक्तदात्यांनी या शिबीरात येऊन रक्तदान करण्याचे आवाहान डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टचे डॉ.नारायणसा दगडु ,डॉ.निनांद दगडु ,अँड गणेश मोरे पाटिल,कुलदिप दगडु ,विशाल कडतन यांनी केले आहे.

Wednesday, November 7, 2018

मानवत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने विद्यार्थी दिन उत्साहात साजरा .

मानवत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने  विद्यार्थी दिन उत्साहात साजरा .

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.७: मानवत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने ईडिया बँकजवळ मेनरोड येथे  आज दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम शाळेत प्रवेश दिन निमित्त विद्यार्थि दिवस साजरा करण्यात आला .

७ नोव्हेंबर १९०० या दिवशी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील  शाळेत प्रवेश घेतला होता यासाठी शासनाने ७ नोव्हेंबर हा विद्यार्थि दिन साजरा करावा असा निर्णय घेण्यात आला होता या निमित्त मानवत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने विद्यार्थि दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नगरसेवक  आनंद भदर्गे ,असीर बेलदार ,ॲड. संजय हजारे,विलास खरात सर,सपंत पंडित,चंन्द्रकांत मगर,छगन भदर्गे , विलास खरात सर, सरोदे सर,  अनिरुद्ध भाले, सचिन धबडगे, पैंजने सर, राजेश महिपाल या मान्यवराचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशास ११८ वर्ष पुर्ण झाले या निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थीतांना अमोल मगर व विलास खरात सर यांनी मार्गदर्शन केले .
सुञसंचालन व आभार प्रदषण विजय खरात यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण पंडित, कार्तिक मजमुने, शुभम पंचांगे, विनोद लोखंडे, आनंद पंचांगे, पवन धापसे, सावन जोंधळे, सागर गाडे, विकी नितनवरे,सुनील खरात,नागसेन पंडित , दादा खंदारे, दयासागर भक्ते, विजय भदर्गे, प्रवीण बनसोडे,विजय धबडगे , बाबा ढवळे,अमित दुध्वडे, बाळू अवचार
किरण पंडित, नागशेन पंडित, संविधान पंडित आदीनी परिश्रम घेतले .

Monday, November 5, 2018

भाजपा कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत पोहचवाव्यात - आमदार मोहन फड

शासनाच्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत पोहचवा-आ.मोहन फड
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.५ : भारतीय जनता पक्षाची केद्रात व महाराष्ट्रात ४ वर्षापासुन सत्ता असुन या माध्यमातून शासनाच्या वतीने नागरीकांसाठी विविध योजना काढल्या आहेत त्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत कार्यकर्तानी पोहचवावेत असे आवाहन पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड यांनी केले ते यावेळी सी एम चषक मानवत येथील  आढावा बैठकित कार्यकर्तेना मार्गदर्शन करताना म्हणाले.
मानवत येथे  दि. ४ नोव्हेंबर  रविवार रोजी  वाघेश्वर मंदिर नवीन गार्डन नेताजी सुभाष विद्यालय जवळ १२ वाजता सी एम चषकानिमित्य आढावा बैठकीचे आयोजन व बुथप्रमुख आढावा बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते  यावेळी व्यासपिठावर
भाजपा चे जिल्हा अध्यक्ष अभय भाऊ चाटे, जिल्हा संघटन सरचिटणीस बाबासाहेब जामगे,युवानेते डॉ.अंकुश लाड, भाजपाचे तालुका अध्यक्ष अंनंत  गोलाईत,  सी एम चषकाचे जिल्हा संयोजक रंगनाथ सोळंके आदी उपस्थीत होते.
यावेळी व्यासपिठावरील मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व देशातील सर्वात मोठ्या क्रिडा व कला महोत्सव होणार असुन पाथरी विधानसभात हि या क्रिडा स्पर्धाचे आयोजन होणार आहे यासाठी कार्यकर्ता ची अडी अडचणी यावेळी जाणुन घेण्यात आल्या .या कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकुश जगताप यांनी केले तर सुञसंचालन ॲड.वैजनाथ काळे यांनी केले या कार्यक्रमास पाथरी विधानसभाचे भाजपाचे कार्यकर्ते व  इंद्राणी मिञमंडळाचे पदाधिकारि मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.

