Thursday, April 3, 2025

मानवत शहरात लवकरच महिलांसाठी शौचालय सुविधा – डॉ. अंकुश लाड

मानवत शहरात लवकरच महिलांसाठी शौचालय सुविधा – डॉ. अंकुश लाड
मानवत/ मुस्तखीम बेलदार
ग्रामीण भागातून मानवत शहरात येणाऱ्या महिला आणि शहरातील माता-भगिनींसाठी लवकरच सुविधायुक्त सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन मानवत शहराचे युवानेते डॉ. अंकुश लाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.

महिलांना शहरात येताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, यामध्ये शौचालयाच्या अपुऱ्या सुविधांमुळे होणारा त्रास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या समस्येच्या स्थायी समाधानासाठी लवकरच नियोजन करून आवश्यक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात येतील, असे डॉ. लाड यांनी स्पष्ट केले.

तसेच, महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी आधुनिक शौचालयांची उभारणी करून त्या ठिकाणी योग्य स्वच्छतेची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. लवकरच यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Monday, March 31, 2025

शेक हॅन्डचा रमजान ईद निमित्त सामाजिक योगदान!

शेक हॅन्डचा रमजान ईद निमित्त सामाजिक योगदान
[] निराधार महिलेस स्वावलंबी बनवण्यासाठी  दिली गिरणी भेट []

मानवत / मुस्तखीम बेलदार
शेक हॅन्ड संस्थेने रमजान ईदच्या पवित्र पर्वावर सामाजिक कार्याचा एक नवीन आदर्श प्रस्तुत केला आहे. संस्थेने इशरत बी शेख मोहिद्दीन यांना पीठ व दाळ तयार करण्यासाठी गिरणी भेट देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. इशरत शेख यांच्या पतीचे आजाराने निधन झाले असून, त्यांना तीन अपत्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत अवघड आहे, कारण त्यांच्याकडे घर, जमीन किंवा इतर संपत्ती नाही. रोज मरणासन्न मजुरी करून त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो.

इशरत शेख यांचे मूळ गाव सुरपिंपरी आहे आणि त्या सध्या मानवत येथे राहत आहेत. त्यांचे तीन अपत्य, शेख शाहिद, सुमैय्या बी, आणि शेख सय्यद यांचा शिक्षणासाठी संघर्ष करत आहेत. इशरत यांना एक नवा रोजगार सुरू करण्यासाठी मदतीची आवश्यकता होती, म्हणून शेक हॅन्ड संस्थेने रमजान ईदच्या निमित्ताने त्यांना पीठ आणि डाळ तयार करण्यासाठी गिरणी भेट दिली. यामुळे त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला सुधारू शकतील आणि स्वावलंबी होऊ शकतील.

या कार्यक्रमासाठी शेक हॅन्ड संस्थेच्या अर्चना भारस्वाडकर, वैभव ठाकूर, शाम गाडेकर, छाया गायकवाड, रत्नमाला बेले, मुंजाभाऊ शिळवने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी योगदान दिले. या वेळी मानवत येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असद खान, छाया गायकवाड, प्रियंका दुमाणे, श्री नेवरीकर सर तसेच शेक हॅन्ड चे परमेश्वर सिराळ, शरद लोहट यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

शेक हॅन्ड संस्थेचे हे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरले असून, त्यांनी सामाजिक जबाबदारी पार केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे मानवत परिसरात नवा आदर्श निर्माण झाला आहे.

Friday, March 28, 2025

मानवत येथे काळ्या फिती लावून मुस्लीम बांधवाचे वक्फ संशोधन विधेयकास विरोध

मानवत येथे काळ्या फिती लावून मुस्लीम बांधवाचे वक्फ संशोधन विधेयकास विरोध
मानवत/ मुस्तखीम बेलदार
जुमा तुल विदा म्हणजे रमजान महिण्याचा शेवटचा शुक्रवार या दिवशी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनाल लॉ बोर्ड ने देशभरात वकफ संशोधन विधेयक २०२४ च्या विरुद्ध निषेध म्हणून शुक्रवार च्या नमाजा मध्ये हाताला काळी पट्टी बाधुन नमाज पढुन वकफ बिलाचा विरोध मौन प्रदषण करण्याचे आवाहान केले होते या साठी वक्फ संशोधन विधेयक २०२४ विरोधात मानवत येथील मुस्लीम बांधवानी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे. हे विधेयक वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण बदल सुचवते, ज्यामुळे  मुस्लिम संघटना आणि नेत्यांनी त्याचा विरोध केला आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) आरोप केला आहे की हे विधेयक देशभरातील वक्फ संपत्ती हडपण्याच्या उद्देशाने तयार केले गेले आहे. त्यांनी संयुक्त संसदीय समितीवर (JPC) काम ईमानदारीने न केल्याचा आरोपही केला आहे. 
जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सैयद सआदतुल्लाह हुसैनी यांनीही विधेयकाची टीका केली आहे, असे सांगत की हे मुस्लिम समुदायासाठी स्वीकारार्ह नाही आणि वक्फ संपत्तीच्या स्वायत्ततेला कमी करते. विधेयकाच्या तरतुदींमध्ये वक्फ संपत्तीवरील अतिक्रमण, वक्फ निधीचा दुरुपयोग, आणि आवश्यक माहिती न देणे यांसाठी नवीन अपराध आणि त्यानुसार दंडांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, वक्फ संपत्तीवर अवैध कब्जा केल्यास २ वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. केंद्र सरकारने विधेयकात १४ बदल मंजूर केले असून, विरोधी पक्षांचे ४४ प्रस्ताव नाकारले आहेत. या बदलांमध्ये वक्फ बोर्डामध्ये गैर-मुस्लिम सदस्यांची नियुक्ती, वक्फ संपत्तीच्या नोंदणीसाठी वेळेची मर्यादा, आणि जिल्हाधिकारी यांची भूमिका वाढवणे यांचा समावेश आहे. 
या पार्श्वभूमीवर, मानवत येथील नागरिकांनी काळ्या फिती लावून या विधेयकाचा विरोध दर्शविला आहे, ज्यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चा आणि चिंता व्यक्त केल्या जात आहेत.

Friday, February 14, 2025

वझुर येथील शेतकऱ्याचे वाऱ्याने सोलार पंपाचे मोठे नुकसान 

वझुर येथील शेतकऱ्याचे वाऱ्याने सोलार पंपाचे मोठे नुकसान 
मानवत प्रतिनिधी
वजुर खुर्द येथील गट क्रमांक १६ मध्ये विठ्ठल तातेराव वावडे या शेतकऱ्याचे शेतात १२ फेब्रुवारी रोजी वावटर व वाऱ्याने सोलारचे मोठे नुकसान झाले आहे.
विठ्ठल तातेराव वावडे  शेतकरी यांचे१२ फेब्रुवारी रोजी वावटर व वाऱ्याने  सौर ऊर्जा कृषी पंप सोलार चे पाच पाट्या पूर्ण निकामी झाली आहे यामध्ये सदरील शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या संबंधी त्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी अशी ती मागणी करत आहे.

Monday, February 3, 2025

राजश्री शाहू महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

राजश्री शाहू महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
मानवत,/प्रतिनिधी 
येथील राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात अकरावी व बारावीतील वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाच्या आयोजन केले होते यात सकाळ-सत्रामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर अंकुश भाऊ लाड अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांत लिंग काळे प्रमुख अतिथी रितेश भैया काळे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी मुख्य मार्गदर्शक श्री बजरंग ग्रीडा शिक्षण विस्तार अधिकारी मानवतप्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण कवी आत्माराम कुठे  दत्ताभाऊ चौधरी नगरसेवक मानवत  श्री किसन भिसे अध्यक्ष स्पोर्ट अकॅडमी मानवत काशिनाथ शिंदे संचालक समाज प्रबोधन संस्था पात्री लक्ष्मण पाठक प्राचार्य महात्मा बसेश्वर कनिष्ठ महाविद्यालय रामटाकळी तसेच सत्यशील धबडगे दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी मानवत उपस्थीत होते.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक अंकुश भाऊ लाड यांनी मानवत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक गुणवत्तेची गरज असून शैक्षणिक कार्यासाठी व मानवत शहराच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्न शील असून शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मानवत शहरांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मानवत शहर हे शिक्षणाचे माहेरघर झाले पाहिजे यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बजरंग गिलडा यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रेयरणादायी गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने मेहनत घेतली तर विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी होतो यासाठी अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले 
तसेच ग्रामीण कवी आत्माराम कुठे यांनी उत्कृष्ट अशा देशभक्तीपर सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानावर कविता सादर केल्या माय बापावर प्रेम करा ही कविता सादर केली प्रेमावर कविता करून तरुणांची मने जिंकलीशेतकरी दादा तुला दलाला लुटलं या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर हास्यविनोद करून कार्यक्रमात रंगत आणत विद्यार्थ्यांची मनी जिंकली मानवत शहरातील राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांनी मानवत चे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकवले अशा गौरी दहे आरती चव्हाण व संध्या पिंपळेया विद्यार्थिनीचा युवानेते डॉ अंकुश भाऊ लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मानवत शहरातील निर्भया पथक प्रमुख शकुंतला ताई चणे यांचा प्राचार्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी अध्यक्ष समारोप करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले तर उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतात त्यासाठी संस्था विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष शांत लिंग काळे यांनी सांगितले या कार्यक्रमात आनंद नांदगावकर सर यांनी काढलेल्या स्नेहसंमेलनाच्या उत्कृष्ट रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा भगवान घाटूळ यांनी तर सूत्रसंचालन गोविंद रासवे सर यांनी केले आभार प्रदर्शन प्राचार्य शिवशक्ती कुकडे मॅडम यांनी केले 
यानंतर विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला व दुपार सत्राला सुरुवात झाली याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम मराठमोळी लावणी लोकगीत कथक नृत्य पोवाडा शाहिरी अशा विविध कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या तसेच शेलापागोटे व संगीत शेलापागोटेचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच प्राध्यापक संतोष पवार यांनी केलेल्या अनेक शेरोशायरी मधून कार्यक्रमाला रंगत आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत जोजारे कुरेशी सर काशिनाथ जाधव यांनी केलेआणि शेवटी संगीतावर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनसोक्त डान्स करत आनंद घेतला यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांती लिंग काळे सर यांनी विद्यालयातील उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांचे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य शिवशक्ती कुकडे प्रा संतोष पवार प्रा  भगवान घाटूळ गोविंद रासवे गोविंद पाटील प्रा अनुसया काळे दैवशाला शिरसागर सुनिता शिंदे  प्रा शिवराज गिराम प्रा गजानन चौरे प्रा मुंजाजी कांबळे प्रवीण पवार इत्यादींनी परिश्रम घेतले.

