मानवत येथील टेलरिंग मटेरियल दुकानाला आग लागुन लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरातिल देवी मंदिर रोड परीसरातील नगरपरिषद च्या शॉपिंग सेंटर मधील जावेद अब्दुल मन्नान मनियार यांच्या टेलरिंग मटेरियल च्या दुकानाला दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजता इलेक्ट्रिक शॉट सर्किट मुळे आग लागल्याने दुकानातील टेलरिंग सामान काच बटन च्या शिलाई मशीन व दुकानातील फर्निचर जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, सय्यद फय्याज ,रहिम सय्यद,चालक आकमार,बकंट लटपटे व त्यांचे सहकारी घटनास्थळी रात्री दाखल झाले नगरपरिषद ची अग्निशामक दलाची गाडीस पाचारण करण्यात आले अग्निशामक दलाचे सय्यद कलीम,मुकेश कुमावत ,देवेंद्र किर्तने यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण केले.
या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशन येथे आक्समात जळीत रजिस्टर ला नोद करण्यात आली असुन अधिक तपास नारायण सोळंके हे करीत आहे.