      

        

Sunday, October 28, 2018

मुस्लीम मुलीच्या लग्नासाठी जन्मभूमी फाऊंडेशनची १०००० रुपयाची आर्थीक मदत युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते सुपुर्द !

मुस्लीम मुलीच्या लग्नासाठी जन्मभूमी फाऊंडेशनची आर्थीक मदत.


मानवत/मुस्तखीम बेलदार
दि.२८: जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतिने शहरातील गरीब गरजू मुस्लिम मुलीच्या लग्ना साठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते  मुलीच्या आईस रविवार २८ ऑक्टोबर रोजी मदत करण्यात आली.
मानवत शहरातील साने गुरूजी वाचनालय परिसरात राहाणा-या बेगम मुखरमखा बानो यांच्या पतीचे  नुकतेच निधन झाले आहे तर बेगम मुखरमखा बानो यांचे -हदयाचे बायपास झाल्याने मोठे अर्थीक संकट उभे राहीले होते. यातच वयात अलेल्या मुलीचे लग्न जमलेले असल्याने हा परिवार मोठ्या अर्थिक संकटात सापडला होता. घरात कर्ता पुरूष  नसल्याने मुलीचे चार दिवसावर आलेले लग्न कसे करावे ही चिंता त्यांना सतावत होती. मलीचे लग्न चार नोहेंबर रोजी असल्याने या विषयीची माहिती जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात देण्यात आली. रविवार २८ ऑक्टोबर रोजी जन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील यांनी १० हजाराच्या अर्थिक मदतीचा चेक घेऊन मानवत येथील युवा नेते डॉ अंकूश लाड, पत्रकार लालाजी बाराहाते, गोपाल लाड, शामराव झाडगांवकर, विस्तार अधिकारी  संदिपान घुंबरे, लक्ष्मणराव साखरे, शरदराव उगले, माजी नगराध्यक्ष मोहन लाड ,बाबूभाई झरीवाले, किरण घुंबरे पाटील यांच्या हस्ते बेगम मुखरूमखा बानो यांना ही मदत देण्यात आली. या वेळी या परिवाराने साश्रु नयनांनी जन्मभूमी फाऊंडेशन परिवाराचे आभार मानले.

Tuesday, October 23, 2018

पै.तानाजी भाऊ जाधव यांचा मानवत नगरीत जंगी स्वागत .

तानाजी भाऊ जाधव यांचा मानवत नगरीत जंगी स्वागत .
मानवत/मुस्‍तखीम बेलदार
२३: टायगर ग्रुपचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक पै. तानाजी भाऊ जाधव यांचा २२ अॉकटोबर  रोजी मानवत शहरात टायगर ग्रुप च्या वतीने  व शहरातील नागरिकांच्या वतीने जंगी नागरी सत्कार  करण्यात आला.
रात्री दहाच्या सुमारास तानाजी जाधव यांचे आगमन महाराणा प्रताप  चौकात होतात यावेळी फटक्याची आतिषबाजी करून मानवत तालुका अध्यक्ष शेख समीर ,अन्वर भैय्या शेख व  शिवसेना शहर प्रमुख  बालुभाऊ दहे यांनी तानाजी जाधव यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले त्यानंतर चारचाकी व  दुचाकी वाहनांचा ताफा शहरातुन निघाला यावेळी लक्ष्मीनारायण मंदिर जवळ समाजसेवक ॲड. गणेश मोरे यांचे वतीने फटाके वाजवून जाधव यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यानंतर सरकारी दवाखाना जवळ सचिन मगर,सतीष मगर  व शैलेश  वडमारे यांच्या वतीने तानाजी भाऊ जाधव यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यानंतर सर्वांचे आभार मानून तानाजी भाऊ जाधव हे  परभणी येथील नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले यावेळी शेख समीर, अन्वर भाई सरकार ,सय्यद समीर, शेख शफिक,वसीम कुरेशी ,शेख आझहर,महबुब मन्सुरी ,शंकर भाऊ कच्छवे ,जावेद भाई मिलन,आसेफ खान  यांच्यासह टायगर ग्रुप चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Monday, October 22, 2018