Tuesday, January 28, 2025

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीच्या अध्यक्षपदी ओंकार  वाघमारे तर उपाध्यक्षपदी शिवाजी ठोंबरे यांची निवड

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीच्या  अध्यक्षपदी ओंकार  वाघमारे यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दिनांक २६ जानेवारी रविवार रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या  जयंतीनिमित्त जिजाऊ नगर मानवत येथे बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील सर  मुख्य मार्गदर्शक नारायण पानझाडे, हे होते यावेळी समाज बांधवांच्या उपस्थितीत गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीची निवड करण्यात आली असून, जयंती समितीचे अध्यक्षपदी ओंकार माणिक वाघमारे, तर उपाध्यक्ष म्हणून शिवाजी दीपक  ठोंबरे, सचिव राजेंद्र देविदास कांबळे, सहसचिव  शिवाजी भगवान शिंदे, कोशाध्यक्ष ज्ञानेश्वर उत्तम पानझाडे,  कार्याध्यक्ष परमेश्वर वाघमारे तर सल्लागार म्हणून प्रा.एस. एन. पाटील सर , मुरलीधर ठोंबरे, नारायण पानझाडे, हनुमान नांदुरे, मदनराव कांबळे, सुदामराव कांबळे व सदस्यपदी भागवत कांबळे, रमेश केंदळे, शिवप्रसाद कावळे, गणेश कांबळे, रामेश्वर पानझाडे, कृष्णा सावरे, घनश्याम कुरील, कमलाकर फुलपगार,  यांची निवड करण्यात आली असून येणाऱ्या २३ फेब्रुवारी रविवार रोजी गुरु रविदास महाराज, राजे छत्रपती शिवाजी महाराज, व गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचे निश्चित झाले आहे २३  फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते बारा मध्यवर्ती बँक ते महाराणा प्रताप चौकातून गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार व या नंतर बारा ते तीन निमंत्रित मान्यवरांचे सत्कार व मनोगत चा कार्यक्रम संपन्न केला जाईल, व लागलीच कार्यक्रम स्थळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे या बैठकीत ठरले आहे.
या वेळी अर्जुन ठोंबरे,संतोष कांबळे, ज्ञानोबा नेटक, रामेश्वर पानझाडे, विलास पानझाडे, गणेश पानझाडे, गणेश कांबळे, मारोती पवार,हरी ठोंबरे, शिवा पानझाडे, तुकाराम पानझाडे, दिनेश आधाटे, बालाजी पानझाडे, अशोक कांबळे, रमेश ठोंबरे  यांच्या  सह  चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीच्या  अध्यक्षपदी ओंकार  वाघमारे यांची निवड

 श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीच्या  अध्यक्षपदी ओंकार  वाघमारे यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 दिनांक २६ जानेवारी रविवार रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या  जयंतीनिमित्त जिजाऊ नगर मानवत येथे बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील सर  मुख्य मार्गदर्शक नारायण पानझाडे, हे होते यावेळी समाज बांधवांच्या उपस्थितीत गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीची निवड करण्यात आली असून, जयंती समितीचे अध्यक्षपदी ओंकार माणिक वाघमारे, तर उपाध्यक्ष म्हणून शिवाजी दीपक  ठोंबरे, सचिव राजेंद्र देविदास कांबळे, सहसचिव  शिवाजी भगवान शिंदे, कोशाध्यक्ष ज्ञानेश्वर उत्तम पानझाडे,  कार्याध्यक्ष परमेश्वर वाघमारे तर सल्लागार म्हणून प्रा.एस. एन. पाटील सर , मुरलीधर ठोंबरे, नारायण पानझाडे, हनुमान नांदुरे, मदनराव कांबळे, सुदामराव कांबळे व सदस्यपदी भागवत कांबळे, रमेश केंदळे, शिवप्रसाद कावळे, गणेश कांबळे, रामेश्वर पानझाडे, कृष्णा सावरे, घनश्याम कुरील, कमलाकर फुलपगार,  यांची निवड करण्यात आली असून येणाऱ्या २३ फेब्रुवारी रविवार रोजी गुरु रविदास महाराज, राजे छत्रपती शिवाजी महाराज, व गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचे निश्चित झाले आहे २३  फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते बारा मध्यवर्ती बँक ते महाराणा प्रताप चौकातून गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार व या नंतर बारा ते तीन निमंत्रित मान्यवरांचे सत्कार व मनोगत चा कार्यक्रम संपन्न केला जाईल, व लागलीच कार्यक्रम स्थळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे या बैठकीत ठरले आहे.
या वेळी अर्जुन ठोंबरे,संतोष कांबळे, ज्ञानोबा नेटक, रामेश्वर पानझाडे, विलास पानझाडे, गणेश पानझाडे, गणेश कांबळे, मारोती पवार,हरी ठोंबरे, शिवा पानझाडे, तुकाराम पानझाडे, दिनेश आधाटे, बालाजी पानझाडे, अशोक कांबळे, रमेश ठोंबरे  यांच्या  सह  चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, January 27, 2025

महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कुंभारी तांडा येथे शाळेला शालेय साहित्याचे वाटप

महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कुंभारी तांडा येथे शाळेला शालेय साहित्याचे वाटप

मानवत / मुस्तखीम बेलदार 
  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  मानवत तालुक्यातील कुंभारी तांडा येथील महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन जिल्हा परिषद शाळा कुंभारी तांडा येथे शाळेला पाच हजार रुपयांचे शालेय साहित्य देण्यात आले या मध्ये शालेय साहित्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन फॅन व शिक्षकांसाठी एक ऑफिस फॅन देण्यात आले तसेच शाळेला सक्षम व विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी पेन वह्या व भेट वस्तू देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
        यामध्ये महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचालक दिलीप चव्हाण व त्यांचे सहकारी माणिक राठोड तसेच क्रुष्णा चव्हाण, विकास चव्हाण यांनी या कार्यास आपले मोलाचे योगदान दिले
संस्थेच्या या कार्याबद्दल जिल्हा परिषद शाळा कुंभारी तांडा या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक संजय जाधव (मुख्याध्यापक) व दिनकर ढाकणे सर (शिक्षक) यांनी (सेवाभावी संस्था चालक) दिलीप चव्हाण व माणिक राठोड, कृष्णा चव्हाण, विकास चव्हाण, अमोल राठोड, अशोक चव्हाण, विनोद चव्हाण, सचिन जाधव यांचे स्वागत करुन आभार व्यक्त केले.ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी नवनविन उपक्रम राबविण्यात यावे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायत मार्फत सक्षम  बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे असे आव्हान दिलीप चव्हाण महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालक यांनी नवयुवकांना तसेच ग्रामस्थांना सुचवले.

Wednesday, January 22, 2025

मनपा नारेगावच्या शाळेला जर्मनी येथील पाहुण्यांची भेट

मनपा नारेगावच्या शाळेला जर्मनी येथील पाहुण्यांची भेट
औरंगाबाद /प्रतिनीधी 
मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा नारेगाव येथे २२ जानेवारी  रोजी  केंद्रीय मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती संगीता ताजवे मॅडम आणि मुख्याध्यापक श्री अब्रार अहमद सर यांच्या उपस्थितीमध्ये आय एस पी एफ आणि सेमिंस अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रोजेक्ट जिज्ञासा ईन्टर स्कुल स्टिम फेअर अंतर्गत इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्याची विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते ही विज्ञान प्रदर्शनी दरवर्षी घेण्यात येते विशेष म्हणजे यावर्षी विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने संयोजकांनी  इयत्ता सातवी ते दहावी मधून दोन भागात ही प्रदर्शनी  घेण्याचे ठरविले व  इयत्ता सातवी व आठवीचे विज्ञान प्रदर्शनी मध्ये इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महत्वपूर्ण बाब म्हणजे या प्रदर्शनीसाठी जर्मनी येथून सिमेंस कंपनीचे फायनान्स लीडरशिप टीम ज्यामध्ये मिस्टर ऑर्बन वॉन फॅड्रिक सर , मिस्टर जिग्नेशाह सर आणि श्रीमती सौंदरम सुंदरम मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. विदेशी पाहुण्यांचा स्वागत लेझीमद्वारे व शाल पुष्पगुच्छ आणि विशेष भेटवस्तू देऊन करण्यात आले .
 शाळेचे मुख्याध्यापक श्री सय्यद अबरार अहमद सर आणि श्री जुबेर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोजेक्ट जिग्यासाचे 
Iनम्रता सोनवणे मॅडम आणि स्टेम कोच श्री शरद गवई  सर यासोबत शाळेच्या शिक्षक वृंद यांच्या सहभागाने आजचे विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.विदेशी पाहुण्यांनी नारेगावच्या स्मार्ट शाळेची बारकाईने पाहणी केली व शाळेची व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ..
संयोजकांकडून तीन विजेते आणि जर्मनी येथून आलेल्या पाहुण्यांतर्फे विशेष दोन पारितोषिक देण्यात आले यात प्रथम क्रमांक
सालिक परवेज जावेद इम्रान ३५००रु,
 नवाज एजाज आणि यखीन अजीम३०००,
 मोमीन इन्सरा इरफान२५०० रु तर विशेष पारितोषिक मध्ये शेख आलिया वसीम २०००रु व शेख साद शफिक २०००रुपयाचे पारीतोषीक विद्यार्थीना मिळाले आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Thursday, January 16, 2025

मानवतचे विद्यार्थी पुन्हा ठरले चॅम्पियन

मानवतचे विद्यार्थी पुन्हा ठरले चॅम्पियन
 मानवत / मुस्तखीम बेलदार 
 छ.संभाजी नगर (औरंगाबाद ) येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या राष्ट्रीय खुली कराटे स्पर्धा मध्ये मास्टर्स स्पोर्ट्स अकॅडमी मानवतचे एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. काथा व कुमीते या दोन्ही प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कराटेचे प्रदर्शन करून एकूण ३२ पदकांची कमाई केली .ज्यामध्ये२० सुवर्णपदक व ११ रौप्य आणि १कांस्यपदक आहे .पदक पटकावलेल्या स्पर्धकांत
कार्तीक राऊत, गौरव गायकवाड, खुजैमा सय्यद, जफर खॉं, नवीद सय्यद, रेहान शेख, मोहम्मद मोईन, अहमद शेख, विश्वरत्न धापसे, रोमान कुरेशी, उमर अन्सारी, समीर सय्यद, जुबेर अली, फातिमा शेख, अक्षरा साळवे, नेहा शेख विद्यार्थी आहे.    मार्गदर्शक सत्तार मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रशिक्षक आसिर खॉं बशीर खॉं पठाण यांनी प्रशिक्षण दिले. या स्पर्धेसाठी श्री विलास खरात सर ,बालाजी शिंदे ,सुरेश देवर्षी यांचे सहकार्य लाभले, डॉक्टर शेख अलीम, डॉक्टर आरजू मॅडम तसेच स्पर्धकांच्या पालकांनी अभिनंदन केले, हाजी रफिक कुरेशी यांनी हॉल उपलब्ध करून सहकार्य केले.

Friday, January 10, 2025

व्हाईस आँफ मिडियाचे तालुकाध्यक्ष कचरुलाल बारहाते यांचा भव्य सत्कार

व्हाईस आँफ मिडियाचे तालुकाध्यक्ष कचरुलाल बारहाते यांचा भव्य सत्कार
मानवत / मुस्तखीम बेलदार 

व्हाईस ऑफ मीडियाच्या मानवत  तालुकाध्यक्षपदी कचरुलाल बारहाते  यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल   बुधवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५  वाजता मानवत येथे व्हाईस ऑफ मीडिया  संघटना पदाधिकाऱ्यांच्या  वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला 
सोमवारी ६ जानेवारी रोजी दैनिक देशोन्नती कार्यालयात दर्पण दिनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीमध्ये दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी व्हाईस ऑफ मीडियाच्या मानवत  तालुकाध्य निवडी संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी कचरुलाल बारहाते  यांची तिसऱ्यांदा मानवत तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली त्यामुळे  राजकिय, सामाजिक, ईष्ट मिञमंडळाच्या वतिने त्यांचा यशोचित सत्कार होत आहे बुधवार 8 जानेवारी  व्हाईस ऑफ मीडियाच्या  पदाधिकाऱ्यांच्या  वतिने शहरातील दैनिक देशोन्नती कार्यालयात कचरुलाल बारहाते  यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा  बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पञकार सत्यशिल धबडगे, प्रा.किशन बारहाते,प्रा.गोविंद गहीलोत,भैय्यासाहेब गायकवाड,  मुस्तखीम बेलदार,अलीमखान पठाण,विलासराव बारहाते,ईरफान बागवान, हाफिज बागवान,शेख  रियाज, प्रमोद तारे,डॉ.एम, ए, रिजवान ,कपील शिंदे उपस्थीत होते.