बोरगाव येथील शाळेसाठी एकहजार पुस्तके देणार-आमदार मोहनभाऊ फड

शाळेसाठी एकहजार पुस्तके देणार-आ.मोहन फड.
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत तालुक्यातील ताडबोरगांव  येथे  पाथरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मोहन भाऊ फड यांनी भेट देऊन   देवी दर्शन केले व मारोती मंदिर येथे जाउन दर्शन घेतले आणि यावेळी गावकरीशी बैठक घेऊन  चर्चा केली . ग्राम पंचायत सदस्य मंचकराव जोगदंड यांनी आमदार मोहन भाऊ यांचा यावेळी  सत्कार केला. पाणी आणि पांदन रस्ता काम या बाबत  चर्चा केली गावकरी मंडळीनी  अनेक प्रश्न केले आमदार मोहन भाऊ फड यांनी मार्गदर्शन केले आणि जिल्हा परिषद शाळा व जिल्हा परिषद नवीन  वाचनालयात भेट दिली व आईधन  वाचनालयसाठी एक हजार पुस्तके मुलाना देणार असल्याचे मार्गदर्शन करताना आ.फड यावेळी म्हणाले . शाळेत  विद्यार्थ्यांनी  आमदार मोहन भाऊ फड यांचे जग्गी स्वागत केले शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.यावेळी  राजु जोगदंड, विठ्ठल गुगाने, शेख रियाज, विलास जंगले, खदीरखान ,रंगनाथ निर्वळ, गोहीद अवचार आदी उपस्थीत  होते .

Thursday, August 16, 2018

मानवत तहसिलचे कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांना परभणी जिल्हयांचे पालकमंञी मा.गुलाबराव पाटिल यांच्या हस्ते उत्कृष्ट अधिकारी पुरस्काराने सन्मान.

नकुल वाघुंडे उत्कृष्ट अधिकारी पुरस्काराने  सन्मानित .
मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि,१६: मानवत येथील तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांना १५ अॉगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे  स्वतंत्रता दिवस आणि महसुल दिन निमित्त मा.गुलाबराव पाटिल मंञी  महाराष्ट्र राज्य तथा  पालकमंत्री परभणी यांचे हस्ते  उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल उत्कृष्ट  अधिकारी पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.  यावेळी  मा.खासदार बंडुजी  जाधव व मा. जिल्हाधिकारी पी .शिवा शंकर उपस्थीत होते. 

Friday, August 10, 2018

दिल्ली येथे समाजकंटकानी संविधानाचे दहन केल्याच्या निषेधार्थ मानवत येथे आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ताचे आंदोलन.

दिल्ली येथील घटनेचा मानवत येथील आंबेडकरी चळवळीच्या वतीने  निषेध.

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१०: देशाची राजधानी दिल्ली येथील जंतर मंतर येथे  काहि समाजकंटकानी भारतीय संविधानाचे दहन केल्याचे निषेधार्थ मानवत येथे शिव,फुले शाहु आंबेडकरी चळवळीच्या वतीने निषेध करुन तहसिलदार मानवत मार्फत मा.राष्टृपती  यांना आज दि.१० अॉगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,दि.९ अॉगस्ट रोजी जंतर मंतर दिल्लीयेथे भारताचे संविधानाचे दहन काहि मनुवादी व सनातन वादी विचारसरणीच्या केले आहे राजधानी असणाऱ्या दिल्लीत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहि असणाऱ्या स्वतंत्र्य सार्वभौम देशाच्या राज्यघटनेची प्रत देशद्रोहीनी जाळली आहे तसेच एस.सी.,एस.टि,ओबीसी मुर्दाबाद व संविधान निर्माते मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या या बाबतचे वृत्त कोणत्याहि प्रसारमाध्यमांनी दाखवले नाही हे सर्व प्रकार घडत असताना पोलीसमाञ बघ्याची भुमीका घेत होते भारतीय राज्यघटनेची आपमान करणाऱ्यावर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करावी अन्यथा १५ अॉगस्ट पासुन लोकशाहि मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी मोठ्याप्रमाणात समस्त शिव फुले शाहु आंबेडकर चळवळी चे कार्यकर्ते उपस्थीत होते.

Tuesday, June 26, 2018

मानवत येथील बेलदार फंगशन हॉल येथे २७ जुनरोजी सकाळी ८-३० वाजता ग्रामीण रुग्णालय मानवत च्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन.

मानवत येथील बेलदार फंगशन हॉल येथे २७ जुनरोजी  आरोग्य शिबिराचे आयोजन.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२६: ग्रामीण रुग्णालय मानवत च्या वतीने  दि.२७ जुनरोजी सकाळी ८-३० वाजता बेलदार फंगशन हॉल येथे नागरीकासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबीरात ४० वर्षावरील नागरीकांची संपुर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तसेच गर्भवती महिलाची हि तपासणी करण्यात येणार आहे व नेञतपासणी ,शुगर तपासणी,रक्त तपासणी व बीपी तपासणी अशा सर्व तपासण्या या शिबीरात करण्यात येणार आहे.या आरोग्य तपासणी साठी शिबीर प्रमुख  वैद्यकीय अधिकारि  डॉ.नजम शेख,स्ञीरोग तज्ञ डॉ.मनीषा गुजराथी ,नेञ चिकित्सा अधिकारि डॉ.कुमावत,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारि श्री.टोनपे,औषध निर्माण अधिकारि सचीन कदम,समुपदेषक राजु कच्छवे ,प्रयोगशाळा तंञज्ञ श्री.कपील भरड,प्रयोगशाळा तञज्ञ कु.करवलकर ,एस.एस.मानवतकर आदी नागरीकांच्या तपासणीसाठी  उपस्थीत राहणार आहे.तरी या आरोग्य शिबीराचे लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहान वैद्यकीय अधिक्षक नरेद्र वर्मा,शिबीर प्रमुख  वैद्यकीय अधिकारि  डॉ.नजम शेख यांनी केले आहे.

Thursday, June 14, 2018

मानवत येथील युवक पुर्णा रेल्वेस्टेशनवरुन बेपत्ता !

मानवत येथील युवक पुर्णा रेल्वेस्टेशनवरुन बेपत्ता !
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१४: मानवत येथील राहणारा युवक नाव शेख मुस्तफा शेख.अब्दुल करीम वय १९ हा युवक पुर्णा रेल्वेस्टेशन वरुन दि.१२ जुन रोजी सध्याकाळ पासुन बेपत्ता झाला आहे.
या विषयी प्राप्त माहितीनुसार मानवत शहरातील बिहारी कॉलनी येथील  रहिवाशी शेख मुस्तफा शेख.अब्दुल करीम वय १९ हा युवक कामासाठी हिगोली येथे गेला होता पण रमजानईद साठी तो मानवतला दि.१२ जुन रोजी हिगोली येथुन मानवतकडे निघाला होता व सध्याकाळी ६ वाजुन ३५ मिनीटाला त्याने घरी फोन करुन आपण पुर्णा रेल्वेस्टेशन ला उतरलो आहे आसे त्याने कळविले माञ त्यानंतर त्याचा काहि पत्ता लागला नाही व फोन हि बंद येत आहे युवकाच्या वडिलांनी मुलगा घरी कसकाय पोहचला नाही म्हणुन हिंगोली येथे व जवळपास च्या नातेवाईकाकडे विचारपुस केली पण त्या युवकाचा काहि ठावठिकाणा बातमी लिहिपर्यत लागलेला नाहि प्राप्त माहितीनुसार हिगोली पोलीसस्टेशन येथे मिसिंग असल्याबाबत तक्रार अजुन दाखल झाली नाही युवकाच्या अचानकपणे बेपत्ता झाल्याने त्याचे आई वडिल काळजी करत असुन हा युवक कोणास कुठे दिसल्यास  ९०४९०५०६०२ या मोबाईल क्रमाकावर कळवावे असे आवाहान त्याचे वडिलाकडुन  करण्यात येत आहे.