प्रतिक्रिया .....
माझ्यावर विश्वास दाखवून व्हाईस ऑफ मीडियाच्या आपण सर्व पत्रकारांनी  माझी तिसऱ्यांदा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वाचे मनःपूर्वक धन्यवाद येणाऱ्या काळात पञकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून शासन दरबारी  प्रयत्न करुन पञकांराना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहू

कचरुलाल बारहाते
तालुकाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया, मानवत 

Monday, December 16, 2024

परभणी येथील घटनेचा मानवत चर्मकार महासंघांच्या वतीने निषेध

परभणी येथील घटनेचा मानवत चर्मकार महासंघांच्या वतीने निषेध
मानवत / मुस्तखीम बेलदार 
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री मा. श्री. बबनराव (नाना) घोलप यांच्या आदेशानुसार  सोमवार दिनांक १६ डिसेंबर  रोजी  परभणीत येथे घडलेल्या संविधान अवमान प्रकरणी निषेध नोंदविण्यात आला व या घटनेचा निषेध करुन तहसिलदार कार्यालय मानवत येथे निवेदन देण्यात आले आहे.
 दिनांक १० डिंसेबर रोजी परभणी जिल्ह्यात डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील चौकात संविधान प्रतिकृतीची माथेफिरूने अवहेलना केली होती. राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे अशा विकृत प्रकाराचा जाहीर निषेध करून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय महासचिव पंढरीनाथ पवार व राष्ट्रीय महिला अध्यक्ष सरोज ताई बिसुरे प्रदेशाध्यक्ष कार्यसम्राट माधवराव गायकवाड, प्रदेशाध्यक्ष शांताराम कारंडे, राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे,यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय मानवत येथे निवेदन देण्यात आले या वेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे,मानवत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे, परभणी जिल्हा सचिव सचिव विलास पतंगे, माजी नगराध्यक्ष प्रा. एस.एन.पाटील सर, परमेश्वर  पाटील, बळीराम पतंगे, रमेश हाळणे, रामेश्वर पानझाडे, शिवाजी ठोंबरे, अशोक पाटील, गोविंद हळणे शिवाजी पानझाडे, रतन कांबळे, बाबासाहेब कांबळे, किशन हरणे, अमर पतंगे, राजु शिंदे, रमेश केंदळे याच्यांसह  चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, December 12, 2024

परभणी शहरामधील कोम्बींग ऑपरेशन थांबवा मानवत येथील आंबेडकरवादि नागरीकांची मागणी

परभणी शहरामधील कोम्बींग ऑपरेशन थांबवा मानवत येथील आंबेडकरवादि नागरीकांची मागणी
मानवत / मुस्तखीम बेलदार 

परभणी शहरामधील कोम्बींग ऑपरेशनातील होत असलेली  धरपकड प्रशासनाने  तात्काळ थांबवावी या मागणीचे निवेदन मानवत तहसिलदार पांडुरंग माचेवाड याच्यां मार्फत जिल्हाधिकारी साहेब परभणी व जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब  परभणी यांना दि.१२ डिंसेबर रोजी मानवत शहारातील आंबेडकरवादि नागरीकांच्या वतीने  देण्यात आले आहे.
 परभणी शहरामधील कोम्बींग ऑपरेशन धरपकळ तात्काळ थांबविण्यात यावी
दि. ११/१२/२०२४. रोजीच्या परभणी येथिल बौध्द समाजाच्या महामोर्चाला गालबोट लागल्यामुळे परभणी शहरामध्ये पोलीसांमार्फत कोम्बींग ऑपरेशन धरपकड राबविण्यात येत आहे ते तात्काळ थांबवावे  बौध्द समाजाच्या लोकांवर जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल करण्यात येवू नये वरील विषयास मे. साहेबांनी तात्काळ दखल घेवून कोम्बींग ऑपरेशन धरपकड तात्काळ
थांबविण्यात यावी नसता मानवत तालुक्यातील हजारो नागरीक आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असे दिलेल्या  निवेदनात नमुद केले आहे.
निवेदनावर रवि पंडी, दिपक ठेंगे, नंदु कुमावत ,नागसेन भदर्गे ,ॲड आनंद वाघमारे
,करण ब्रम्हराक्षे ,छगन भदर्गे , कैलास शिंदे ,हरिचद्र सुखले, महेन्द्र नारायण ठेंगे
, उबसंल कांबळे ,शरद कांबळे , अनीस शेख
याच्यासह  आंबेडकरवादी नागरीकांच्या स्वाक्षरी आहेत. 

Wednesday, December 11, 2024

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मानवत कळकळीत बंद!

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मानवत कळकळीत बंद
मानवत / मुस्तखीम बेलदार 
परभणी येथे दि.१० डिंसेबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या  प्रतिमेची  विटंबना करण्यात आली होती या घटनेच्या  निषेधार्थ मानवत येथील  समस्त आंबेडकर अनुयायी व संविधान प्रेमी जनतेकडुन दि.११ डिंसेबर रोजी मानवत शहरातील व्यापाऱ्यानी सह स्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने  बंद करुन निषेध करत तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे.
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर ठेवलेल्या संविधानाची प्रतिमा सोपान दत्तराव पवार रा. मिर्झापुर ता. जि. परभणी या व्यक्तीने उचलून रोडवर फेकून दिली आहे. या व्यक्तीवर देशद्रोही चे गुन्हे दाखल करुन त्यास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी.

तसेच या देशद्रोही व्यक्तीच्या पाठीशी कोणती जातीवादी व देशद्रोही शक्ती आहे याची चौकशी करुन त्या सर्वांना कठोर शासन करण्यात यावे. या मागणीसाठी  दि.११ डिसेंबर रोजी मानवत शहर बंद ठेवून निषेध नोंदविण्यात येत आहे.
वरील सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
यावेळी  शैलेष वडमारे, राजुभैय्या खरात,अनंत भदर्गे ,
संपत पंडित , जनार्धन किर्तने ,गोविंद घांडगे,  रविभाऊ पंडीत ,दिपक ठेंगे ,राहुल डाके ,धम्मपाल सोनटक्के ,नंदुभाऊ कुमावत , सत्यशिल धबडगे ,नागसेन भदर्गे ,राहुल कुभकर्ण ,शेख वाजेद ,शेख मुस्ताक , शगीर खान यांच्यांसह मोठ्यासंख्येने  आंबेडकर अनुयायी व संविधान प्रेमी नागरीक उपस्थीत होते.

Saturday, October 12, 2024

शहरांच्या विकासात मानवत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर - आमदार राजेश दादा  विटेकर

शहरांच्या विकासात मानवत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर - आमदार राजेश दादा  विटेकर
[] ९ कोटी ४५ लक्ष रुपयांच्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन []

मानवत/मुस्तखीम बेलदार
 शहरांच्या विकासात मानवत नगरपालिका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे  प्रतिपादन आ. विटेकर यांनी केले. शनिवार १२ ऑक्टो. रोजी ११ वाजता दसऱ्याच्या मुहूर्तावर जुन्या तहसीलच्या जागेवर नगरपालिकेच्या नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. 
  नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राजेश विटेकर स्वतः होते. तर विचार मंचावर ह भ प १००८ मनीषानंद पुरीजी महाराज, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, विजयकुमार कत्रुवार, विकासशील युवा नेतृत्व डॉ. अंकुश लाड, सुरेश काबरा, माजी नगराध्यक्ष एस. एन. पाटील, संजयकुमार लड्डा, गिरीश कत्रुवार आदी होते. पुढे बोलताना विटेकर म्हणाले, पाथरी विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर परभणी जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत मानवत नगरपालिका सर्वात पुढे आहे. मागील काळात आपण मानवत नगरपालिकेला कधीही निधी कमी पडून देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. हा शब्द पूर्ण करत आपण दोन महिन्याच्या काळात वीस कोटी पक्षा जास्त निधी  मानवत नगरपालिकेला दिला आहे. पुढच्या काळातही विकासाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी विजयकुमार कत्रुवार व ह.भ.प. १००८ मनीषानंद पुरीजी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत, बालाजी कुऱ्हाडे,  दत्ता चौधरी, मोहन लाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, प्रा. अरविंद घारे, सचिन कोक्कर ,नजीर विटेकर यांच्यासह शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, अभियंता, व्यावसायिक, व्यापारी, न.प. कर्मचारी, अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. अनिरुद्ध पांडे यांनी तर संचालन किशोर तुपसागर यांनी केले. 

[] विकासाचा रथ अव्याहत धावणार - डॉ. अंकुश लाड 
          नूतन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना युवानेते डॉ. अंकुश लाड म्हणाले विकासाचा रथ अव्याहतपणे धावणार आहे. तरुण व्यापारी व व्यवसायिकांसाठी शहरामध्ये अद्ययावत व्यापारी संकुलाची गरज होती.  तरुण बेरोजगारांना रोजगाराच्या संधी बरोबरच व्यापार-व्यवसाय वाढण्याची आवश्यकता होती. मानवतची बाजारपेठ एका मुख्य रस्त्यावरच उभारलेली असल्याने बाजारपेठेचे विकेंद्रीकरणही होणे गरजेचे होते. एकाच रस्त्यावर पूर्ण बाजारपेठे असल्यामुळे विशेषतः बाजाराच्या दिवशी संपूर्ण रस्ता रहदारीसाठी जाम होत होतो. याच रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट शाखा व व्यापारी दुकाने आहेत. मात्र वाहन पार्किंगसाठी कोणतीही व्यवस्था नाही. नवीन होणाऱ्या व्यापारी संकुलात २८ गाळे हे तळमजल्यावर, पाहिल्या मजल्यावर ६ गाळे  व  १६०० चौरस फूट मध्ये विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांसाठी अद्यावत असे वाचनालय होणार आहे. याशिवाय या संकुलात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असणार आहे. या संकुलामुळे व्यापार वाढण्यास मदत होईल. एवढ्या दुकानांवर भागणार नाही याची मला जाणीव आहे. यापुढेही नवीन व्यापारी संकुले उभी करून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करू. या बरोबरच काही राष्ट्रीयकृत बँकेसोबत करार करून बँकांनाही या ठिकाणी आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

Tuesday, October 8, 2024

आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा देताना कसूर करू नये - वैद्यकीय अधीक्षक डॉ.आशिक हुसेन शेख

आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा देताना कसूर करू नये - वैद्यकीय अधीक्षक डॉ.आशिक हुसेन शेख