Thursday, June 7, 2018

पाथरी येथील ॐ कार मल्टीस्पेशालिटि हॉस्पीटल येथे येत्या रविवारी दि.१० जुन रोजी वेध भविष्याचा कार्यक्रमाचे आयोजन.

पाथरी येथे वेध भविष्याचा कार्यक्रमाचे आयोजन.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

दि.०७: पाथरी येथील  ॐ कार मल्टीस्पेशालिटि हॉस्पीटल येथे  येत्या रविवारी दि.१० जुन रोजी १० वी १२ वी पास विद्याथ्याना पुढिल शिक्षणासाठी  मार्गदर्शन करण्यासाठि सर्व  क्षेत्रातील मान्यवर मंडळी मार्गदर्शन करणार आहेत .           
या एकदिवशीय कार्यशाळेचा उपयोग परिसरातील सर्व १०वी व १२वी उत्तीर्ण अनुत्तीर्ण केव्हा निकाल बाकी आहेत अशा प्रत्येक विद्यार्थिना मार्गदर्शन होणार आहे . 
सर्व मुलांपर्यंत हा निरोप जाणे अतिशय महत्वाचे आहे जेणे करून त्या विध्यार्त्याला त्याच्या भविष्यासाठी योग्य तेच क्षेत्र निवडता येईल .                            कार्यशाळेचे हे प्रथम वर्ष आहे  तरी सर्व विद्यार्थि मिञानी व पालकानी व नागरिकांनी तसेच पञकार मिञानी  मोठ्याप्रमाणात उपस्थीत राहण्याचे आवाहान या कार्यक्रमाचे संयोजक डॉ.जगदिश शिंदे ॐकार मल्टीस्पेशालिटि हॉस्पीटल पाथरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Friday, June 1, 2018

हटकरवाडि च्या उपसरपंचपदी श्रीमती नाजरिन रुस्तुम शेख यांची बिनविरोध निवड!!!

हटकरवाडीच्या सरपंचपदी सौ. कांताबाई नाईक यांची एकमताने निवड.
[]तर उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांची निवड[]
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.०१:  दोन महिन्यांपासून रिक्त झालेल्या हटकरवाडी तालुका मानवत येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. कांताबाई विठ्ठलराव नाईक यांची गुरूवारी दि ३१ मे रोजी  एकमताने निवड करण्यात आली.
सरपंचपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा निवडणूकपुर्व अटिमुळे  माजी सरपंच सखाराम जोरवर व सौ. कांताबाई नाईक यांच्यात झाला होता. या करारानुसार सरपंच श्री.जोरवर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही निवड लांबणीवर पडली. दरम्यान  गुरूवारी ३१ मे रोजी  सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या उपस्थितीत निवड सभा बोलाविण्यात आली. यावेळी सर्व नऊ सदस्यांनी उपस्थिती लावली. सर्व सदस्यांनी एकमताने सौ.कांताबाई  विठ्ठलराव नाईक यांची निवड केली. तर उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांचेच नाव कायम ठेवण्यात आले .त्यानंतर पिठासीन अधिकारी वसंतराव वाघमारे यांनी या निवडीला अधिकृत दुजोरा दिला. ग्राम विकास अधिकारी परमेश्वर घाटगे यांनीही पीठासीन अधिकार्यांना सहाय्य केले. यावेळी सरपंच सौ. नाईक यांचा सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बिट जमादार शेख व पोलीस नाईक जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त दिला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला.

उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांची बिनविरोध निवड !