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत ग्रामीण रुग्णालयात गेल्या आठवड्यात नूतन वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. आशिक हुसेन शेख हे रुजू झाले आहेत.  रुजू झाल्यापासून गेल्या आठ दिवसापासून रुग्णालयाचा कारभार ते सांभाळत आहेत .८ ऑक्टोबर रोजी सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली.  या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा देताना कसूर करू नये असे आवाहन त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले. गेल्या १३ वर्षांपासून मानवत ग्रामीण रुग्णालयात  वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. नरेंद्र वर्मा हे कर्तव्यावर होते.  नुकतेच शासनाकडून त्यांची बदली होऊन त्यांना स्त्री रुग्णालय परभणी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पाठवण्यात आले.  त्यांच्या जागेवर मानवत येथे डॉ. आशिक हुसेन शेख हे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातून आले.  ८ दिवसापूर्वी रुजू झाल्यानंतर पूर्ण रुग्णालयाचे कामकाजाची त्यांनी पाहणी केल्यानंतर ८  ऑक्टोबर रोजी सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली.  या आढावा बैठकीत कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात बदल करण्याची गरज असून आरोग्य सेवा पुरवताना कोणत्याही  प्रकारचा कसूर करू नये असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही योजना आरोग्य बाबतीत आहेत त्या तळागाळातील माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत.  त्याची व्यवस्थित अंमलबजावणी  आली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिक हुसेन शेख यांच्या समवेत रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय नाईक , कार्यालयीन अधीक्षक संजय जोशी , वैद्यकीय अधिकारी डॉ.  तेजा पाटील , युनानी वैद्यकीय अधिकारी डॉ. कलीम शेख , राष्ट्रीय बाळ स्वस्थ अधिकारी डॉ. ललित कोकरे,  डॉ.  सुषमा भदर्गे,  डॉ. प्रीती दीक्षित यांच्या सह औषध निर्माण अधिकारी शितल गायकवाड , मीनाक्षी कदम , इन्चार्ज अधिपाचारिका  शिला पाटील , शुभांगी जोशी , रेखा फुलमोगरे, शिवप्रिया सोगे , प्रज्ञा जगझाप , लक्ष्मी सोनवणे , एकात्मिक सल्ला व केंद्र चे राजु कच्छवे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ  नरेंद्र टोम्पे , कपिल भरड , आरोग्य सेवक अकबर पठाण ,क्ष किरण अधिकारी विष्णू टेकाळे  अधिपरीसेवीका रत्नमाला दाभाडे,  रेणुका गिराम , सारिका आखाडे , एन ची डी विभागाचे करुणा ढेपे , बालिका सुरवसे ,  दीक्षा गायकवाड ,निशा वाकळे , राष्ट्रीय बालस्वस्थ फार्मासिस्ट सचिन कदम , सुनील खरात ,शुभम करवलकर ,ज्ञानेश्वर माकुडे ,बजरंग ढवळे ,मोहन कागडा , विठ्ठल धोपटे , रमेश लेंगुळे ,  कपिल सोनटक्के , महादेव पोटे , शैलेश उघडे,  दीपक कुमावत व सुमित लाड आदी कर्मचारी उपस्थित होते.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांना दिलेला शब्द पूर्ण; दोन कोटि रुपयाचे भव्य  सभागृह बांधकामाचा शुभारंभ - युवानेते  डॉ. अंकुश लाड

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांना दिलेला शब्द पूर्ण; दोन कोटि रुपयाचे भव्य  सभागृह बांधकामाचा शुभारंभ - युवानेते  डॉ. अंकुश लाड

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत येथील आर्ट ऑफ लिव्हिंग च्या सर्व साधकाना  त्यांच्या  सोयीसाठी मानवत शहारत मोठे सभागृह उभारू असे आश्वासन युवानेते  डॉ. अंकुश लाड यांनी १७ सप्टेंबर २०२२ रोजी  दिले होते. तो दिलेला शब्द पूर्ण करीत ७ ऑक्टो रोजी शहरातील वाघेश्वर नगर परिसरात   मानवत आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारासाठी २०० लक्ष रुपयाचे भव्य असे सभागृह बांधकामाचा शुभारंभ गुरूपूरजनेने करण्यात आला.
   सद्या  मानवत शहरात शेकडो साधक असून त्यांना दैनंदिन योग साधना व विविध शिबीर आणि भजन करण्यासाठी जागेची अडचण आहे. याकरीता आम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी जागा उपलब्ध करून देऊन सभागृह निर्माण करून द्यावे अशी मागणी केली.यावेळी डॉ लाड यांनी  सांगितले की, समाजातील प्रत्येक व्यक्तीने आनंदी व समाधानी, निरोगी राहण्यासाठी योग, प्राणायाम करणे आवश्यक आहे. आपण करत असलेलं कार्य हे निश्चितच अनुकरणीय आहे. त्यामुळे मानवत नगर परिषदेच्या वतीने जागा देऊन एक भव्य सभागृह निर्माण करून देण्यात येईल. मला विश्वास आहे की, या माध्यमातून मानवत शहरातील सुदृढ व निरोगी समाज आणि तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग मोलाची कामगिरी बजावेल. 
१७ सप्टेंबर २०२२ रोजी मानवत नगर परिषद येथे जाऊन भास्कर मगर, सुनील बोरबने, दीपक शर्मा ,सचिन कोक्कर, सचिन हिबारे, दत्ता हजारे, नाना कदम व सर्व साधक यांनी डॉ लाड यांची  भेट घेतली. एक मानवतावादी व्यक्तिमत्व व अध्यात्मिक गुरु म्हणून गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची ख्याती जगभरात आहे. 'तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाज' हे त्यांचे स्वप्न आहे. यासाठी आर्ट ऑफ लिविंगची शिबिरे आणि उपक्रम सर्वत्र सुरू असतात. हि माहिती दिली होती व त्याच अनुषंगाने मानवत शहरात अत्याधुनिक असे आर्ट ऑफ लिव्हिंग चे ध्यान मंदिर असावे अशी मागणी केली होती हि मागणी लक्षात घेऊन या कामासाठी फार मोठ्या प्रमाणत निधी लागणार असल्याने डॉ लाड यांनी या करीता शासन दरबारी पाठपुरावा केला असता. त्यास यश मिळत या कामाच्या प्रत्यक्ष सुरुवात ७ ऑक्टो रोजी करण्यात आली. या वेळी या कार्यक्रमाला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षका कोमल सावरे , अन्वर सर, नगर अभियंता, आर्ट ऑफ लिविंग शिक्षक भास्कर मगर, सुनिल बोरबने, सूर्यप्रकाश तिवारी नरेंद्र रत्नपारखी, सार्वजनिक बांधकाम विभाग  पाथरी उपविभागाचे अभियंता  बालासाहेब सामाले, अंकूश गरड,  हे उपस्थित होते. या वेळी मुख्याधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना जगभरात सुरू असलेल्या सर्वांच्या शारीरिक व मानसिक आरोग्या मध्ये सुधारणा होण्यासाठी गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या तणावमुक्त व्यक्ती आणि हिंसामुक्त समाज निर्मितीच्या कार्याचे कौतुक केले आणि तेच कार्य आपल्या परिसरामध्ये वाढण्यासाठी ह्या ध्यान मंदिराचा फायदा मानवतकरांना नक्की होईल असे सांगितले.आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने भास्कर मगर यांनी गुरूपूजा आणि डॉ.अंकूश लाड व मुख्याधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पुढील कार्यास सुरुवात करण्यास सुरुवात झाली.

मानवत शहारात भव्य असे अत्याधुनिक ध्यान मंदिर होणार असल्याने आर्ट ऑफ लिव्हिंग चे   अशोक भंडारे,कार्तिक तळेकर,प्रभू वाघमारे,सारडा रामस्वरूप, नारायण थावरे(पाथरी),गोपाळ टोपे,हरिभाऊ शिसोदे,शाम दहे,अवि दहे,बाळू शास्त्री,विशाल भालेराव,अरुण कच्छवे ,संजय बाहेती,निवृत्ती गोरे,प्रकाश कदम( लिंबा),परशुराम महात्मे,राजू बुरलेवार,.रंगनाथ कोंडगिर,संतोष रुद्रकंठवार,राजेश टोपे,दत्ता कुठे,दत्ता ठोंबरे,रवींद्र ठाकूर,बाबासाहेब अवचार,सतीश अवचार,गोविंद अवचार,संजय हिबारे,दीपक महिपाल(पाथरी),रामनिरंजन सारडा , बाचेवार लक्ष्मीनारायण, सचिन हिबारे, हरिभाऊ मुळे, ईश्वर अवचार, सोमनाथ लासे,आंबेकर रामचंद्र, सुदाम रासवे,सौ.गरड ताई(पाथरी),भागवत आगे(पाथरी), ठोंबरे सर(पाथरी),हरकळ (पाथरी), नवनाथ कोल्हे(पाथरी), स्नेहा झंवर या साधकांनी नगर पालिका प्रशासनाचे व डॉ अंकुश लाड यांचे आभार मानले. 

Sunday, October 6, 2024

सावता माळी मंदिर परिसरातील नालीच्या कामाचे उदघाटन युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते संपन्न 

सावता माळी मंदिर परिसरातील नालीच्या कामाचे उदघाटन युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते संपन्न 

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत येथील संत सावता माळी मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात जात होते तसेच पाणी रस्त्यावर साचत होते.  हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बाजूने राहणाऱ्या नागरिकांनी लावून धरत  युवानेते डॉ. अंकुश लाड यांच्याकडे या बाबत मागणी केली होती याची दखल घेत  शासन दरबारी यासाठी निधी मिळविणे करीता पाठपुरावा केला या कामासाठी निधी खेचून आणला व ६ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी१० वाजता या नाली कामाचे उद्घाटन युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. 

संत सावता माळी कमान ते राष्ट्रीय महामार्ग ६१ हा साधारण ८००  ते ९००  मीटर असलेला रस्ता या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक वस्ती झाली आहे.  या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सातत्याने पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यावर पावसाच्या असो की नागरिकांचे सांडपाण्याचे दोन्ही पाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्त्याची देखील दुरावस्था होत होती.  म्हणून या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला मोठी नाली बांधून राष्ट्रीय महामार्ग ते संत सावतामाळी कमान या दरम्यान नाली झाल्यास रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे पाणी येणार नाही परिणामी ते पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही यामुळे या परिसरातील नागरीक  वारंवार डॉ. अंकुश लाड यांच्या संपर्कात होते.  नाली नसल्यामुळे होणाऱ्या त्रासाची कल्पना त्यांनी डॉ.  अंकुश लाड यांना दिली.  या मागणीचा गांभीर्याने विचार करत डॉ.  लाड यांनी शासनाकडून या कामासाठी निधी खेचून आणला ६  ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या नाली कामाचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी डॉ अंकुश लाड यांनी  या कामाचे उद्घाटन केले तर प्रभागाचे नगरसेवक गिरीशशेठ कत्रुवार , दत्ताभाऊ चौधरी  ,गणेश कुमावत ,संत सावतामाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कोक्कर , बळीराम रासवे ,इंजिनीयर बबन राऊत साहेब ,  ज्ञानेश्वर रासवे, नारायण रासवे , भिकाजी रासवे ,नामदेव कोकर ,व्यंकटेश चौधरी ,श्रीधर कोकर , उद्धव रासवे सर,वसंत मोरे, गणपत सिसोदे, डॉक्टर कहकर  साहेब ,श्री मुंजाभाऊ राऊत, प्रा.  गजू रासवे, मगर साहेब, देवा भरड, सुनील रासवे, कृष्णा रासवे, महेश वाघमारे, बालाजी रासवे ,मधुकर रासवे, मनोहर राऊत ,श्री सोपान वाघमारे, गणेश वाघमारे ,आकाश राऊत, ओम राऊत ,गणेश गोरे ,अमोल चौधरी ,कृष्णा रासवे, पप्पू डाके, हनुमान चौके शिवा शेंडगे व संत सावता माळी नगरातील सर्व रहिवासी यावेळी  उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी मानवत नगरीचे भाग्यविधाते डॉक्टर अंकुश भाऊ लाड गिरीश कञुवार दत्ताभाऊ चौधरी गणेश  कुमावत यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानन्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव रासवे  सर यांनी केले तर  आभार दत्ताभाऊ चौधरी यांनी मानले.



Friday, October 4, 2024

मानवत येथे एम आय एम पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन

मानवत येथे एम आय एम पक्षप्रवेश मेळाव्यात मोठ्यासंख्येने उपस्थीत रहा - तालुकाध्यक्ष  शेख मुस्ताक 
मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत  येथे ५  ऑक्टोबर शनीवार रोजी एम आय एम पक्षाच्यावतीने जाहीर पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला ,समीर बिल्डर तसेच परभणी जिल्हाध्यक्ष  ॲड .इम्तियाज खान , शफिक भाई,हाफेज अलीशर उपस्थित राहून मार्ग दर्शन करणार आहेत तरी नागरीकांनी या कार्यक्रमास  उपस्थीत राहण्याचे आवाहान एम आय एम पक्षाचे मानवत तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक ऊर्फ अल्लारखां यांनी केले आहे.
मागील अनेक वर्षा पासून मुस्लिम धर्माचे अनेक नेते ,युवक विविध पक्षात काम करत आहेत अनेक नेते मुस्लिम समाजाची मते घेऊन खासदार,आमदार मंत्री झालेत परंतु हेच नेते मुस्लिम समाजासाठी हिता चे कायदे न करता चुकीचे कायदे करणाऱ्याना समर्थन देत आहेत धर्म गुरु ना विनाकारण 
अटक करणे मुस्लीम धर्मा विषयी वाईट बोलणे या  नेत्यांवर कार्यवाही करण्याऐवजी त्यांना साथ देत आहे त्यामुळे मुस्लिम समाजाचे खच्चीकरण होत आहे. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी किंवा अन्य पक्ष सोबत न जाता एम आय एम पक्ष नेहमी मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत आहे. एम आय एम पक्षावर विश्वास ठेवून ५ आँकटोबंर शनीवार   रोजी शेकडो कार्यकर्ते एमआयएम पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे असे एम आय एम पक्षाचे मानवत तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक ऊर्फ अल्लारखां यांनी प्रसिद्धी पञिकेद्वारे कळविले आहे तरी जास्तीत जास्त नागरीकांनी पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थीत राहण्याचे आवाहान मानवत तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक  यांनी केले आहे.

Thursday, October 3, 2024

खय्युम बागवान यांची मानवत अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड 

खय्युम बागवान यांची मानवत अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह प्रभारी तथा अ.भा.कॉं.कमिटीचे सेक्रेटरी मा‌.श्री.कुनाल चौधरी व दिव  दमन हवेलीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.महेशजी शर्मा हे  विधानसभेच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता  त्यांच्या हस्ते व पाथरी मतदारसंघाचे  आमदार  सुरेशरावजी वरपुडकर  यांच्या उपस्थितीत, परभणी येथे खय्युम भाई (सहारा)बागवान यांची मानवत  अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या आशयाचे पञ त्यांना यावेळी  देऊन  सत्कार करुन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
यावेळी मा.नगरसेवक सय्यद जमील, मिनहाज कादरी, अनंता मामा भदर्गे , अफसर अन्सारी, शाम भाऊ चव्हाण,वसीम कुरेशी , सय्यद आरिफ ,इलियास पठान ,इरशाद बागवान ,शोएब कुरैशी ,विक्रम सिंह दहे ,गणेश दहे ,अशफाक कुरैशी ,सोनू कुरैशी शाहिद पठान आदी उपस्थीत होते.
खय्युम भाई (सहारा)बागवान यांची मानवत अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  राजकिय ,सामाजिक क्षेञातुन या निवडिचे स्वागत होत असुन त्यांना सर्व स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.



Monday, September 30, 2024

किराणा असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन कोक्कर यांची  निवड

किराणा असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन कोक्कर यांची  निवड

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत तालुका किराणा असोसिएशनच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा सचिन कोक्कर यांची फेर निवड  झाली असून ही निवड रविवारी दि. २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकित करण्यात आली.

व्यापारी महासंघाला सलग्न असलेली किराणा असोसिएशन ही संघटना गेल्या बऱ्याच वर्षांपासून व्यापारी महासंघाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. या संघटनेची कार्यकारिणी दरवर्षी जाहीर केली जाते. त्याचप्रमाणे यावर्षीची कार्यकारिणी निवडण्यासाठी रविवारी दि.२९ सप्टेंबर रोजी  जेष्ठ किराणा व्यापारी सुरेश काबरा
यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीत सर्वानुमते सचिन कोक्कर यांची अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली. जाहीर करण्यात आलेली असोसिएशनची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. अध्यक्ष सचिन कोकर, उपाध्यक्ष बालाजी पोकळे, व्यंकटेश चिद्रवार, कोषाध्यक्ष कपिल खके, श्रीनिवास चांडक, सचिव गोविंद राठी, सहसचिव श्रीकांत माकोडे, नीरज मुंदडा, सल्लगार सदस्य सुरेश काबरा, राजू खके, बाळू चांडक, बाबू चांडक व गणेश कुमावत यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल सचिन कोक्कर यांचे सर्व क्षेञातुन  स्वागत होत असुन त्यांना पुढिल कार्यास शुभेच्छा मिळत आहे .

किराणा असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन कोक्कर यांची  निवड

किराणा असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन कोक्कर यांची  निवड

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत तालुका किराणा असोसिएशनच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा सचिन कोक्कर यांची फेर निवड  झाली असून ही निवड रविवारी दि. २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकित करण्यात आली.

व्यापारी महासंघाला सलग्न असलेली किराणा असोसिएशन ही संघटना गेल्या बऱ्याच वर्षांपासून व्यापारी महासंघाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. या संघटनेची कार्यकारिणी दरवर्षी जाहीर केली जाते. त्याचप्रमाणे यावर्षीची कार्यकारिणी निवडण्यासाठी रविवारी दि.२९ सप्टेंबर रोजी  जेष्ठ किराणा व्यापारी सुरेश काबरा
यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीत सर्वानुमते सचिन कोक्कर यांची अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली. जाहीर करण्यात आलेली असोसिएशनची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. अध्यक्ष सचिन कोकर, उपाध्यक्ष बालाजी पोकळे, व्यंकटेश चिद्रवार, कोषाध्यक्ष कपिल खके, श्रीनिवास चांडक, सचिव गोविंद राठी, सहसचिव श्रीकांत माकोडे, नीरज मुंदडा, सल्लगार सदस्य सुरेश काबरा, राजू खके, बाळू चांडक, बाबू चांडक व गणेश कुमावत यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल सचिन कोक्कर यांचे सर्व क्षेञातुन  स्वागत होत असुन त्यांना पुढिल कार्यास शुभेच्छा मिळत आहे .

Friday, September 27, 2024

जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीरात सहभागी व्हा - शिवसेना शहरप्रमुख  अनिल जाधव 

 जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीरात सहभागी व्हा - शिवसेना शहरप्रमुख  अनिल जाधव 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
  एक  ऑक्टोबर जागतिक रक्तदान दिना निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खंडोबा मंदिर मित्र मंडळ मानवत यांच्या वतीने परभणी जिल्ह्यातिल रक्त तुटवडा  व रुग्णांची होणारी गैरसोय या कारणास्तव व सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या शिबिराचे उद्घाटन   श्री.डॉ.नागेश लखमावार जिल्हा शैल्य  चिकित्सक परभणी,  कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पांडुरंग माचेवाड तहसीलदार मानवत,  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप बोरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मानवत, कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती सौ.कोमल सावरे नगरपरिषद मानवत मुख्य प्रशासक व मुख्य अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या शिबिरामध्ये ओम भगवती मित्र मंडळ , श्री संत सावता माळी मित्र मंडळ , रामनगर मित्र मंडळ , मॉर्निंग बॉईज ग्रुप , आदिशक्ती मित्र मंडळ , मृत्युंजय प्रतिष्ठान , शिव मित्र मंडळ , आर्ट ऑफ लिविंग परिवार , मोरेश्वर मित्र मंडळ , जय अंबे ग्रुप , शिवनेरी मित्र मंडळ ,राजपूत मित्र मंडळ , माय लाईफस्टाईल परिवार , व खंडोबा मित्र मंडळ मानवत या सर्व मित्र मंडळाचे सदस्य या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणार आहेत या रक्तदान शिबिरामध्ये मानवत तालुक्यासह शहरातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आव्हान शिवसेना शहरप्रमुख  अनिल जाधव , पांडुरंग जाधव यांच्यासह सर्व खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.

वसीम कुरेशी यांची  मानवत शहर युवक कॉग्रेस अध्यक्ष पदी निवड

वसीम कुरेशी यांची  मानवत शहर युवक कॉग्रेस अध्यक्ष पदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत येथील समाजसेवक   वसीम खालेक कुरेशी यांची  मानवत शहर युवक कॉग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे  श्रीराम सुरेशराव जाधव अध्यक्ष पाथरी विधानसभा युवक काँग्रेस यांच्या पञान्वये हि नियुक्ती करण्यात आली आहे पाथरी विधानसभा आमदार सुरेशरावजी वरपुडकर  याच्यां हस्ते वसीम खालेक कुरेशी यांना या निवडिचे नियुक्तीपञ प्रदान करण्यात आले आहे.
यावेळी मा. नगरसेवक सय्यद जमील सय्यद मसुद , पाथरी  तालुका कॉंग्रेस अध्यक्ष अनील घाडगे,उपमहापौर भगवानराव वाघमारे, मा.नगरसेवक आनंद मामा भदर्गे , अपसर भाई अन्सारी, बाळासाहेब फुलारी काका, सुदर्शन कदम,इलियास पठान, शोएब कुरेशी उपस्थित होते. वसीम खालेक कुरेशी यांची  मानवत शहर युवक कॉग्रेस अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व राजकिय ,सामाजिक क्षेञातुन या निवडिचे स्वागत होत असुन त्यांना सर्व स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.

Tuesday, September 24, 2024

मानवत नगरपरिषद पथविक्रेता समितीची निवडणूक बिनविरोध !