हटकरवाडीच्या सरपंचपदी सौ. कांताबाई नाईक यांची एकमताने निवड.
[]तर उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांची बिनविरोध निवड[]
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.०१:  दोन महिन्यांपासून रिक्त झालेल्या हटकरवाडी तालुका मानवत येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. कांताबाई विठ्ठलराव नाईक यांची गुरूवारी दि ३१ मे रोजी  एकमताने निवड करण्यात आली.
सरपंचपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा निवडणूकपुर्व अटिमुळे  माजी सरपंच सखाराम जोरवर व सौ. कांताबाई नाईक यांच्यात झाला होता. या करारानुसार सरपंच श्री.जोरवर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही निवड लांबणीवर पडली. दरम्यान  गुरूवारी ३१ मे रोजी  सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या उपस्थितीत निवड सभा बोलाविण्यात आली. यावेळी सर्व नऊ सदस्यांनी उपस्थिती लावली. सर्व सदस्यांनी एकमताने सौ.कांताबाई  विठ्ठलराव नाईक यांची निवड केली. तर उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांचेच नाव कायम ठेवण्यात आले .त्यानंतर पिठासीन अधिकारी वसंतराव वाघमारे यांनी या निवडीला अधिकृत दुजोरा दिला. ग्राम विकास अधिकारी परमेश्वर घाटगे यांनीही पीठासीन अधिकार्यांना सहाय्य केले. यावेळी सरपंच सौ. नाईक यांचा सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बिट जमादार शेख व पोलीस नाईक जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त दिला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला.

Saturday, May 19, 2018

आ.मोहन फड यांच्या प्रयत्नामुळे मानवत येथे रमजानच्या महिण्यात लोडसेटीग बंद!

पाथरी विधानसभाचे आ.मोहन फड यांच्या प्रयत्नास यश
[]  मानवत येथे रमजानच्या काळात महिनाभर लोडसेटीग बंद  []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१९: पाथरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार मोहन फड यांनी रमजान महिण्याच्या काळात लोडसेटीग बंद करण्याची मागणी म.रा.वि.म. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्यांच्या या प्रयत्नास यश आले असुन मुस्लीम बाधवाच्या पविञ रमजान महिण्यात महिनाभर लोडसेटीग न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ने घेतला आहे यामुळे मानवत येथील मुस्लीम समाज आमदार मोहन फड यांचे आभार व्यक्त करित आहे.
दि.१७ मे पासुन मुस्लीम धर्मियाचा पविञ असा रमजान महिना सुरु झाला आसुन सध्या उन्हाचा कडक तडाखा बसत असताना उपवासाचा महिणा सुरु आसल्याने यामुळे मुस्लीम बांधवाना लोडसेटीग मुळे ञास होऊ नये यासाठी  पाथरी,मानवत,सोनपेठ व परभणी तालुक्यातील लोडसेटीग रमजान च्या काळात महिनाभर म.रा.वि.मंडळ च्या वतीने होणारी लोडसेटीग बंद करण्यात यावी व व्यवस्थित विजपुरवठा करावा  या मागणीचे विशेष बाब म्हणुन १६ मे रोजी परभणीचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांना आ.मोहन फड यांनी निवेदन देऊन लोडसेटीग बंद करण्याची मागणी करण्यात आली होती याची दखल 
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने घेतली असुन रमजान काळात मानवत येथील लोडसेटीग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आमदार मोहन फड यांच्या या कार्याबद्दल मानवत येथील  मुस्लीम बांधव कृतता व्यक्त करित आहे.

Thursday, April 26, 2018

राजकिय विरोधकांनी सुडबुध्दीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला - डॉ.अंकुश लाड.