मानवत नगरपरिषद पथविक्रेता समितीची निवडणूक बिनविरोध 
[] ईरफान बागवान यांची सदस्यपदी निवड []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत नगरपरिषद पथविक्रेता समितीच्या सदस्य पदाची  ८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम  पार पडला आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ च्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकार पथविक्रेता आणि फेरीवाले यांच्यासाठी विविध उपक्रम राबवित असून त्यामध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी निवडणूकिने निवडणे हा एक भाग होता. पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यामध्ये एकूण आठ जागांसाठी सहा उमेदवार हे बिनविरोध निवडून आले असून दोन जागा ह्या रिक्त आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती (महिला) व विकलांग यांचा समावेश आहे. 
सर्वसाधारण गटामधून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार श्री. तोफिक  मोहम्मद रफी बागवान, श्री मोहम्मद रफी अब्दुल रहीम बागवान, तसेच सर्वसाधारण महिला राखीव मधून श्रीमती उज्वला महावीर अन्नदाते, इतर मागासवर्गीय महिला राखीव मधून श्रीमती संगीता शिवाजी धुमाळ, अनुसूचित जाती या प्रवर्गामधून श्रीमती शांता केरबा चांदणे, व अल्पसंख्यांक प्रवर्गामधून श्री मोहम्मद इरफान रऊफ बागवान, वरील सर्व प्रतिनिधींची वेगवेगळ्या प्रवर्गामधून बिनविरोध निवड झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ म्हणून मा.श्री.तुकाराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. नगरपरिषद कार्यालय मानवत या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांना सदस्यत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 
सदरील कार्यक्रमांमध्ये
श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत यांनी उपस्थित नवनियुक्त पथविक्रेता समिती सदस्य यांना याविषयी माहिती देताना असे सांगितले की, मानवत शहरांमध्ये एकूण 438 नोंदणी करत पथविक्रेते (फेरीवाले) आहेत. सदरील समिती ही एकूण २० सदस्यांची असून यामध्ये निवडून आलेले उमेदवारा व्यतिरिक्त शासकीय अधिकारी यामध्ये एक पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी, सदस्यांमध्ये एक पोलीस ठाण्याचे प्रभारी, एक स्थानिक वाहतूक पोलीस प्रभारी, एक वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एक विशेष नियोजन प्राधिकराचा प्रतिनिधी, दोन सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, एक अग्रणी बँक प्रतिनिधी,एक व्यापारी संघाचा प्रतिनिधी, एक निवासी कल्याण संघाचे प्रतिनिधी, एक पणन संघाचा प्रतिनिधी, असे एकूण २० प्रतिनिधीं सदस्यांची समिती असते. 
पादचारी वर्गाला तसेच वाहतुकीस अडथळा न येऊ देणे यासाठी फेरीवाल्यांना शिस्त लावणे, पथविक्रेत्यांच्या जागा निश्चित करणे, नव्या जुन्या फेरीवाल्यांच्या नोंदणीवर लक्ष ठेवणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, कर्ज पुरवठा व प्रशिक्षणाकडे लक्ष देणे इत्यादी कामे सदरील समितीचे असतात. सदरील संपूर्ण माहिती ही श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांनी दिली. 
मानवत नगरपरिषद पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ निवडणूक निर्णय अधिकारी श्री तुकाराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदरील निवडणूक कार्यक्रमांमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री भारत पवार, कर निरीक्षक व निर्धारक, श्री रामराव चव्हाण, कर निरीक्षक व निर्धारक,श्रीमती. शितल सोळंके, श्री हनुमंत बिडवे, श्री जावेद मिर यांनी कामकाज पाहिले. 
तसेच श्री सय्यद अन्वर, नगर अभियंता, श्री मुंजासा खोडवे, लेखापाल, श्री महेश कदम, लेखापाल, श्री भगवान शिंदे, कार्यालयीन अधीक्षक, श्री संतोष उन्हाळे, कर निरीक्षक व निर्धारक, श्री राजेश शर्मा, श्री शताणिक जोशी, विद्युत अभियंता, श्री संतोष खरात, संगणक अभियंता, श्री नारायण व्यवहारे, श्रीमती वंदना इंगोले इत्यादींचे सहकार्य या निवडणुकीसाठी लाभले. 
याप्रसंगी पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना निवडीचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या निवडणुकीमध्ये श्री हबीब भडके यांच्या विशेष प्रयत्नांमधून सदरील निवडणुक बिनविरोध पार पडली.

Friday, September 13, 2024

मानवत तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी कविता सत्यशिल धबडगे यांची निवड.

मानवत तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी कविता सत्यशिल धबडगे यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मागील पाच वर्षांपासून मानवत तालुका संजय गांधी  निराधार समितीची नियुक्ती रखडली होती माञ नुकतीच नऊ सदस्यीय समिती  नेमण्यात आली आहे यात सदस्यपदी  कविता सत्यशील धबडगे यांची निवड झाली आहे .
केंद्र शासन व राज्य शासन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार घटकासाठी विविध योजना राबवले जातात अशा योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यांना आर्थिक स्वरूपात मासिक लाभ दिला जातो. यात राज्य सरकारच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो या समितीच्या अध्यक्षपदी अमोल गंगाधरराव कदम तर सदस्यपदी कविता सत्यशील धबडगे, मीरा विठ्ठल काळे, किशोर अशोकराव चव्हाण, अ. हबीब अ. कादर बागवान, निलेश विजयकुमार यादव, कल्याण रावसाहेब देशमुख, नागनाथ डिगांबरराव कुऱ्हाडे, शिवाजी गंगाधरराव वरखडे, ज्ञानेश्वर उत्तमराव भिसे यांची निवड करण्यात आली आहे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी ५ सप्टेंबर रोजी नऊ सदस्यीय निराधार समिती नियुक्त केली आहे या निवडीवर आमदार  राजेश विटेकर यांचे समर्थक युवानेते डॉ.अंकुशभाऊ लाड व  कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर यांचे शिफारशी वरुन हि निवड करण्यात आली आहे.या निवडिबद्दल सर्व सदस्यांचे अभिनंदन होत असुन पुढिल कार्यास शुभेच्छा मिळत आहे.

Friday, August 30, 2024

शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनास मानवत येथील पञकार रवाना

शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनास मानवत येथील पञकार रवाना

मानवत / मुस्तखीम बेलदार 

प्रथमच गावस्तरावरील पत्रकारांसह आदीस्वीकृतीधारकांपर्यंत पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासह त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी व्हॉइस ऑफ मीडिया, या संघटनेचे कार्य अहोरात्र सुरू आहे. नुकतेच परभणी जिल्ह्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वर्षभर मोफत उपचाराची तरतूद करण्यात आली. तदनंतर पत्रकारांच्या समस्यांना व्यासपीठ देण्यासाठी शिर्डी येथे ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शिखर अधिवेशन होत आहे. येथे परभणी जिल्ह्यातून पत्रकार बांधव जात आहेत. त्यात मानवत तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचा सक्रिय सहभाग आहे. म्हणूनच मानवत तालुक्यातील संघटनेचे सदस्य दि. ३० आँगस्ट रोजी रवाना झाले आहेत यात व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष कचरुलाल बारहाते,सत्यशिल धबडगे,किशन बारहाते,भैय्यासाहेब गायकवाड ,विलास बारहाते, वसंत मांडे ,
प्रमोद तारे,मुस्तखीम बेलदार आदी पञकार रवाना झाले आहे.

Tuesday, August 27, 2024

मानवत मास्टर स्पोर्टस अँकेडिमी विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश

मानवत मास्टर स्पोर्टस अँकेडिमी विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत  घवघवीत यश 

मानवत / मुस्तखीम बेलदार 

औरंगाबाद येथे २५ आँगस्ट रोजी  नुकत्याच पार पडलेल्या  पहिल्या आंतरराष्ट्रीय ओपन कराटे चॅम्पियनशिप मध्ये सेल्फ डिफेन्समध्ये 
मास्टर स्पोर्टस अँकेडिमी मानवतच्या
विद्यार्थ्यांनी भारताचा प्रतिनिधित्व करत  एकूण १३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी गोल्ड पदक ९ सिल्वर ८ ,ब्राझ पदक ९,  अशी एकुण 
२६ पदकाची कमाई केली . सर्व विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी दाखवून भारतासाठी व आपल्या मानवत  शहरासाठी चॅम्पियन्स टीमचे मानकरी ठरले आहे.
या घवघवीत यशा बद्दल त्यांना ट्रॉफी,    व पदक देऊन सन्मानित करण्यात आले, या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पूर्ण भारतातून व वेगवेगळे देशातून पाचशे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये नेपाल, श्रीलंका, भूतान व बांगलादेश या देशांनी  आपला   सहभाग नोंदवीला  होता, या सर्वामध्ये मानवत शहराच्या विद्यार्थि चॅम्पियनशिप चे मानकरी ठरले आहे.
मानवत शहरात यांची  प्रशंसा होत असुन सर्व स्तरावरुन विद्यार्थीना शुभेच्छा मिळत आहे.
या सर्व विद्यार्थि स्पर्धकांना अब्दुल सत्तार मास्टर यांच्यां मार्गदर्शनाखाली मास्टर असीर खान ,बालाजी शिंदे यांचे सहकार्य लाभले.


Sunday, August 25, 2024

युवानेते डॉ.अंकुश लाड यांची लाडकि बहिण योजना समिती सदस्यपदी निवड

युवानेते डॉ.अंकुश लाड यांची लाडकि बहिण योजना समिती सदस्यपदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
लाडकि बहिण योजना पाथरी विधानसभा स्तरीय तीन सदस्य समितीच्या अशासकिय सदस्यपदी युवानेते डॉ.अंकुश लाड व सोनपेठ येथील  श्रीकांत विटेकर यांची निवड झाली आहे.
क्रिडा व युवक कल्याण मंञी महाराष्ट्र राज्य  मा.संजय बनसोडे साहेब  यांच्यावतीने २२ आँगस्ट रोजी जिल्हाधिकारी परभणी यांना या निवडिचे  पञ देण्यात आले आहे.
लाडकि बहिण योजना पाथरी विधानसभा स्तरिय तीन सदस्य  समितीच्या अध्यक्षपदी 
शिवसेना नेते तथा प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान तर सदस्यपदी युवानेते डॉ.अंकुश लाड व सोनपेठ येथील  श्रीकांत विटेकर यांची निवड झाली आहे या निवडिचे सर्व स्तरावरुन स्वागत  होत आहे.

Friday, August 23, 2024

२४ ऑगस्ट रोजी परभणी येथे चर्मकार समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन

२४ ऑगस्ट रोजी परभणी येथे चर्मकार समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनराव घोलप यांच्या आदेशाने युवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे व अमर दांडेकर यांचा राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा परभणी च्या वतीने दिनांक २४ ऑगस्ट शनिवार सायंकाळी ठीक पाच वाजता परभणी येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राज्यव्यापी दौऱ्यानिमित्ताने चर्मकार समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.डी ठोंबरे व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड तर  प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे व अमर तांडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सौ प्रभावती अन्नपूर्वे मराठवाडा उपाध्यक्ष रामकिसन कांबळे , कर्मचारी अध्यक्ष प्रभाकर गायकवाड, जेष्ठ समाजसेवक सुग्रीव ठोंबरे,
 परभणी जिल्हाध्यक्ष विनोद असोरे,
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष 
सौ आशाताई ठोंबरे 
महिला शहराध्यक्ष सौ अनिता असेवार
शहराध्यक्ष गोविंद असोरे
जिल्हा सचिव एम.जी.शेवाळे, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे या करीता परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सर्व पदाधिकारी  यांनी मोठ्या संख्येने सावली शासकीय विश्रामगृह परभणी येथे उपस्थित राहण्याचे आवाहान चर्मकार महासंघाचे परभणी  जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी केले आहे.

 

Sunday, August 11, 2024

शिवसेना शाखेचे मानोली येथे शिवसेना नेते सईद खान याच्यां हस्ते उदघाटन

 शिवसेना नेते सईद खान यांची मानोली गावकऱ्यांना गाव भेट 

[] शिंदे शिवसेना शाखेचे मानोली येथे उदघाटन []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 मानवत तालुक्यातील मानोली येथे  आज दि ११ ऑगस्ट रविवार  रोजी सकाळी नऊ वाजता सईद खान यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे शिंदे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी सईद खान यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला व गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर ते बोलताना म्हणाले की मानोली ग्रामपंचायत ही शिंदे सैन्याची परभणी जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असल्यामुळे मानोली गावकऱ्यांना आम्हाला हक्काने मागण्याचा अधिकार आहे असे ते बोलताना म्हणाले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुंजाभाऊ नाना टाकळकर विठ्ठल काका रासवे पप्पू घाडगे अमोल भाले पाटील दादासाहेब टेगसे   चक्रधर उगले गोपाळ साखरे शिवाजीराव वरखडे प्रमोद तारे संतोष शिंदे सुरेश मांडे गोपाळ शिंदे लक्ष्मण शिंदे पंडितराव शिंदे बन्सी दादा सुरवसे संतोष तळेकर शेख जब्बार रामकिसन तळेकर रमेश शिंदे ज्ञानोबा मांडे बालासाहेब शिंदे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