विरोधकांनी सुडबुध्दीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला - डॉ.अंकुश लाड.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२६: मानवत येथील  कॉंग्रेसच्या माजी जिल्हाअध्यक्षाला शिवीगाळ केल्याप्रकरणी मानवत येथिल भाजपा युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्यावर  मानवत पोलिस ठाण्यात दिनांक २४ एप्रिल मंगळवारी रोजी मध्यरात्री  गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे राजकिय वातावरण तापले असुन डॉ.अंकुश लाड यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना म्हणाले की,हा माझ्यावर गुन्हा खोटा दाखल करण्यात आला असुन राजकिय सुडबुध्दीने हे प्रकरण दाखल करण्यात आले असुन आमच्या विकास कामानी विरोधक धास्तावले असुन त्यांचे राजकिय कारर्किर्द धोख्यात आले असल्यामुळे अशा प्रकारचे खोटे गुन्हे विरोधक दाखल करत असुन आम्ही अशा प्रकरणाला घाबरणार नसुन आ.मोहन फड यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्न करत राहणार असे ते म्हणाले.
सविस्तर वृत्त असे की  कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांना दिनांक २४ एप्रिल मंगळवारी रोजी  यांच्या राहत्या घरी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या  कार्यालयात बसले असताना डॉ. अंकुश लाड हे मद्यधुंद अवस्थेत तेथे आले व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ  करित आम्ही नगर अध्यक्षाचे जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातुन घेऊन आलो आहोत. तुमच्याने आमचे काहीही वाकडे झालेले नाही. तुमचे बघून घेऊ. तुम्ही सतत आमच्या विरोधातील  तक्रारदाराला मदत करीत होतात  आता यापुढे आम्ही  तुमचे व्यक्तिगत पातळीवर बघून घेऊ असे धमकी देत आसल्याची तक्रार बालकिशन चांडक यांनी मानवत पोलीस स्टेशन येथे दिली होती माञ डॉ.अंकुश लाड यांनी आपल्या वरील सर्व आरोप फेटाळुन लावले असुन चाडक यांचे राजकिय कारकिर्द संपल्यामुळे ते नैराश्येतुन असे आरोप करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

                 

Tuesday, April 24, 2018

मानवत येथील के.के.एम.कॉलेजचे प्राध्यापक पवन पाटील बारहाते यांना पीएच.डी प्रदान.

प्रा.पवन पाटील बारहाते यांना पीएच.डी प्रदान.

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.२४: मानवत येथील के.के.एम महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा.पवन प्रकाशराव पाटील बारहाते यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांच्या  उच्च व निम्न सामाजिक-आर्थिक दर्जा असलेल्या आंतरविद्यापीठीय खो- खो खेळाडूंची चिंता,ताण व मानसिक स्वास्थाचा एक अभ्यास या संशोधन कार्यास पीएच डी पदवी प्रदान केली आहे. त्यांना डॉ. एस. एस.शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
प्रा. पाटील यांच्या यशाबदल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रूवार,उपाध्यक्ष द्वारकादास लड्डा,कोषाध्यक्ष रामचंद्र कत्रूवार ,सहसचिव अनिल नखाते,विजयकुमार दलाल,दिलीप हिबारे,बालकिशन चाडक व  संस्थचे इतर कार्यकारिणी  सदस्य, माजी प्राचार्य डॉ.अशोक चिंदुरवार,प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे,उपप्राचार्य डॉ. टी. व्ही. मुंडे व सर्व सहकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आसुन शहरातुन सर्वच स्तरावरुन त्यांना शुभेच्छा मिळत आहे.

Sunday, April 22, 2018

मानवत येथे शिवसेनेच्या वतीने पाथरी येथील आक्रोश मोर्चासाठी मानवत येथे मोटर सायकल रँलीचे आयोजन.

पाथरी येथे शिवसेनेचा शेतकरी आक्रोश मोर्चा .

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

पाथरी येथे दि .२३ एप्रिल रोजी सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले असुन या मोर्चासाठी मानवत शहरातून भव्य मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
हि मोटर सायकल रॅली सरकारी दवाखान्या समोर वेळ ठीक  ९-३० वाजता निघणार आहे . तरी मानवत तालुक्यातील  शेतकरी व नागरिकांनी या रँलीत मोठ्याप्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन  मानवत तालूका शाखा व शहर शाखा सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिकाच्या वतीने करण्यात आले आहे.

मानवत शिवसेनेच्या वतीने पाथरी येथील आक्रोश मोर्चासाठी मानवत येथे मोटर सायकल रॅली चे आयोजन.

चपाथरी येथे शिवसेनेचा शेतकरी आक्रोश मोर्चा .