Monday, August 5, 2024

मानवत येथे बाबाजानी दुर्राणी यांच्या संवाद दौऱ्याला नागरीकांकडुन प्रचंड प्रतिसाद


मानवत येथे बाबाजानी दुर्राणी यांच्या संवाद दौऱ्याला नागरीकांकडुन प्रचंड प्रतिसाद 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
आगामी विधानसभेची निवडणुकीची बिगुल वाजले असून यात मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांनी  पाथरी विधानसभा लढविण्याच्या जोरदार तय्यारीत आहे यासाठि  संवाद दौऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन पेठमोहल्ला मानवत येथे रविवार दि.४ आँगस्ट रोजी करण्यात आले होते या संवाद दौऱ्याला नागरीकांकडुन प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
सर्वप्रथम मा.आ. बाबाजानी दुर्रानी यांचा हजरत टिपु सुलतान चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून सत्कार करण्यात आला कार्यक्रम स्थळापर्यंत रॅली काढण्यात आली.. 
यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट उपजिल्हाध्यक्ष अँड. लुकमान बागवान,   बाबाजानी दुर्राणी, मुजाहिद खान, हन्नान मामा दुर्राणी, युवा नेते जुनेद खान ,तारेख दुर्राणी, हाजी अब्दुल अजीज बागवान, आजम कुरेशी,  अब्दुल करीम कुरेशी,  मजीद बागवान यांची उपस्थिती होती..
कार्यक्रमाचे प्रस्तावित अँड. लुकमान बागवान यांनी केले.
नियामत खान मित्र मंडळ च्या वतीने बाबाजानी दुर्राणी यांचे सत्कार करण्यात आले 
मा.आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या मतदारसंघातील गोरगरीब लोकांच्या अडीअडचणी सोडविले गावागावात मूलभूत सुविधा सोबतच समाज मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून दिला निधी देताना कधी जात धर्म पक्ष असा भेदभाव केला नाही यामुळेच बाबाजानी दुर्राणी यांची ओळख धर्मनिरपेक्ष राजकारणी म्हणून आहे व पुढेही विकासाचा मॉडेल घेऊनच बाबाजानी दुर्राणी हे निवडणूक लढविणार आहे.
सर्वांनीच दुर्राणी यांना विजयी करावे असे प्रतिपादन मुजाहिद खान यांनी यावेळी केले.
मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट च्या वतीने उमेदवारी मिळण्याची  शक्यता आहे त्यामुळे आम्ही तय्यारी सुरु केली आहे यास जनतेचे खुप समर्थन मिळत आहे मला विधानसभेत जाण्याची  संधी मिळाली तर मानवत शहरासह पाथरी विधानसभाचे विकासाच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलुन टाकु असे  प्रतिपादन बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळी केले.या संवाद दौरा कार्यक्रमात  मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती 
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नियामत खान मित्र मंडळाच्या  सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जुबेर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष बाबाजी कच्छवे यांनी मानले.

Saturday, August 3, 2024

मानवत येथे बाबाजानी दुर्राणी यांच्यावतीने ४ आँगस्ट रोजी संवाद बैठकीचे आयोजन

 मानवत येथे बाबाजानी दुर्राणी यांच्यावतीने  ४ आँगस्ट रोजी संवाद बैठकीचे आयोजन 

मानवत / मुस्तखीम बेलदार 

आगामी विधानसभेची निवडणुकीची बिगुल वाजले असून यात मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांनी  पाथरी विधानसभा लढविण्याच्या जोरदार तय्यारीत आहे यासाठि  संवाद दौऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन पेठमोहल्ला मानवत येथे रविवार दि.४ आँगस्ट रोजी करण्यात आले आहे. या संवाद दौऱ्यात मुशायरा कार्यक्रमाचे आयोजनहि करण्यात आले आहे मा.आ. बाबाजानी दुर्रानी, मुजाहिद खान, तारेख दुर्राणी यांच्यां प्रमुख उपस्थितीत हा संवाद दौरा होणार असुन 
 या  संवाद दौऱ्याला जास्तीत जास्त संख्येने नागरीकांनी  उपस्थित राहण्याचे आवाहान  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट उपजिल्हाध्यक्ष अँड. लुकमान बागवान, शहराध्यक्ष बाबाजी कच्छवे ,माजी नगरसेवक नियामत खान ,समाजसेवक शेख जुबेर यांनी केले आहे.

Friday, August 2, 2024

युवानेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते मानवत शहरातील तलाबकट्टा रसत्याचे कामाचे शुभारंभ

युवानेते  डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते मानवत शहरातील तलाबकट्टा रसत्याचे कामाचे शुभारंभ 

मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असणाऱ तलाब कट्टा रोडच्या कामाचा शुभारंभ  दि.१ आँगस्ट रोजी विकास पुरुष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते व  मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मानवत शहरातील दोन प्रभागात असणारा हा रस्ता पुढे अनेक गल्ल्यांना जोडल्या गेला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने वाहतूक होते सदर रस्त्याच्यासाठी विकास पुरुष डॉ. अंकुश लाड यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर करुन आणला व आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली या प्रसंगी युवानेते डॉ.अंकुश लाड यांचा सत्कार उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभास विषेश प्रमुख उपस्थितीत अँड. रामचंद्र कुलकर्णी, रामकीशन सोनी, मारोतराव गडदे धोंडीराम कदम, बाजीराव हालनोर, शंकर तर्टे, संतोष आंबेगावकर, नरेश राठोड, ज्ञानेश्वर कोकरे, अंगद तर्टे, बाळासाहेब गडदे, हुनुमान आंबेगावकर, पप्पूसेठ, रंगनाथ कोंडगीर, विक्की काळे, प्रभू खरात, प्रवीण खरात याच्यांसह  प्रभागातील रहिवासी  उपस्थित होते.ह्या रस्त्याचे काम  युवानेते  डॉ. अंकुश लाड यांनी सुरु केल्या बद्दल 
 प्रभागातील नागरीक समाधान व्यक्त करुन युवानेते  डॉ. अंकुश लाड यांचे आभार व्यक्त करत आहे.

Thursday, August 1, 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ जेष्ठ नागरिकांनी घ्यावा - मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ जेष्ठ नागरिकांनी घ्यावा -  मुख्याधिकारी  श्रीमती कोमल सावरे
मानवत / मुस्तखीम बेलदार 
राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती त जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन: स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळी एक रखमी रु.३०००/-पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत डीबीटी प्रणाली द्वारे थेट हस्तांतरण करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत मानवत शहरातील सर्व ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांनी आपापले अर्ज योग्य कागदपत्रासह नगरपरिषद कार्यालयामध्ये सादर करावेत. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना रु. ३०००/- एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
सदरील रक्कम ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्र ड्रायपोड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट, सवाईकल कॉलर, इत्यादी सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी उपयोगात येणार आहेत. तरी मानवत शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा १००% लाभ घ्यावा.
मुख्यमंत्री वयोश्री योजना करिता आवश्यक कागदपत्रे- आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्राच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयामध्ये अर्ज सादर करावेत याचबरोबर शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे सुद्धा शहरातील पात्र महिलांनी ऑनलाइन स्वरूपात नारीशक्ती दूध ॲपच्या माध्यमातून, नगरपरिषदेने स्थापन केलेल्या मदत कक्षामार्फत किंवा १ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे  
ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत ॲट वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. 
ज्या पात्र इच्छुक लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थांनी या संकेतस्ताळावर जाऊन आपले अर्ज भरावेत
पोर्टल लिंक - www.ladkibahin.maharashtra.gov.in  यावर अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांनी शहरातिल नागरीकांना केले आहे.

मा.आ.बाबाजानी दुर्रानी पाथरी विधानसभा निवडणुक लढविणेच्या तय्यारीत !

मा.आ.बाबाजानी दुर्रानी  पाथरी विधानसभा निवडणुक लढविणेच्या तय्यारीत  
मानवत / मुस्तखीम बेलदार 
आगामी  विधानसभेची निवडणुकिचे बिगुल वाजले असुन  यात मा.आ.बाबाजानी दुर्रानी यांनी   पाथरी विधानसभा लढवण्याची जोरदार  तय्यारी सुरु केली असुन यासाठि ते कार्यकर्ते सह कामाला लागले आहे नागरिकांच्या भेटिगाठि घेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्यां गटात नुकतेच मा.आ.बाबाजानी दुर्रानी यांनी प्रवेश केला असुन त्यांना महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आसल्याचे बोलले जात आहे.
जनसामान्याचा आधार पाथरी विधानसभा मतदार संघात जनतेची कामे केली व करत आहेत मतदार संघातील गोरगरीब लोकांच्या अडचणी सोडविले गावागावात मूलभूत सुवि-सुविधा सोबतच समाज मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून दिला निधी देताना कधिच जात- धर्म पक्ष असा  भेदभाव केला नाही बाबाजानी दुर्राणी यांची ओळख धर्मनिरपेक्ष राजकारणी म्हणून आहे.
आपल्या मतदारसंघात सर्व जाती धर्मातील लोकांच्या मनात बाबाजानी दुर्राणी हे आहेत..
पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला आमदार ,आपला नेता, असावा अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
विकासाच्या दृष्टिकोनातून पाथरी तालुक्याचा चेहरा मोहरा दुर्राणी यांनी बदलला आहे 
आणि विकासाचा मॉडेल घेऊनच माजी आमदार बाबाजानी दुर्राणी ही पाथरी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारी मध्ये आहे.
लोकसभेच्या झालेल्या निवडणुकित मुस्लीम समाजाने माहाविकास आघाडिला एकगठ्ठा मतदान करुन उमेदवार निवडुण आणले होते परंतु झालेल्या विधानपरीषदेत एक हि मुस्लीम व्यक्तिला महाविकास आघाडिने उमेदवारी दिली नव्हती या बाबत मुस्लीम समाजातुन नाराजीचा सुर दिसला होता परंतु आगामी विधानसभेसाठि मुस्लीम चेहरा म्हणुन पाथरी विधानसभा मतदारसंघात  सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन चालणारे कुठलाही प्रकारचा भेदभाव न करणारे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांना महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याची मागणी होत आहे.

मा.आ.बाबाजानी दुर्रानी पाथरी विधानसभा निवडणुक लढविणेच्या तय्यारीत मानवत / मुस्तखीम बेलदार आगामी विधानसभेची निवडणुकिचे बिगुल वाजले असुन यात मा.आ.बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरी विधानसभा लढवण्याची जोरदार तय्यारी सुरु केली असुन यासाठि ते कार्यकर्ते सह कामाला लागले आहे नागरिकांच्या भेटिगाठि घेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी �

Saturday, July 27, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अँड.लुकमान बागवान यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अँड.लुकमान बागवान यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत येथील समाजसेवक अँड.लुकमान बागवान यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड दि.२६ जुलैरोजी राष्ट्रवादी भवन बसमत रोड परभणी येथे  करण्यात आली.
माननीय खासदार शरद पवार यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न कराल पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल  प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार 
जयंत पाटील यांनी दिलेले पक्षाचे कार्यक्रम व ध्येय धोरणांची अमलबजावणी आपण करावी  अशा आशयाचे पञ  
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे  जिल्हा अध्यक्ष मा.आ.अँड. विजय गव्हाणे यांच्या स्वाक्षरीने  अँड. लुकमान बागवान यांना देण्यात आले आहे. या निवडिचे सर्व स्तरावर स्वागत होत असुन त्यांना पुढिल कार्यास शुभेच्छा मिळत आहे.