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

पाथरी येथे दि .२३ एप्रिल रोजी सोमवारी                       शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले असुन या मोर्चासाठी मानवत शहरातून भव्य मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
हि मोटर सायकल रॅली सरकारी दवाखान्या समोर               वेळ ठीक  ९-३० वाजता निघणार आहे .                    तरी मानवत तालुक्यातील  शेतकरी व नागरिकांनी या रँलीत मोठ्याप्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन  मानवत तालूका शाखा व शहर शाखा सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Friday, April 13, 2018

सोनपेठ येथे भाजपाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आभिवादन.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना सोनपेठ भाजपाच्या वतीने विनम्र अभिवादन.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

सोनपेठ येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने  बालाप्रसादजी मुदंडा यांच्या भगिरथी निवासस्थानी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्टनेते रमाकांतराव जाहागिरदार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बालाप्रसादजी मुदंडा, जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे,युवा मोर्चाचे मा. प्रदेश सदस्य रंगनाथराव सोळंके, तालुका अध्यक्ष महादेव गिरे पाटील, तालुका सरचिटणीस मल्लिकार्जुन सौंदळे, शहराध्यक्ष धनंजय देशमुख, संतोष दलाल, मंगेश मुळी, पत्रकार सुदर्शन डाके आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday, April 7, 2018

मानवत येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यां जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

मानवत येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यां  जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.७ : मानवत येथे क्रांतिसुर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १० एप्रिल  ते १४ एप्रिल दरम्यान विविध प्रबोधनात्मक व  संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संत सावता माळी चौक येथे करण्यात आले आहे.
१० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मराठा सेवा संघाच्या राज्य प्रवक्ता ॲड वैशाली डोळस यांचे महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.
११ एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त रोजी सकाळी दहा वाजता मोटारसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले असुन या दुचाकी फेरीचे उदघाटन माजी नगराध्यक्ष अमृतराव भदर्गे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी सहा वाजता भारत भाग्य विधाता या महा नाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन विजय वाकोडे यांच्या हस्ते होणार आहे.  यावेळी सचिन कोक्कर, शाम चव्हाण, सत्यशिल धबडगे,  रहिम बागवान, संजय बांगड, बाबूराव नागेश्वर, वैजनाथ महिपाल, दत्ताअ चौधरी, गोविंद घाडगे, उपस्थित राहाणार आहेत.
१२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही जलसा कार्यक्रम होणार आहे. उदघाटन डॉ अंकुश लाड यांच्या हस्ते होणार आहे. गणेश कुमावत, विनोद राहाटे, गिरीश कत्रूवार, राजेश कडतन, बाबूराव हलनोर, मोहन लाड, केशव शिंदे आदी उपस्थित राहाणार आहेत. सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष राजु खरात राहाणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात उपस्थीत  राहावे असे आव्हान  नगरसेवक राजुभैय्या खरात, नगरसेवक अनंता भदर्गे ,दिपक ठेंगे, चंद्राकांत मगर. नितीन गवळी, रवि पंडित, जनार्धन किर्तने यांनी केले आहे. 

Thursday, April 5, 2018

संभाजी ब्रिगेडच्या मानवत तालुकाध्यक्षपदी गजानन बारहाते यांची निवड!

संभाजी ब्रिगेडच्या मानवत तालुकाध्यक्षपदी गजानन बारहाते यांची निवड.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.०५: मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या मानवत तालुकाध्यक्षपदी श्री. गजानन बारहाते यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच संघटनेच्या औरंगाबाद येथे झालेल्या मराठवाडा विभागीय अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या हस्ते श्री.बारहाते यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे मराठवाडा विभागाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, शांताराम कुंजीर आदी उपस्थित होते.अधिवेशनात गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.गजानन बारहाते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात.आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून  युवकांचे संघटन मानवत तालुक्यात उभे केले आहे.त्याच्या कार्याची दखल घेत त्याची निवड करण्यात आली आहे.या निवडिबद्दल त्यांना सर्वच स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.