Thursday, July 25, 2024

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटकरवाडी येथे शिक्षण सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटकरवाडी येथे शिक्षण सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 

मानवत / मुस्तखीम बेलदार 
हटकरवाडी तालुका मानवत येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत आहे अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती  वापर करने मुलभुत अक्षर व संख्या ज्ञान    दिनांक २४ जुलै रोजी क्रीडा दिनानिमित्त विविध खेळ घेण्यात आले विद्यार्थ्यानी या  शिक्षण सप्ताह मध्ये त्यांच्या विविध कला गुणांचा वाव मिळावा याकरिता २५ जुलै रोजी सांस्कृतिक दिनाचे आयोजन करण्यात आले होते या सप्तांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाची आवड निर्माण झाल्याचे जाणवत आहे. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक लांडगे सर ,शेख रुस्तुम सर, शिरसाट मॅडम ,तोडकरी सर,चापके सर  यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Sunday, July 21, 2024

मानवत येथील कलीम तांबोळि यांची शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उप प्रमुख पदि निवड

 मानवत येथील कलीम तांबोळि यांची शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उप प्रमुख पदि निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत येथील समाजसेवक कलीम तांबोळि यांची शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उप प्रमुख पदि निवड शिवसेना नेते तथा प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान  यांच्यां प्रमुख उपस्थितीत  दि.२० जुलै  रोजी शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालय  पाथरी येथे करण्यात आली .
खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यां आदेशाने  शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उप प्रमुख पदि आपली नियुक्ती करण्यात येत असून आपण पक्षाचा अधिक विस्तार करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार तळगाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न कराल, पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो असे प्रतिपादन  प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान यांनी यावेळी  केले . सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत  निवडिचे पञ कलीम तांबोळि
यांना देऊन त्यांना  पुढिल कार्यास  शुभेच्छा देण्यात आल्या 
यावेळी जिल्हा प्रमुख नाना टाकळकर, युसुफोदीन अन्सारी, तालुका प्रमुख विठ्ठल काका रासवे,अल्पसंख्यांक शिवसेना मानवत तालुकाध्यक्ष पै .शेख समीर , युनूस भाई कुरेशी, गजु भाऊ टोके, अनवर दादा, साजिद राज, संजय रासवे, शिवसेना अल्पसंख्यक तालुका प्रमुख अहेमद अत्तार, शेख मोहसीन, शफि भाई, सय्यद मोहसीन,वली पाशा कुरेशी व कार्यकर्ते पद अधिकारी नगरसेवक आदीसह मोठ्यासंख्येने शिवसैनिक  उपस्थीत होते.कलीम तांबोळि यांची शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उप प्रमुख पदि निवड झाल्याने त्यांना सर्व स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.

Monday, July 15, 2024

मानवत येथे सईद खान यांच्या हस्ते शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन

मानवत येथे सईद खान यांच्या हस्ते शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरातील हजरत टिपू सुलतान चौक येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्या हस्ते दि.१४ जुलै २०२४ रविवार रोजी रात्री ८ वाजता करण्यात आले.
       या वेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सचिव आसेफ खान, जिला प्रमुख मुंजा भाऊ नाना टाकलकर, सभापति चक्रधर उगले, चिंचाने नाना, उप जिला प्रमुख प्रमोद तारे, तालुका प्रमुख शिवाजी वरखड़े, अल्पसंख्यक तालुकाप्रमुख समीर शेख, शहर प्रमुख बालाजी दहे,
शहर उप प्रमुख मंगेश उदावंत, माजी नगर अध्यक्ष मोइन अंसारी, माजी नगर सेवक यूसुफ भाई बेलदार, माजी नगर सेवक नरसय्या कुरपटवार, कलीम तांबोळी, शहर प्रमुख पाथरी युसुफोदिन अंसारी, बोरगांव सरपंच उमर खान, वंदना ताई जोंधडे, राठौड़ ताई, हबीब खान, अमजद खान, दिलीप हिवाडे, यूनुस खुरेशी, अमोल भाले पाटिल, खालेद दादा, शफी भाई, वसीम भाई, मुश्ताक कुरेशी, अली कुरेशी, हफीज बागवान, करीम तांबोळी, आसिफ अत्तार, महेश लाड, शोएब, आदि उपस्थित होते.  
      कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्यक तालुकाप्रमुख पै. समीर शेख, कलीम तांबोळी यांनी परीश्रम  घेतले.

Monday, July 1, 2024

विधानपरिषदे साठि राष्ट्रवादी पक्षाकडुन राजेश दादा विटेकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता

विधानपरिषदे साठि  राष्ट्रवादी पक्षाकडुन   राजेश दादा विटेकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता
मानवत / मुस्तखीम बेलदार 
विधानपरिषद च्या ११ जागा रिक्त होणार आहे या निवडणुकिचा  बिगुल वाजला आहे १२ जूलै रोजी निवडणुका होणार आहे परभणी जिल्हयातुन  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन माजी जि.प.अध्यक्ष तथा राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेश विटेकर यांच्यां गळ्यात आमदारकिची माळ पडण्याची दाट शक्यता राजकिय क्षेत्रातुन वर्तुविली जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचा कार्यकाल संपला असल्याने कोणाचा नंबर लागतो अशी चर्चा होती परंतु जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष राजेश दादा  विटेकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
पक्षाकडुन त्या प्रकारच्या हालचालीना वेग आला आहे नुकत्याच  झालेल्या लोकसभा निवडणुकित मा.उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांच्यां आदेशा नुसार लोकसभा निवडणुकितुन राजेशदादा यांनी माघार घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे माधवराव जानकर यांना राष्ट्रवादी च्या कोट्यातुन  उमेदवारी  देण्यात आली होती.
मा.उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकित प्रचारा दरम्यान राजेश दादा  विटेकर यांना आमदारकिचा भरसभेत शब्द दिला होता त्यामुळे राजेशदादा यांचे समर्थक व कार्यकर्ते मोठ्या आशेने राजेशदादा ना उमेदवारी मिळण्याची वाट बघत आहे.राजेश दादा  विटेकर यांचा परभणी जिल्हयात दांडगा जनसंपर्क असुन आमदार कि मिळाल्यास निच्शितच राष्ट्रवादी पक्षाला बळ मिळणार हे माञ नक्की आहे.


प्रतिक्रिया ....
मा.उपमुख्यमंञी अजित दादा पवार साहेब हे शब्दाला जागणारे नेते म्हणुन परीचित आहे त्यामुळे ते राजेश दादा ला आमदारकिचा दिलेला शब्द पुर्ण करतिल हि सर्व कार्यकर्तेना ठाम विश्वास आहे राजेश दादा आमदार झालेतर याचा फायदा नक्की राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाला होईल व परभणी जिल्हयात पक्ष वाढविण्यासाठी व जिल्हयाच्या विकासासाठि हि चालना मिळण्यास  मदत होईल..

बाळासाहेब मोरे पाटिल
अध्यक्ष व्यापारी  महासंघ तथा संचालक कृषी ऊत्पन्न बाजार समिती मानवत

Friday, June 28, 2024

जमात ए इस्लामी हिंद मानवतच्या वतीने १५ दिवसीय पर्यावरण अभियानाची सुरुवात

जमात ए इस्लामी हिंद मानवतच्या वतीने १५ दिवसीय पर्यावरण अभियानाची सुरुवात 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत येथे १५ दिवसीय पर्यावरण अभियान जमाते इस्लामी हिंद मानवत राबवत आहे. या अभियानाच्या निमित्ताने नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देणे आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे ह्या उद्देशाने नगर पालिका  मानवत सहकार्य करण्याचे निवेदन जमाते इस्लामी हिंद मानवतच्या वतीने कार्यदक्ष मुख्याधिकारी कोमल सावरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर अभियंता सय्यद अन्वर सर उपस्थीत होते.
आदरणीय मुख्याधिकारी कोमल सावरे मॅडम यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शहरातील  प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे  असे मत व्यक्त केले.
स्थानिक शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पर्यावरण शिक्षण कार्यक्रम आयोजित करणे सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, उद्याने आणि जलाशयांची स्वच्छता करण्यासाठी स्वयंसेवकांचे संघ तयार करणे.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नगर पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे. कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्नवीनीकरणाबाबत जनजागृती करणे.
वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आदी मुद्यावर चर्चा करण्यात आली.
नगर पालिका मानवत ने  या अभियानाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून हा अभियान यशस्वी होईल आणि मानवतचे पर्यावरणीय आरोग्य सुधारेल.
या निवेदनावर जमात ए इस्लामी हिंद मानवत चे पदाधिकारी सलीम सर, नजात सर,हाफेज़ लतीफ, मौलाना असलम,शेख समीर, शेख मुश्ताक,स.सरफराज , सय्यद एकबाल राज, फय्याज अन्सारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.

Thursday, June 27, 2024

ज्ञानदीप सेवाभावी संस्थाच्या वतीने मानवत येथे १० वी नॉन सेमी साठी मोफत शिकवणी वर्ग सुरु.

ज्ञानदीप सेवाभावी संस्थाच्या वतीने मानवत येथे १० वी नॉन सेमी साठी मोफत शिकवणी वर्ग सुरु.
मानवत / मुस्तखीम बेलदार 
ज्ञानदीप सेवाभावी संस्था मंगरूळ ( बु )
अंतर्गत इयत्ता १० वी च्या होतकरू, गरजू विद्यार्थी यांच्या साठी सध्या ५० मुलांसाठी वर्ष भर गणित आणि इंग्रजी विषयाचे अध्यापन अगदी मोफत सुरू झाले आहे , या साठी  ज्ञानदीप सेवा भावी  संस्थेला मानवत येथील प्राचार्य मा.संतोष पवार सर हे रोज अडीच तास वेळ देत असून, सध्या याच मुलांची बाहेरील क्लास ची फीस ६ लाख रु अशी असून ती पूर्णपणे बचत  होत आहे , पवार सर हे मानवत शहरात गेली १२ वर्ष पासुन अध्यापन करत असून गेल्या वर्षी पासून मोफत क्लास चालवत आहेत , तसेच त्यांचे सहकारी प्राध्यापक कांबळे सर  जाधव सर यांचे आज पर्यंत ८० ते ८५ विद्यार्थी विविध खात्यात शासकीय नौकरीला लागले आहे ,   अभ्यासातील मागे असलेले विद्यार्थी यांच्या साठी सुद्धा स्वतंत्र मार्गदर्शन पवार सर करत आहेत , मोफत आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण विद्यार्थी यांना मिळत असल्याने अनेक विद्यार्थी तसेच पालक समाधानी आहे ,  याचा फायदा अनेक गरज वंत विद्यार्थी यांना होतांना दिसून येत आहे, त्यांच्या या कार्यास समाजातून भरघोस प्रतिसाद तसेच कौतुकाची छाप पडत आहे , खरोखर ज्ञानदानाचे कार्य हे असे आज मिळणे आवश्यक आहे ,  कारण कित्येक विद्यार्थी हे आज हजारो रु फीस भरू शकत नाही ,   तसेच वयोगट १४ ते २५  शाळा बाह्य विद्यार्थी यांच्या साठी चौथी नापास विद्यार्थी असेल  तरी पण १० वी ला बसण्याची संधी रामपुरी आणि पोहंडुळ या गावी शैक्षणिक उपक्रम सुरू आहे ,त्यांच्या या कार्यास त्यांचे इतर सहकारी  प्राध्यापक रासवे  , घाटुळ , पाटील सर सहकार्य करत आहेत, सदरील क्लास हे १५ एप्रिल पासून पोलीस स्टेशन च्या पाठीमागे राठीं निवास या ठिकाणी रोज अडीच तास  होत आहेत. 
पवार सर  यांच्या शी संपर्क साधला असता ते म्हणतात की पालकवर्ग तसेच  विद्यार्थी यांनी तसेच समाजातील लोकांनी सहकार्य केले तर असेच पुढच्या वर्षी किमान १५० ते २०० विद्यार्थी यांना नक्कीच मोफत मार्गदर्शन करून विद्यार्थी यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थी कसे चांगल्या पदावर जातील याची दक्षता घेऊ,  
यांच्या कार्यास ज्ञानदीप सेवा भावी  संस्था मार्गदर्शन करत आहे,  ज्ञानदिप सेवा भावी संस्था चे अध्यक्ष  शांतलींग काळे , राजेभाऊ डुकरे मार्गदर्शन करुन शिक्षकांचे अभिनंदन करत आहे.